Search

राज्यात अवकाळी पावसाची शक्यता!

राज्यात अवकाळी पावसाची शक्यता!

गेली तीन वर्ष महाराष्ट्रातले शेतकरी अवकाळी पाऊस आणि गारपीट यासारख्या नैसर्गिक संकटांनी बेजार झाला होता. सध्या राज्यात तापमानामध्ये वेगाने वाढ झालीय. फेब्रुवारी महिन्यातच सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झालीय. दिवसाच्या तापमानाबरोबरच रात्रीच्या तापमानातही कमालीची वाढ झालीय. एकूणच राज्यात आणि देशातील तापमान आणि हवामानात वेगानं बदल होत आहेत. यामुळे राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे.

लक्षद्वीप आणि दक्षिणेत कर्नाटक किनापट्टी तसेच अरबी समुद्राचा आग्नेयकडील भाग ते उत्तर मध्य महाराष्ट्र या दरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळेच पुढील आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.यामुळे पुणे परिसरात ढगाळ वातावरण राहणार असून रविवार ते मंगळवार दरम्यान विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे. 6 ते 8 मार्चदरम्यान पाऊस होण्याची शक्यता आहे.

दरम्यान विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात नर्सरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झालीय. ४ मार्च म्हणजेच शनिवार पर्यंत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. असे असले तरी अवकाळी पावसाच्या हवामान खात्याच्या अंदाजाने शेतकऱ्यांची चिंता चांगलीच वाढली आहे.

गेल्या वर्षीही फेब्रुवारीमध्ये गारपीटीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे यावर्षी शेतकरी बांधवांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. काढणीला आलेल्या पिकांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. काढणीला आलेल्या पिकांची काढणी करुन आठवडाभरासाठी सावध राहण्याचा रहावं, असं आवाहन हवामान खात्यानं केलं आहे. पिकांचं संरक्षण करण्यासाठी पूर्व उपाययोजना म्हणून कृषी विभाग किंवा तज्ज्ञांची मदत घेऊन शेतकऱ्यांनी अंमलबजावणी करणं गरजेचं आहे.

शेतकऱ्यांनी या गोष्टींची काळजी घ्यावी

  • सध्या अनेक ठिकाणी गहू काढणीला आला आहे. त्यामुळे गहू तातडीने काढून घ्यावा.अन्यथा पाऊस झाल्यास त्याचा फटका बसू शकतो.
  • कापसाची साठवणूक केलेली असेल,तर त्याची विक्री करावी आणि शेतातील शिल्लक कापूस लवकरात लवकर काढून घ्यावा.
  • अवकाळी पावसाअगोदर जनावरांची काळजी सोय करुन ठेवणं सर्वात महत्वाचं आहे.
  • जनावरांसाठी चांगल्या आणि टिकाऊ गोठ्याची सोय केल्यास ऐन पावसात जनावरांना त्रास होणार नाही.
  • कांद्याची साठवणूक सुरक्षित ठिकाणी करावी.
  • गारपीट झाली तर द्राक्षाला मोठा फटका बसू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पूर्व उपाय करणं गरजेचं आहे.

Related posts

Shares