Search

अननस लागवड

अननस लागवड

buttons eng-min

अननस या फळाची लागवड दमट उष्ण कटिबंधाच्या प्रदेशात केली जाऊ शकते.  जर वातावरण आणि तापमान पोषक असेल तर किनारपट्टी बरोबरच किनारपट्टीपासून दुर असलेल्या भागातही या पिकाची यशस्वी लागवड केली जाऊ शकते. या पिकासाठी साधारण पाने ४० अंश तापमान व १०० ते १५० सें. मी पावसाची आवश्यकता असते. योग्य प्रकारे पाण्याचे नियोजन केले असता मध्यम पाऊस असलेल्या भागातही अननस लागवड करता येऊ शकते.

जमीन आणि मशागत :

वालुकामय चिकणमाती या पिकासाठी अतिशय योग्य समजली जाते. नांगरणी आणि विरळणी करून नंतर जमीन समतल करून घ्यावी. जमिनीचा पोत लक्षात घेऊन साधारण ९० सें.मी लांब आणि १५३० सें.मी. खोल चर तयार करून घ्यावे.

लागवडीचा कालावधी :

pineapple image2

महाराष्ट्रात या पिकाची लागवड ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यात केली जाते. मान्सून च्या आगमनाप्रमाणे ठिकठिकाणी या पिकाची लागवड कधी करावी याचा कालावधी बदलू शकतो. या आसाम मध्ये ऑगस्ट ते ऑक्टॉबर महिन्यात तर केरळ आणि कर्नाटकात लागवडीसाठीचा उत्तम कालावधी एप्रिल ते जून मानला जातो. मुसळधार पावसादरम्यान लागवड टाळावी. पश्चिम बंगालच्या उत्तर भागात ऑक्टॉबर ते नोव्हेंबर तर काही भागात जून जुलै मध्ये या पिकाची लागवड केली जाते.

लागवडीची पद्धत :

pineapple image3

लागवड करताना जमीन चांगली नांगरून, कुळवून 30 ते 40 सें.मी. खोल भुसभुशीत करावी. हेक्‍टरी 20 टन शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. या पिकाची लागवड ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात चरात केली जाते. त्यासाठी 30 सें.मी. खोलीचे, तीन ते चार मीटर लांब चर तयार करावेत. दोन चरांतील अंतर 90 सें.मी. ठेवावे. चरातील दोन रांगांतील अंतर 60 सें.मी. ठेवावे. दोन झाडांतील अंतर 15 सें.मी. ठेवावे. विरळ लागवडीमध्ये 30 ते 45 सें.मी.पर्यंत ठेवावे. लागवड जवळ केल्यास लहान आकाराची फळे मिळतात.

pineapple image1

लागवड करताना झाडाच्या आतील पोंग्यांत माती जाणार नाही याची काळजी घ्यावी. हे पीक बागायती असल्याने कोकणपट्टीत नारळाच्या बागेत लागवड करता येते.

pineapple parts2

अननसाची लागवड फुटवे, फळाचा मूळ दांडा व पाने यामध्ये वाढणारा फळाखालील कोंब आणि फळावरील शेंडे यापासून करतात. फुटवे वापरून लागवड केल्यास 18 ते 22 महिन्यांत फळे तयार होतात. फळाखालील कोंब व फळावरील पानाच्या शेंड्याचा वापर लागवडीसाठी केल्यास फळे अनुक्रमे 22 ते 24 महिन्यांत तयार होतात. लागवड करताना रोपे बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून लावावीत.

अननसाच्या जाती :

pineapple images

अननसाच्या क्यू, क्वीन, मॉरिशिअस आणि जायंट क्यू या जाती प्रचलित आहेत.

Related posts

Shares