Search

काकडीवर्गीय पिकांवरील रोगांचे व्यवस्थापन

काकडीवर्गीय पिकांवरील रोगांचे व्यवस्थापन

buttons eng-min

कलिंगड, खरबूज, काकडी ही पिके कीड व रोगास फारच संवेदनशील आहेत. या पिकांवर भुरी, केवडा व मर हे रोग आणि नागअळी, फुलकिडे व फळमाशी या किडींचे वेळीच नियंत्रण आवश्‍यक आहे. फवारणी करताना किडींची संख्या/आर्थिक नुकसानपातळी विचारात घेऊन गरज असेल तेव्हाच शिफारस केलेल्या रासायनिक कीडनाशकांचा वापर करावा.

विविध रोग

मर

हा रोग बुरशीमुळे होतो.  मर या रोगाचा प्रादुर्भाव केवळ कलिंगडामध्येच होतो. लागवडीनंतर साधारण २१ ते २५ दिवसांनी वेलाची एक बाजू वाळते व संपूर्ण पीक नाहीसे होऊ शकते.

केवडा

हा सुद्धा बुरशीजन्य रोग असून खूपच हानिकारक आहे. पानांच्या वरच्या बाजूने पिवळ्या रंगाचे लहान ठिपके तर पानांच्या खालच्या बाजूने पाहिल्यावर चिकट, ओले, फिकट हिरव्या रंगाचे ठिपके दिसतात. यामुळे पाने वाळतात.

भुरी

हा बुरशीजन्य रोग असून केवड्याप्रमाणे हाही खूपच नुकसानकारक आहे. यामध्ये पानांच्या दोन्ही भागांवर व खोडावर पावडरी सारखे लहान ठिपके दिसतात. हे ठिपके वाढत जाऊन संपूर्ण पानांवर खूप जलद पसरतात.

विविध किडे
नियंत्रणाच्या दृष्टीने ही कीड सर्वांत तापदायक आहे. किडीची मादी माशी पानांवर अंडी घालते. अंड्यांतून बाहेर पडलेली पिले व प्रौढ कीटक पाने, फुले व क्वचित खोड व फळे यामधील रस शोषून घेतात.फुलकिडे

पांढरी माशी

या किडीची मादी पानांच्या खालच्या बाजूला अंडी घालते. प्रौढ पानांच्या खालच्या भागावर मोठ्या संख्येने लपून राहतात व पाने व फुलांतील रस शोषतात. त्यामुळे फुले गळतात.

फळमाशी

खरबूज व कलिंगड या दोन फळांसाठी ही कीड अतिशय हानिकारक आहे. किडीची मादी माशी फळाच्या सालीमध्ये अंडी घालते. अंड्यांतून बाहेर पडलेल्या अळ्या फळांमध्ये शिरतात व आतील गर खातात.

एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन

मर रोगाच्या नियंत्रणासाठी- कॉपर ऑक्झिनक्लोरराईड (५० टक्के ईसी) २.५ ग्रॅम किंवा मेटॅलॅक्झीपल + मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून जमिनीतून द्यावे.

केवडा रोग नियंत्रणासाठी – मेटॅलॅक्झीकल अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) दोन ग्रॅम किंवा झायनेब (७ टक्के डब्ल्यूपी) ४ ग्रॅम.

भुरीच्या नियंत्रणासाठी – प्रोपिनेब (७० टक्के डब्ल्यूपी) १.५ ग्रॅम मि.लि. किंवा पेनकोनॅझोल (१० टक्के ईसी) १ मि.लि.

नागअळी  नियंत्रणासाठी-

रोपे लागवड करतांना लागण झालेल्या रोपांची किडग्रस्त पाने काढून टाकावीत.
रोपांवर वरचेवर कडू लिंबाच्या पानांच्या अर्काच्या ( 1 लिटर रस 9 लिटर पाण्यात) 2 ते 3 फवारण्या कराव्यात.
चिकट सापळ्याचा वापर करावा

नियंत्रणात्मक उपाय :
क्वीनॉलफॉस ५00 मिली ५00 लिटर पाणी किंवा असिफेट ६०० ग्रॅम

इतर उपाय

  • मागील पिकांचे अवशेष नष्ट करावेत व पिकांची फेरपालट करावी.
  • पीक नेहमी तणमुक्त ठेवावे.
  • रोगप्रतिकारक्षम जातींचा वापर करावा.
  • पूर्वी जर हे पीक मर रोगास बळी पडले असेल तर त्या जमिनीत पुढील पाच वर्षे हे पीक घेऊ नये.
  • पिकांवरील नुकसानीची लक्षणे लक्षात घेऊन कोणती कीड वा रोग आहे याची खात्री तज्ज्ञांच्या सल्ल्याने करून घ्यावी व त्यांच्या मार्गदर्शनानुसार नियंत्रणाचे उपाय योजावेत.

 

Related posts

Shares