Search

अंजीर लागवड आणि व्यवस्थापन – भाग २

अंजीर लागवड आणि व्यवस्थापन – भाग २

अंजीर ह्या फळाचा उल्लेख पुरातन ग्रंथामध्येही आढळतो उन्हाळा व पावसाळा अशा दोन्ही ऋतुमध्ये अंजीराचा सीझन असतो. अंजिरामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. याच्या सेवनाने शरीराला लोह, व्हिटॅमिन्स ए. बी. सी बऱ्याच प्रमाणात मिळते. तसेच शर्करा भरपूर प्रमाणात मिळते. अंजीर खायला थंड व पचायला जड असतात. यासारख्या गुणधर्मामुळे अंजीर या फळाला जागतिक पातळीवरही चांगली मागणी आहे. यामुळेच शेतकरी बांधवांना अंजीर लागवड आणि व्यवस्थापनाचे पैलू जाणून घेणे फायद्याचे ठरेल.

बहार धरणे:

 • अंजिराच्या झाडाला वर्षातून दोन वेळा फळ बहार येतो.
 • पावसाळ्यात येणाऱ्या बहाराला ‘खट्टा बहार’ म्हणतात तर उन्हाळ्यात येणाऱ्या बहाराला ‘मिठा बहार’ म्हणतात.
 • जुलै – ऑगस्ट मध्ये तयार होणाऱ्या ‘खट्टा बहार’ ची फळे तुलनेत गोडीला कमी असतात.
 • या उलट ‘मिठा बहार’ ची फळे चवीला गोड आणि मधुर असतात.
 • हि फळे साधारणतः मार्च ते एप्रिल दरम्यान तयार होतात.
 • यामुळे अंजीर या फळामध्ये बहुतांश लागवड हि ‘मिठा बहार’दरम्यान केली जाते.
 • मिठाबहार घेण्यासाठी सप्टेंबर महिन्यामध्ये हल्की नांगरट करून दोन आठवडे पाणी न देता झाडांना ताण द्यावा.
 • खतांची मात्रा देताना शेणखत, स्फुरद व पालाश यांचा पूर्ण आणि नत्राचा निम्मा हप्ता द्यावा.
 • वाफे बांधून पाणी देणे सुरु करावे.

आंतरपिके आणि आंतरमशागत:

 • लागवडीनंतरच्या सुरुवातीच्या दोन ते तीन वर्षात अंजिराच्या झाडाचा पसारा कमी असल्यामुळे मोकळी जागा भरपूर असते.
 • या मोकळ्या जागेत भाजीपाल्यांची तसेच ताग, चवळी यासारखी हिरवळीची पिके आंतरपिके म्हणून घ्यावीत त्यामुळे बागेची चांगली
  मशागत होऊन हमीनींची सुपिकता वाढते व अंतरपिकापासून थोड्याफार प्रमाणात उत्पादनसुद्धा मिळते.
 • जमिनीच्या मगदुराप्रमाणे व पाणीपुरवठा लक्षात घेऊन अंजिराच्या बागेत एक किंवा अधिक हंगामात आंतरपिके घ्यावीत.
 • सुरुवातीच्या काळात तण नष्ट करण्यासाठी बागेत कुळवणी करावी.
 • बागेत नेहमी स्वच्छता ठेवावी.
 • गरज पडल्यास रासायनिक तणनाशकांचा वापर करून तणांचा बंदोबस्त करावा.

प्रमुख कीड व रोग:

कीड:

 • तुडतुडे, खवले, कीड, पिठ्या कीड, कोळी, साल व बुंधा पोखरणारी अळी.

रोग:

 • गेरवा किंवा तांबेरा.

फळांची काढणी व उत्पादन:

 • तुरळक फळे येतात. अंजिराची फळे साधारणपणे १२० ते १४० दिवसांच्या कालावधीत तयार होतात.
 • फळांना फिकट हिरवा विटकरी लालसर जांभळा रंग आल्यावर फळे पक्व झाली असे समजावे.
 • अंजिराच्या फळांचा हंगाम फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून ते एप्रिल महिन्यापर्यंत असतो.
 • अशी अपक्व झालेली फळे देठ पिरगाळून किंवा चाकूने देठांजवळ कापून काढावीत.
 • सातव्या आठव्या वर्षांपासून अंजिराच्या झाडाचे उत्पादन वाढत जाऊन झाडे ३० ते ३५ वर्षापर्यंत भरपूर उत्पादन देतात.
 • एका झाडापासून सरासरी १५ ते २० किलो फळे मिळू शकतात.
 • पुणे सासवड भागात अंजिराचे दर हेक्टरी १० ते १२ हजार किलोपर्यंत उत्पादन मिळते.
 • योग्य नियोजन हा निश्चित नफ्याचा मूलमंत्र आहे हे लक्षात घेतले तर शेतकरी बांधवांना अंजीर शेतीमध्ये नक्कीच फायदा आहे.

Related posts

Shares