Search

एकात्मिक कीड व्यवस्थापन – भाग 2

एकात्मिक कीड व्यवस्थापन – भाग  2

एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करून विविध रोग तसेच किडींवर नियंत्रण मिळविता येते. असे केल्याने नुकसानावर नियंत्रण मिळविणे शक्य होते. मागील भागात आपण प्राथमिक उपाययोजनांचा आढावा घेतला. या भागात आपण अधिक महत्वाच्या पैलूंचा आढावा घेऊया.

उपयुक्त बुरशींचा वापर : निर्जंतुकीकरण केल्यानंतर उपयुक्त बुरशी – उदाहरणार्थ. ट्रायकोडर्मा, फ्लोसिलोमायसिस जमिनीत मिसळाव्यात (२०० ग्रॅम / चौ. मी.). त्यामुळे रोग निर्माण करणाऱ्या बुरशी तसेच सूत्रकृमी यांचे प्रभावी नियंत्रण होते.

कीड रोगप्रतिकारक वाणांची लागवडीसाठी निवड : पिकांची लागवड करण्यापूर्वी त्या विभागामध्ये येणाऱ्या किडींची माहिती करून घेणं गरजेचे आहे. एखाद्या किडीची किंवा रंगाची तीव्रतेत त्या विभागात अधिक असल्यास लागवडीसाठी कीड. रोगप्रतिकारक जातीचहक वापर करावा. बियाणे खरेदी करण्यापूर्वी सदरचे वाण हे किडीस व रोगास प्रतिकारक आहेत किंवा नाहीत याबाबतची माहिती पुरवठादाराकडून घेणे अत्यंत महत्वाची बाब आहे.

कामगंध चिकट सापळ्यांनाच वापर : घाटे अळी व पाने खाणारी अळी या किडीसाच्या नार पतंगाला आकर्षित करण्यासाठी कामगंध सापळ्यांचा अवलंब करावा.  तसेच पांढरी माशी, मावा, नागअळी यांच्या सर्वेक्षण व नियंत्रणासाठी पिवळ्या रंगाच्या चिकट सापळ्यांचा वापर करावा. याशिवाय फुलकिडे या किडीचे सर्वेक्षण व नियंत्रण करण्यासाठी निळ्या रंगाचे चिकट सापळे वापरावेत व त्या द्वारे किडींचे व्यवस्थापन करावे.

सापळा पिकांचा वापर : किडीस आकर्षित करून घेणाऱ्या सापळा पिकांची लागवड मुख्य पिकात करून घ्यावी. उदाहरणार्थ, घाटे अळी, नाग अळी व फुलकिडे या किडींना आकर्षित करण्यासाठी झेंडूचा वापर करावा. असे केल्यामुळे उपद्रवाची पूर्वसूचना मिळून, किडीचे वेळीच नियंत्रण करणे शक्य होते.

जैविक नियंत्रण : एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीमध्ये जैविक  नियंत्रण हि एक अत्यंत महत्वाची कीड  नियंत्रण पद्धती आहे. यामध्ये परोपजीवी कीटक. भक्षक कीटक, सूक्ष्म जिवाणू, विषाणू, बुरशी वैगरेंचा समावेश होतो. निसर्गात त्यांची अगणित संख्या असते. सदर उपयुक्त कीटकांचा वापर करून कीड नियंत्रण प्रभावीरीत्या करता येते. अशा मिता कीटकांचा प्रथम शोध घेण्यात येतो व नंतर त्यांना प्रयोगशाळेत दाखल करण्यात येते. येथे त्यांचे संगोपन करण्यात करण्यास समर्थ आहेत किंवा नाही, जिवाणू, विषाणू, पर्यावरण, मानव तसेच इतर पाळीव प्राण्यांना हानिकारक ठरणार नाही यांची काळजी घेतली जाते आणि त्यांचे संगोपन  करण्यासाठी येणार ख्रर्च कमीतकमी यावा या सर्व बाबींचा अभ्यास करण्यात येतो. त्यानंतरच मित्र- कीटकांचा नियंत्रणासाठी निसर्गात वापर केला जातो. उदा : पांढरे ढेकूण. या किडीच्या नियंत्रणासाठी ऑस्ट्रेलियन बिटल या मित्र कीटकांचा वापर केला जातो. तसेच हानिकारक बुरशींचा नायनाट करण्यासाठी ट्रायकोडर्मा बुरशीचा वापर केला जातो .

तण नियंत्रण : तणांमुळे किडी बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाढतात. विविध प्रकारच्या किडींचे तणनावर संगोपन होत असते. तसेच तणे मुख्य पिकाशी खते व पाण्यासाठी स्पर्धा करतात. त्यामुळे पिकांची वाढ चांगली होत नाही व पर्यायाने उत्पादनात मोठी घट येते. त्यामुळे एकात्मिक कीड नियंत्रणामध्ये तणांचा नायनाट करणे या बाबीस महत्वाचे स्थान आहे.

बहुतेक रोगकारक जिवाणू मुख्य यजमान पिकांच्या अनुपस्थितीत रानटी तणांवर जगतात. नंतर हे रोगकारक जिवाणू मुख्य पिकाच्या विशिष्ट अवस्थेत रोगाची लागण करतात. उदाहरणार्थ, गव्हावरील काली तांबेरा, बाजारीवरील अरगट, काकडीवरील भुरी रानटी काकडीवर्गीय तणांवर जगतात. म्हणून रोगांची लागण होण्यापूर्वी पर्यायी तण यजमानांना नाश करणे आवश्यक आहे.

Related posts

Shares