Search

आंब्याची कलमे

आंब्याची कलमे

buttons eng-minसध्या पाऊस चांगलाच खुलला आहे. कोकणात मान्सून चांगला बरसतो आहे. एकूणच हे वातावरण कोणत्याही शेती कामासाठी योग्य असाच आहे. आंबा हे कोकणातले महत्वाचे पीक. जगभरात कोकणातील हापूस आंबा या फळाला प्रचंड प्रमाणात मागणी आहे. जागतिक स्तरावर या फळाची मागणी दिवसागणिक वाढत आहे. अशावेळी कमी कालावधीत अधिकाधिक उत्पन्न मिळावे यासाठी विविध प्रकारे कलमं विकसित केली जातात. सध्याचं वातावरण हे त्यासाठी पोषक आहे. ‘आंब्याची कलमेया लेखात आपण विविध कलामांचे विविध प्रकार जाणून घेणार आहोत. पहिल्या भागात आपण कोय कलामया महत्वपूर्ण आणि दर्जेदार उत्पन्न देणाऱ्या कलम प्रकारची विस्तृत माहिती घेऊया.

कोय कलम :

  • आंब्याच्या अभिवृद्धीसाठी ही साधी व सोपी पद्धत असून, मोठ्या प्रमाणावर दर्जेदार कलमे लागवडीस तयार होतात. या पद्धतीत सुमारे 50 टक्के यश मिळते.
  • यासाठी मे ते जुलै हा कालावधी योग्य आहे. या पद्धतीत गादीवाफ्यावर कोयी रुजवून 12 ते 20 दिवसांचे रोप मुळासकट कोयीसह काढून घ्यावे. अशा रोपांची पाने पूर्ण उघडलेली नसावीत.
  • पाने व देठांचा रंग तांबडा असावा. रोपाचा खालचा सात ते नऊ सें.मी.चा भाग ठेवून शेंडा छाटावा. कापलेल्या टोकामधून सुमारे चार ते सहा सें.मी. लांबीचा काप बरोबरमध्ये घ्यावा.
  • ज्या जातीची कलमे करावयाची असतील तिची तीन ते चार महिने वयाची, जून, निरोगी आणि डोळे फुगीर, परंतु न फुटलेली 10 ते 15 सें. मी. लांबीची काडी कापून घ्यावी.
  • काडीवरील सर्व पाने कापून टाकावीत आणि काडीच्या खालच्या बाजूस चार ते सहा सें.मी. लांबीचे दोन तिरकस काप विरुद्ध बाजूला देऊन पाचरीसारखा आकार द्यावा.
  • त्यानंतर ही काडी रोपावर दिलेल्या कापात व्यवस्थित बसवावी. काडीची जाडी जास्त असल्यास काडीची एक बाजू रोपाच्या सालीस जुळवून घ्यावी आणि कलमाचा जोड दोन सें.मी. रुंद व 20 सें. मी. लांबीच्या पॉलिथिनच्या पट्टीने घट्ट बांधून घ्यावा.
  • ही कलमे 14 x 20 सें.मी. आकाराच्या पॉलिथिनच्या पिशवीत लावावीत. लावताना कलमांचा जोड दोन ते पाच सें.मी. मातीच्या वर राहील याची काळजी घ्यावी.
  • ही कलमे ऊन आणि पाऊस यांच्यापासून संरक्षण म्हणून शेडमध्ये ठेवावीत. दर दिवशी गरजेनुसार कलमांना पाणी द्यावे, मात्र पाणी कलमांच्या जोडात जाणार नाही याची काळजी घ्यावी.
  • कलम बांधल्यापासून 15 ते 20 दिवसांत काडीला नवीन फूट येते. नवीन वाढणाऱ्या फुटीला काठ्यांनी आधार द्यावा, तसेच जोडाच्या ठिकाणी बांधलेली पट्टी सुमारे दोन ते तीन महिन्यांनी काढून टाकावी.

संदर्भ – नॅशनल हॉर्टीकल्चर बोर्ड – भारत सरकार 

Related posts

Shares