Search

आपत्कालीन परिस्थितीत पीक व्यवस्थापन.

आपत्कालीन परिस्थितीत पीक व्यवस्थापन.

images
जून महिना जवळ आला कि आपल्या मान्सूनचे वेध लागतात आणि मग आपली खरीपातील लागवडीसाठी लगबग सुरु होते. महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसाला शेतीच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. महाराष्ट्रात साधारणपणे जून च्या पहिल्या आठवड्यात पावसाची सुरुवात होते. परंतु हाच पाऊस अनिश्चित काळी, विखरून, विषम प्रमाणात पडल्यामुळे शेतकऱ्याच्या खारीपातीलच नव्हे तर संपूर्ण वार्षिक पिक नियोजनामध्ये अडचणी निर्माण होतात. पाऊस नियोजित वेळेत पडला नाही तर खरिपातील पेरण्या वेळेवर होत नाहीत अशा परिस्थितीत पर्यायी पिक नियोजन फायाद्य्याचे ठरते. अशा वेळेस कोणती पिके घ्यावीत व त्यांचे व्यवस्थापन कसे करावे यावर एक दृष्टीक्षेप टाकुया.

१ जुलै ते १५ जुलै पर्यंत पाऊस सुरु झाल्यास : सोयाबीन ,कापूस, संकरीत ज्वारी व बाजरी, तूर (विपुला जात), सुर्यफुल,घेवडा(वरूण जात) तीळ इ . पिकांची पेरणी करण्यात य़ावी. कांदा (रांगडा ) रोपवाटिका तयार करवी.

१६ जुलै ते ३१ जुलै पर्यंत पाऊस सुरु झाल्यास : सुर्यफुल बाजरी,तूर,तीळ, हुलगा, एरंडी इ. पिकांची लागवड करावी.

१ आगस्ट ते १५ आगस्ट : सुर्यफुल, तूर, एरंडी, तीळ, हुलगा यांची पेरणी करवी. कांदा (रांगडा ) (बसवंत ७८० वाण व फुले समर्थ वाण ) रोपवाटिका तयार करवी.

१६ आगस्ट ते ३१ आगस्ट : सुर्यफुल, तूर, एरंडी, तीळ यांची पेरणी करवी. कांदा (रांगडा ) रोपवाटिका तयार करवी.
पूर्वमशागत :पिकांची पूर्वमशागत शास्त्रीय पदधतीने करावी म्हणजेच रुंद सारी वरंबे तयार करावेत त्यात पावसाचे पाणि जीरवून जलसंधारण होऊन उत्पादनात वाढ होईल.
बियाणांची वाणांची निवड : बियाणे / वाण कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेलेच वापरावे. या वानांमध्ये वाणांमध्ये पाण्याचा ताण सहन करणाऱ्या जातींचा वापर करावा. उदा. घेवडा – वरुण , कांदा – बसवंत -७८०, तूर विपुला या जातींना प्राधान्य द्यावे.

बियाणांवर योग्य प्रक्रिया करून शास्त्रीय पद्धतीने नियोजित अंतर ठेवून पेरणी करावी .
Raised bed
आंतरमशागत : पिक पेरणीनंतर तीन आठवड्यांनी १५ दिओलाव्याचे वसाच्या अंतअ राने कोळपण्या करव्यात. कोळपणिमुळे तण नियंत्रण होऊन जमिनीतील भेगा बुजून ओलाव्याचे बाष्पीभवन त्वरित कमी होण्यास मदत होते.
शक्य असल्यास पिक उगवून आल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत तुरकाठ्या, ज्वारीची धसकटे, वाळलेले गावात, गव्हाचा भुसा, उसाचे पाचट इ सेंद्रिय आच्छादनाचा वापर करावा.
आपत्कालीन परिस्थितीत पिक वाचवण्यासाठी, उपलब्ध पाण्याचा वापर करण्याकरता ठिबक/तुषार या आधुनिक सुक्ष्म सिंचनाचा वापर करून पिकांच्या संवेदनशील अवस्थेत संरक्षीत पाणि द्यावे.
Organic Mulcing
पीक वाढीच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास ८% केवोलीन पावडर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्याचा सूर्यप्रकाश परावर्तक म्हणुन उपयोग होतो.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये पिकांची एकाआड एका पीक कढुन विरळणी करावी.
अवर्षण परीस्थितीत रासायनिक रासायनिक खतांचा वापर टाळुन सेंद्रिय खतांचा जादा वापर करावा.
बागायती क्षेत्रात बी.टी. कपाशीसाठी १०० ग्रेम डी.ए.पी. आणि सुक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत २५ मिली. प्रती १० लि. पाण्यातुन ८ दिवसाच्या अंतराने आलटून पालटून दोन वेळ फवारण्या करव्यात.
अवर्षण परिस्थितीत रोग -किड नियंत्रणासाठी एकात्मिक रोग किड व्यवस्थापन अधिक उपयुक्त ठरते. त्याकरिता पेरणीपूर्वी बिजप्रक्रीया, विशिष्ट साफ़ळा पीके, रस शोषण करणाऱ्या किडींसाठी कामगंध साफळे, निंबोळी अर्काची फवारणी यांचा एकत्रित वापर करावा.
आडसाली /पूर्व हंगामी/सुरु ऊसास पाण्याचा ताण पडल्यामुळे ऊस सुकू लागल्यास सदर ऊस पिकाचा उपयोग जनावरांचा चारा म्हणून करावा. त्यानंतर त्याच उसाचे पाऊस पडटाच खोडवा व्यवस्थापन करावे.

Related posts

Shares