Search

अझोला पशुखाद्य उत्पादन

अझोला पशुखाद्य उत्पादन

अझोला जलशैवालासारखे दिसणारे तरंगते फर्न आहे. जनावरांना सुलभतेने पचणारे उच्च प्रथिने आणि निम्न लीनिन कंटेंटयुक्त अझोला घन आहारात मिसळून किंवा नुसतेच जनावरांना देता येते. तसेच पोल्ट्री, शेळ्या-मेंढ्या, डुकरे आणि ससे यांनाही देता येते.

अत्यंत सोपे, अल्पखर्चिक व किफायतशीर असे अझोला उत्पादन शेतीस पूरक जोडधंदा म्हणूनदेखील उपयुक्त ठरू शकते. अशा या बहुगुणी पशुखाद्याबद्दल जाणून घेऊ.

अझोलामधील पोषक घटक

 • प्रथिने: 25 ते 30%
 • कॅलशियम: 67 मि.ग्रॅ प्रति 100 ग्रॅ
 • लोह: 7.3 मि.ग्रॅ प्रति 100 ग्रॅ

अझोलाचे फायदे

अझोला

 • पशुखाद्यावरील खर्चात 15-20 टक्क्यांची बचत होते
 • जनावरांत गुणवत्तावृद्धी होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते, आरोग्य सुधारते व आयुष्यात वाढ होते
 • अझोलाच्या वापरामुळे फॅट, दूध व वजन (300-500 ग्रॅम) वाढ होते
 • पक्षी (कुक्कुट, बदक, इमू, लाव्ही) कोंबड्यांच्या खाद्यात मिश्रण स्वरूपात अझोलाचा वापर केल्यास मांसल कोंबड्यांचे वजन वाढते व अंडी देणाऱ्या कोंबड्यांच्या उत्पादनात वाढ होते, तसेच अंड्यांचा पृष्ठभाग चकचकीत होतो
 • अझोलाच्या वाफ्यातून काढण्यात येणारे पाणी नत्रयुक्त व खनिजयुक्त असल्याने पिकांसाठी झाडांसाठी वापरता येते

उत्पादनाची कृती

dsc00862

 • जमीन समतल व स्वच्छ करून घ्या
 • आयताकार स्वरूपात विटा आडव्या टाका
 • विटांनी तयार करण्यात आलेल्या आयताकार चराला झाकणारी 2m X 2m मापाची एक पातळ यूव्ही स्टॅबिलाइझ्ड शीट अंथरा
 • 10-15 किलो चाळून बारीक केलेली माती चरावर टाका
 • 2 किलो शेणाची स्लरी तयार करा
 • स्लरीमध्ये 30 ग्राम सुपर फॉस्फेट व 10 लिटर पाण्यात मिसळून शीटवर टाका
 • पाण्याची पातळी 10 सेमी वाढविण्यासाठी आणखी पाणी टाका

अझोला

 • सुमारे 0.5 ते 1 किलो शुध्द मदर अझोला कल्चर बी, माती व पाणी एकसारखे करून बेडवर पसरा
 • अझोलाच्या रोपांवर तात्काळ पाणी शिंपडावे
 • एका आठवड्यात अझोलाची रोपे बेडवर सर्वत्र पसरतात आणि एखाद्या जाड्या चटईसारखी दिसतात
 • अझोलाची लवकर वाढ व्हावी आणि दररोज किमान 500 ग्राम इतके उत्पादन मिळावे यासाठी 5 दिवसांच्या अंतराने 20 ग्राम सुपर फॉस्फेट आणि सुमारे 1 किलो गाईचे शेण अझोलाच्या चरात मिसळा
 • अझोलातील खनिज घटकांची वाढ होण्यासाठी मॅग्नेशियम, लोह, तांबे, गंधकयुक्त मायक्रोन्यूट्रिंट मिक्स आठवड्यातून एकदा मिसळा
 • 30 दिवसांतून एकदा सुमारे 5 किलो बेड माती ताज्या मातीने बदलावी
 • दर 10 दिवसांनी 25 ते 30 % पाणी बदलावे
 • बेड स्वच्छ ठेवावा, पाणी व माती बदलावी आणि दर सहा महिन्यांनी नवीन अझोला लावावा

कापणी

826592920_7_1000x700

 • लागवडीनंतर 10 ते 15 दिवसांत अझोलाची भरघोस वाढ झालेली दिसून येईल
 • एखाद्या चाळणी किंवा ट्रेच्या मदतीने कापणी केले जाऊ शकते
 • दररोज सुमारे 500-600 ग्राम अझोलाची कापणी होऊ शकते
 • कापणी केलेला अझोला ताज्या पाण्याने धुवावा

जनावरांना खाऊ घालण्याची पद्धत

ओला अझोला

 • दररोज साधारणपणे 1 ते 1.5 किलो (जास्त 2 किलो)अझोला प्रत्येक जनावरास खाऊ घालावा
 • सुरवातीस पशुखाद्यात / आंबवणामध्ये 1:1 या प्रमाणात मिसळून आणि त्यानंतर पशुखाद्याशिवाय अझोला खाऊ घालावा

सुका अझोला (अझोलामिल)

 • अझोला सुकवल्यानंतर दहा टक्के प्रमाणात पशुखाद्यात मिसळून वापरावा

अझोलाच्या उत्पादनासाठी येणारा खर्च

घटक खर्च
विटा रु 500
यूव्ही स्टॅबिलाइझ्ड शीट रु 600
सुपीक माती रु 80
गाईचे शेण रु 30
खते रु 500
अझोलाकल्चर रु 100
एकूण रु 1810

 

अझोलाकल्चर मिळवण्यासाठी संपर्क

Related posts

Shares