Search

उन्हाळ्यातील केळी बागेचे संरक्षण

उन्हाळ्यातील  केळी बागेचे संरक्षण

buttons eng-min

उन्हाळ्यात केळी बागेचे संरक्षण

सध्या उन्हाळ्यात तापमान वाढ होताना दिसून येत आहे. तसेच काही भागांत ढगाळ हवामान आहे, काही ठिकाणी पाऊस अशी परिस्थिती असली तरी वातावरणातील उष्मा कमी होत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या वाढत्या तापमानाचा सामना सगळ्यांनाच करावा लागतो आहे. विविध पिकांवर याचा प्रभाव जाणवतो आहे. या परिस्थितीत केळी बागेत योग्य नियोजन कसे करावे, मर्यादित पाणी कसे वापरावे, फळांची आणि झाडाची काळजी कशी घ्यावी? हे जाणून घेऊया.

पाण्याचे व्यवस्थापन :

सद्य स्थितीत महाराष्ट्रात पाणी टंचाईचे संकट अधिक गहन झाले आहे. अशावेळी प्रचलित पद्धत टाळून जर ठिबक सिंचनाच्या माध्यमातून जर केळी बागेतील रोपांना जर ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी दिले गेले तर याचा निश्चित फायदा होऊ शकेल. अशाप्रकारे पाणी दिल्याने २५ ते ३० % पाण्याची कपात होईलच याशिवाय उत्पादनातही १० ते १५% वाढ होऊ शकते. सकाळी लवकर दोन तास आणि संध्याकाळी दोन तास अशा दोन पाळ्यांमध्ये पाणी दिल्यास उत्तम निकाल मिळतात.

अच्छादनाचा वापर (मल्चिंग):

Bananna Mulch

पाण्याची बचत करण्यासाठी तसेच बाष्पीभवन टाळण्यासाठी जमिनीवर दोन ओळींमध्ये आच्छादन पसरावे. यासाठी गव्हाचा कमीव सोयाबीनचा भुसा, उसाची पाचट, केळीची वाळलेली निरोगी पाने यांचा वापर करणे शक्य आहे. असे केल्याने पाण्याची बचत होईलच याबरोबरच तण नियंत्रण होऊन आंतरमशागतीचा खर्च कमी होईल.

उष्ण वाऱ्यापासून बागेचे संरक्षण: स्कर्टिंग

Banana Leaf

अति तापमानामुळे उन्हाळ्यात गरम वारे वाहत असतात साहजिकच यामुळे बागेतील तापमान वाढते. यामुळे पाने फाटून बागेचे नुकसान होते.

Banana Skirting

बागेचे वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी बागेच्या चारही बाजूने शेवरी, गजराज गवत यांची तीन चार ओळीत लागवड करावी. यामुळे बागेत आर्द्रता वाढून अंतर्गत तापमान कमी होऊ शकते. याला नैसर्गिक पद्धतीचे स्कर्टिंग म्हणता येईल.

घडांची काळजी:

उन्हाळ्यात गरम हवा आणि पाण्याची असमानता यामुळे घड बुंध्यापासून सटकतात.

Bunch Side Emergence

तसेच उन्हामुळे घडाच्या दांड्यावर काळे चट्टे तयार होतात, त्याजागी दांडा मोडतो. यामुळे आर्थिक नुकसान होते. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी घड पानाने झाकून घ्यावेत. वाळलेल्या पानाची पेंढी करून घडाच्या दांड्यावर बांधावी. किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपण ८० ते ९० % सावली देणाऱ्या हिरव्या शेडनेट चा वापर करू शकता. यामुळे घडाला तीव्र उन्हाचा परिणाम होणार नाही.

संदर्भ –  अॅग्रोवन

Related posts

Shares