Search

आंब्याची कलमे – भाग २

आंब्याची कलमे – भाग २

buttons eng-min

आंब्याची कलमे या लेखाच्या मागील भागात आपण कोय कलमया कलाम प्रकाराबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली.

Untitled-1

याव्यतिरिक्त देखील आंब्याची कलमे करण्याचा अनेक पद्धतींचा अवलंब केला जातो. यामध्ये व्हिनिअर कलमआणि मृद्काष्ठ कलमया दोन कलम प्रकारांचा समावेश आहे. दर्जेदार आंबा उत्पादनात महत्वपूर्ण अशा या दोन कलम प्रकारांची विस्तृत माहिती जाणून घेऊया.

व्हिनिअर कलम :

Untitled-2

 • या पद्धतीत आठ ते दहा महिने वयाची रोपे खुंट म्हणून वापरतात.
 • या खुंटावर एका बाजूस सुमारे 15 सें.मी. वर पाच ते सात सें.मी. लांबीचा तिरकस उभा काप घ्यावा. या कापाची खोली खुंटाच्या जाडीच्या एक तृतीयांशापेक्षा जास्त नसावी.
 • या कापाच्या खालच्या टोकास थोडासा आडवा व तिरकस काप घेऊन साल व आतील भाग काढून घ्यावा.
 • मातृवृक्षाच्या काडीवर पाच ते सात सें.मी. आकाराचा तिरकस काप घ्यावा आणि ही फांदी खुंटावर दिलेल्या कापावर व्यवस्थित बसवून घ्यावी.
 • हा जोड पॉलिथिनच्या पट्टीने घट्ट बांधून घ्यावा. सुमारे वीस दिवसांत काडीला नवीन फूट येते.
 • ही फूट पाच ते सात सें.मी. वाढल्यानंतर जोडावर असलेला खुंटाचा शेंडा कापून टाकावा.
 • आंब्यामध्ये ही कलमे करण्याची योग्य वेळ फेब्रुवारी ते एप्रिल असून, या पद्धतीत सुमारे 60 टक्के यश मिळते.

मृद्काष्ठ कलम :

Untitled-3

 • या पद्धतीने आंबा, काजू, फणस, चिकू, कोकम इत्यादी फळझाडांची अभिवृद्धी करता येते.
 • या पद्धतीत व कोय कलम करण्याच्या पद्धतीत कोणताही बदल नाही.
 • या पद्धतीत खुंट म्हणून वापरले जाणारे रोप उंच वाढलेले आणि आंब्यामध्ये तीन महिने वयाचे, पहिली फूट जून झाल्यावर, तर काजूमध्ये 45 ते 60 दिवसांची असते. या रोपावर येणाऱ्या नवीन शेंड्याकडील कोवळ्या फुटीवर कलम केले जाते.
 • या पद्धतीने जेथे पाण्याची दुर्भिक्षता आहे अशा डोंगर उताराच्या जागेवरच दोन ते तीन रोपे (खुंट) वाढवून त्यावर मृद्‌काष्ठ पद्धतीने कलम करून घेता येते.
 • कोरड्या आणि उष्ण हवामानामध्ये तेथे लावलेल्या कलमांची मोठ्या प्रमाणावर मर होते अशा ठिकाणी या पद्धतीने कलमे करावीत.
 • कलमे करण्यासाठी आंब्यामध्ये फेब्रुवारी ते एप्रिल हा काळ योग्य आहे, तर काजूमध्ये थंडीचा हंगाम वगळता वर्षभर केव्हाही कलमे करता येतात.
 • या पद्धतीत सुमारे 85 टक्के यश मिळते.

Related posts

Shares