Search

एकात्मिक कीड व्यवस्थापन – भाग १

एकात्मिक कीड व्यवस्थापन – भाग १

कीड नियंत्रणाच्या विविध पद्धती आहेत. या सर्व पद्धतीचा वापर करून किडींची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीखाली आणण्यासाठी करावयाची उपाययोजना हि एक नवीन पद्धत आहे. यालाच एकात्मिक कीड व्यवस्थापन असे म्हणतात. हि पर्यावरणाचा समतोल साधणारी एकमेव पद्धत आहे.

एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करून आपण कीड, रोग, तणे इत्यादींचा प्रभावीपणे नायनाट करू शकतो. एकात्मिक कीड व्यवस्थापनेमध्ये प्रामुख्याने पुढील बाबींचा समावेश असणे अत्यंत महत्वाचे आहे.

कीड रोग नियंत्रणापुर्वी ओळख करून घेणे : आपणांस हानिकारक व उपयुक्त कीटकांचा परिचय होणे गरजेचे आहे. हानिकारक व उपयुक्त कीटकांचा परिचय होण्यासाठी कृषी विद्यापीठातील कीटक संगोपनगृहास भेट देणे किंवा तालुका पातळीवर कृषी खात्यामार्फत असलेल्या योजनांचा अवलंब करून प्रथम मित्र-कीटक व शत्रू-कीटकांचा परिचय असणे गरजेचे आहे. अन्यथा काट्याने काटा काढणे या पद्धतीचा अवलंब करणे अवघड जाते.

मशागतीचे पाद्धतीचा वापर करणे : सदरच्या पद्धतीचा अवलंब केल्यास आपण विविध प्रकारच्या किडींचे, रोगांचे व ताणाचे नियंत्रण प्रभावीरीत्या नियोजपूर्व करू शकतो. उदाहरणार्थ, जमिनीला खोल नांगरट देणे. जमिनीमद्ये अंडी, अळी, कोष, पतंग इत्यादी अवस्था असतात. नांगरट केल्याने सदरच्या अवस्थानाचा सूर्यप्रकाशामुळे किंवा पक्ष्यांमुळे संहार होतो व कीड, रोग, तणांचा प्रसार मुख्य पिकात होत नाही.

पिकांची फेरपालट : एकाच प्रकारातील किंवा कुळातील पिकांची लागवड करू नये कारण किडीस किंवा रोगास स्टेट अन्नपुरवठा होतो व किडी रोगांचा प्रादुर्भाव अधिक होतो. उदाहरणार्थ, भेंईड, तूर, हरभरा, टोमॅटो आदी पॆकांवर घाटे अळीची उपजीविका होते. या पिकानंतर कपाशीचे पीक घेऊ नये. अन्युअथा घाटे अळीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होतो.

पेरणीच्या वेळात बदल : विभागवार पेरणीची एकाच वेळ ठरवून पीक घ्यावे. अन्यथा एका विभागातील किडीचे नियंत्रण करणे अवघड जाते. यालाच ‘झोनल सिस्टीम ऑफ प्लॅंटींग’ असे म्हटले जाते.

शेतीतील स्वच्छता मोहीम : पीक परिसर स्वच्छता करणे अत्यंत महत्वाचे असते. उदाहरणार्थ, वांगी या पिकावर शेंडा व फळ पोखरणारी अळी या किडींचा उपद्रव होतो. वांगी फळांची काढणी झाल्यानंतर कीडग्रस्त फळे बांधावर किंवा पिकाजवळच फेकली जातात. त्यातूनच किडींची पुनर्लागवण होत असते. असे होऊ नये म्हणून प्रथम किडकी फळे व शेंडे (अळीसहीत) काढू त्यांचा नॅश करावा.

मातीचे निर्जंतुकीकरण : मातीतून, मातीशी संबंधित असणाऱ्या साधनांद्वारे कीटक, बुरशी, सूत्रकृमी व विविध तानांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते . ते टाळण्यासाठी जमिनीचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक  आहे. तयासाठी वाफेद्वारे किंवा उन्हामध्ये जामीन तापवून निर्जंतुकीकरण करता येते. उन्हाळ्यात गादीवाफ्यावर एल.डी .पी. ई. प्लास्टिकचे(२५ मायक्रॉन) १५ दिवस आच्छादन करावे किंवा डॅझोमेट या दाणेदार कीटकनाशकाचा ४० ग्रॅम प्रति चौरस मित्र या प्रमाणात वापर करावा.

Related posts

Shares