Search

कापूस खत व्यवस्थापन

कापूस खत व्यवस्थापन
[Total: 169    Average: 3.1/5]

भारतात कापुस पिकाची लागवड ही प्रामुख्याने कोरडवाहु लागवड जी पावसाच्या पाण्यावर अवलंबुन असते, आणि बागायती लागवड केली जाते. भारतातील कापुस लागवडीचा हंगाम हा फेब्रुवारी ते जुलै असा आहे. कोरडवाहु लागवडीच्या कापसाची वाढ हि पुर्ण पणे पावसाच्या पाण्यावर अवलंबुन असते. वाणाचा कालावधी हा कमी ते मध्यम दिवसांचा असावा. जेणे करुन चांगला पाउस राहील त्या काळात कापसांस फुले येवुन जमिनीत असलेल्या ओलाव्यावर बोंडांची पक्वता मिळेल. कापूस या पिकासाठी विविध टप्प्यावर खतांचा वापर केला जातो. विविध पद्धतींद्वारे खत व्यवस्थापन कसे करावे हे जाणून घेणे फायद्याचे ठरेल.

कापुस पिकातील उगवाणीपुर्वीचे तणनियंत्रण :

कोरडवाहु वाण लागवड करण्यापुर्वी, शेतातील नेहमी येणा-या तणांचा अभ्यास करुन, रोप उगवणीपुर्वी वापरण्यायोग्य तणनाशके वापरुन, सुरवातीच्या काळातील तण नियंत्रण मिळवुन घ्यावे.  एखाद्या वेळेस पेरणीनंतर पाउस लागुन राहील्यास बरेच दिवस शेतात तणनियंत्रण मिळत नाही, आणि कापुस पिकांच्या वाढीवर याचे दुष्परिणाम होतात. उगवणीपुर्वी वापरण्यासाठी पेन्डीमेथिलिन (टाटा पनिडा वै. नावांनी उपलब्ध आहे) हे एक चांगले तणनाशक आहे. हे तणनाशक पेरणीच्या १४० दिवस आधी तसेच पेरणीच्या ७ ते १० दिवस आधी देखिल वापरता येते. वापरानंतर हे तणनाशक जमिनीत २ ते ३ इंच खोल अंतरावर चांगले एकत्र करुन टाकावे. पेंडीमेथिलिन, सारखेच ट्रायफ्लुरॅलिन हे तणनाशक देखिल पेरणीपुर्वी वापरता येते.

कोरडवाहु कापुस लागवडीसाठी रासायनिक खतांची मात्रा – (प्रमाण किलो प्रती एकर)

लागवडीनंतर दिवस नत्र स्फुरद पालाश मॅग्नेशियम सल्फेट कॅल्शियम नायट्रेट सल्फर झिंक सल्फेट फेरस सल्फेट मँगनिज सल्फेट
५-१० दिवस २० २५ २० ०० ०० ०० ०० ०० ००
३०-३५ दिवस ३० २५ ५० १० १० १० १०
एकुण ५० ५० ७० १० १० १० १०

बागायती कापुस पिकाची लागवड बहुतांश करुन ड्रिप इरिगेशन वर केली जाते, त्यामुळे या पिकांस रासायनिक खतांची मात्रा ड्रिप द्वारे देणे शक्य होते, या पिकांस खालिल प्रमाणे रासायनिक खते द्यावीत. प्रमाण किलो प्रती एकर

बागायती कापुस पिकासाठी आदर्श खत व्यवस्थापन -(प्रमाण किलो प्रती एकर)

लागवडीनंतर दिवस नत्र स्फुरद पालाश मॅग्नेशियम सल्फेट कॅल्शियम नायट्रेट सल्फर झिंक सल्फेट फेरस सल्फेट मँगनिज सल्फेट
५-१० दिवस २० २५ २५ ०० ०० ०० ०० ०० ००
३०-३५ दिवस २० २५ २५ १० १० १० १०
६०-६५ दिवस २० ०० २५ १० ०० ०० ०० ०० ००
९० – ९५ दिवस ०० ०० २५ १० ०० ०० १० ००
एकुण ८० ५० १०० ३० १० २० १५

 

कापुस पिकांत जैविक खतांचा वापर :

कापुस पिकांत स्फुरद विरघळवणारे जीवाणु, तसेच पालाश प्रवाहीत करणारे जीवाणु यांचा वापर करणे फायदेशिर ठरते.

याव्यतिरिक्त कापूस पिकासाठी स्प्रेयर्स द्वारे खत व्यवस्थापन कसे करावे? आणि संजीवकांचा वापर कसा करावा हे आपण पुढील भागात जाणून घेऊया.

कापुस पिकासाठी उपयुक्त कीटकनाशके जाणून घ्या!

जिल्हा:

Related posts

Shares