Search

अंजीर लागवड आणि व्यवस्थापन – भाग १

अंजीर लागवड आणि व्यवस्थापन – भाग १

अंजीर या फळाचे मुळस्थान दक्षिण अरब हे समजले जाते. अंजीर फळातील अन्नमूल्ये व पोषणक्षमता यामुळे हे फळ फार पूर्वीपासून खाण्यासाठी उपयोगात आणले जाते. महाराष्ट्रात जवळपास ४०० हेक्टर क्षेत्र या पित्ताच्या लागवडीखाली आहे.महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे जिल्ह्यात अंजिराचे पीक हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर केली जाते. अंजीर ची लागवड आणि व्यवस्थापन महत्वाचे कारण फळ जेवढे दर्जेदार तेवढीच उत्पादनाला मिळणारी किंमत अधिक. या लेखात आपण अशाच महत्वपूर्ण पैलूंचा आढावा घेऊया.

हवामान व जमीन:

 • अंजिराच्या वाढीसाठी व दर्जेदार उत्पादनासाठी उहन आणि कोरडे हवामान पोषक आहे.
 • हवेतील आर्द्रता किंवा ओलसर दमट हवामान अंजिराच्या पिकाला घातक आहे.
 • सरासरी ६०० ते ६५० मिलीमीटर पाऊस आणि ज्याठिकाणी सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात पाऊस थांबतो अशा ठिकाणी अंजिराची लागवड यशस्वीरीत्या करणे शक्य आहे.
 • अंजिराच्या लागवडीसाठी तांबूस रंगाची चिकन मातीची आणि १ मीटरच्या खाली मुरमाचा ठार असलेली जमीन योग्य असते.
 • अंजिराची मुळे साधारणपणे १ मीटर खोल जातात. म्हणून माध्यम खोलीची आणि उत्तम निचरा असलेली जमीन या पिकास मानवते.

अंजिराच्या जाती:

 • पुणे अंजीर
 • दिनकर
 • दिएन्ना
 • एक्सेल
 • कोनाद्रीया

अभिवृद्धी आणि लागवड पद्धत:

 • अंजिराच्या झाडाची अभिवृद्धी फ़ाटेकलम किंवा गुटिकलम तयार करून करता येते.
 • फाटकालामांना आय. बी. ए हे साजणीवक लावले तर मूल्य लवकर फुटतात.
 • भारी जमिनीत ५ x ५ मीटर आणि हलक्या जमिनीत ४.५ x ३.० अंतरावर ६० x ६० x ६० सेंमी. आकाराचे खड्डे तयार करावेत.
 • प्रत्येक खड्ड्यात वाळवीचा त्रास कमी करण्यासाठी १०% कार्बारिल भुकटी किंवा फॉलीडॉल पावडर १०० ते १५० ग्राम मिसळावी.
 • लागवडीनंतर ३ ते ४ दिवसांच्या अंतराने कलामांना पाणी द्यावे.

लागवडीचा हंगाम:

 • ज्या भागात अधिक पाऊस पडतो अशा ठिकाणी ऑक्टोबर – नोव्हेम्बर महिन्यात आणि कमी पावसाच्या भागात जून- जुलै महिन्यात अंतरावर लागवड करावी.

वळण आणि छाटणीच्या पद्धती:

 • छाटणीमुळे अंजिराच्या झाडाला व्यवस्थित आकार देता येतो.
 • तसेच मशागतीची कामे सुलभतेने करता येतात आणि झाडावर रोग व किडींचा प्रादुर्भावही कमी होतो.
 • अंजिराच्या झाडावर छाटणीनंतर फुटवे जास्त येतात. येणाऱ्या नवीन फुटीवर जलधारणा होते.
 • ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मागील वर्षीच्या फांद्यांची योग्य रीतीने छाटणी करावी.

फांद्यांना खाचा पाडणे (नॉचिंग):

 • अंजिरामध्ये उत्पादन वाढविण्यासाठी छाटणीप्रमाणेच फांद्यांवर खाचा पडणे हि एक महत्वाची आणि उपयुक्त पद्धत आहे.
 • अंजिराच्या फांदीवरील डोळ्याच्या वर २.५ सेंमी. लांब आणि १ सेंमी.रुंद तिरकस काप घेऊन खाचा पाडतात.

खते व पाणीपुरवठा:

 • अंजिराच्या झाडाची जोमदार वाढ होण्यासाठी झाडाला सुरुवातीला नियमित खते द्यावीत.
 • पहिल्या वर्षी प्रत्येक झाडाला १० किलो शेणखत. १०० ग्रॅम नत्र, ५० ग्रॅम स्फुरद व ५० ग्रॅम पालाश छाटणीच्या वेळी द्यावे.
 • पूर्ण वाढलेल्या ५ ते ६ वर्षाच्या झाडाला ४० ते ५० किलो शेणखत, ५०० ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम स्फुरद व २७५ ग्राम पालाश छाटणीच्या वेळी द्यावे.
 • फळधारणेनंतर एक महिन्याने पुन्हा ४०० ग्रॅम नत्र द्यावे.
 • शेणखताच्या ऐवजी हिरवळीच्या खताचा वापर अधिक उपयुक्त ठरू शकतो.

या लेखाच्या पुढील भागात अंजीर पिकामध्ये बहार धरणे, आंतरपिके आणि आंतरमशागत तसेच कीड व रोग आणि काढणी व उत्पादन यासारख्या व्यवस्थापनातील महत्वपूर्ण पैलूंबाबत माहिती जाणून घेऊया.

Related posts

Shares