Search

कांदा साठवण तंत्रज्ञान

कांदा साठवण तंत्रज्ञान
[Total: 25    Average: 3/5]

कांदा हे महाराष्ट्रातील शेतक-यांचे महत्वाचे पिक नगदी पिक आहे.कांदा हा नाशवंत आहे. कांद्याला कोंब येणे, कांदा सडणे, वजन कमी होणे इत्यादी नुकसान होण्याची शक्यता असते.जर कांदाचाळ शास्त्रोक्त पद्धतीने उभारली गेली तर कांदा ४ ते ५ महिन्यापर्यंत सुस्थितीत राहू शकतो.कांदाचाळीची तंत्रशुद्ध उभारणी पद्धत जाणून घेऊ.

कांदा चाळीची उभारणी

onion-storage-structure

 • जमिनीच्या प्रकारानुसार आवश्यक तेवढा पाय खोडून आराखड्यामध्ये दर्शविल्यानुसार सिमेंट कॉन्क्रीटचे पिलर,कॉलम उभारणे आवश्यक आहे.
 • ज्या जागेवर कांदा साठवायचा आहे त्या जागेचा पृष्ठभाग जमिनीपासून 1.5 ते 3 फुट उंच असणे आवश्यक आहे.जर एखाद्या ठिकाणी आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल तर अशा ठिकाणी हवा खेळती राहण्यासाठी मोकळी जागा सोडावी.
 • मात्र, ज्या ठिकाणी उष्ण हवामान असेल त्याठिकाणी खालील बाजूस मोकळी हवा खेळती राहील याची दक्षता घेणे फायद्याचे ठरते.
 • पिलर किंवा कॉलम वर लोखंडी खांबाच्या मदतीने चाळीचा सांगाडा तयार करावा.
 • जर एक पाखी कांदा चाळणीची उभारणी करायची असेल तर दक्षिण-उत्तर आणि दुपाखी कांदाचाळीची उभारणी करायची असेल तर पूर्व-पश्चिम करावी.
 • कांदाचाळीच्या छपरासाठी  सिमेंटचे पत्रे किंवा मंगलुरू कवलांचा वापर करावा. जर पत्र्याला आतून बाहेरून सफेद रंग दिल्यास उष्णता मर्यादेत ठेवता येणे शक्य होते.
 • कांदाचाळीची निर्मीति करताना लांबी ४० फुट, प्रत्येक कप्प्याची दुपाखी चाळीसाठी ४ फुट रुंद, बाजूची उंची ८ फुट, मधली उंची ११. १ फूट, दोन ओळीतील मोकळ्या जागेची रुंदी ५ फूट,कांदाचाळीची एकूण रुंदी ४ + ५ + ४ = १३ फुट अशा रितीने कांदा चालीचे बांधकाम करताना आकारमान घ्यावीत. चाळीची आतील कप्प्याची रुंदी ४ फुट पेक्षा जास्त नसावी. ५० मे. टन क्षमतेच्या कांदाचालीसाठी लांबीचे प्रमाण दुप्पट करावे
 • कांद्याची साठवणूक फक्त ५ फुटापर्यंत करावी
 • चाळीच्या छतास पुरेसा ढाळ द्यावा
 • कांदा चाळीचे छत उन्हाळ्यामध्ये उष्णता प्रतिबंधक वस्तूंनी आश्चादीत करावे

कांदाचाळीची उभारणी करताना खालील गोष्टी टाळाव्यात

 • कांदाचाळीसाठी पानथळ/ खोलगट ठिकाणीची कच्चे रस्ते असणारी जमीन टाळावी
 • हवा खेळती राहण्यासाठी असलेले अडथळे दूर करावेत
 • कांदाचाळीलगत कोणतेही उंच बांधकाम असू नये
 • पावसाचा जोर ज्या बाजूला असेल किंवा वाऱ्याचा जोर अधिक असेल अशा ठिकाणी जागा बंद करण्याची व्यवस्था असावी

राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत कांदाचाळ अनुदान योजना

लाभार्थी-

 • कांदा उत्पादन शेतकरी
 • शेतकरी समुह, कृषि उत्पन्न बाजार समित्या,सहकारी संस्था
 • नोंदणीकृत कांदा उत्पादक सहकारी संस्था

अर्थसहाय्य-

 • निर्धारीत कांदाचाल बांधकाम खर्च रु.6000/- प्रति मे.टन.
 • अनुदान एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल रु.1500/- प्रति मे.टन.

या योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी किंवा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था किंवा पणन मंडळाचे मुख्य कार्यालय किंवा पणन मंडळाचे विभागीय कार्यालय पुणे,नाशिक,औरंगाबाद, लातूर, अमरावती, नागपूर यांच्याशी संपर्क साधावा-

मुख्य कार्यालय
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ,
प्लॉट नं.आर-7, मार्केट यार्ड, गुलटेकडी,
पुणे-411 037.
फोन नं.- 020-24261190, 24268297
विभागीय कार्यालय
नविन कॉटन मार्केट यार्ड,
एस.टी.स्टँड समोर, गणेशपेठ,
नागपूर 440 018
फोन – (0712) 2722997
विभागीय कार्यालय
जुने कॉटन मार्केट यार्ड आवार,
अमरावती 444 601
फोन – (0721)-2573537
विभागीय कार्यालय
कृषि उत्पन्न बाजार समिती,नाशिक,
मार्केट यार्ड, नाशिक
फोन – (0253) 2512176
विभागीय कार्यालय
जाफरगेट जवळ,बाजार समिती शॉपिंग सेंटर,
पहिला मजला,
औरंगाबाद
फोन – (0240)-2334168
विभागीय कार्यालय
कृषि उत्पन्न बाजार समिती,
लातूर ,मार्केट यार्ड,
लातूर.
फोन – (02382)212061

Related posts

Shares