Search

कारले व दोडका लागवड भाग-2

कारले व दोडका लागवड भाग-2
[Total: 17    Average: 3.1/5]

  कारली, दोडका या पिकांसाठी ताटी पद्धतीचा वापर करावा. पारंपरिक पद्धतीपेक्षा अशाप्रकारच्या सुधारित पद्धतीमुळे उत्पादनात वाढ मिळते. याशिवाय अशापद्धतीने लागवड केल्यास दोन ओळींतील अंतर जास्त असते यामुळे यंत्राच्या सहाय्याने आंतरमशागत करणे सुलभ होते. ताटी पद्धतीचा अवलंब केल्यास  भरपूर सूर्यप्रकाश मिळतो हवा खेळती राहते, आणि फळांची प्रत सुधारते. याबरोबरच, वेलीवर कीटकनाशक अथवा बुरशीनाशकाची फवारणी करणे सुलभ होते अशाप्रकारे लागवड करण्यापूर्वी काही आवश्यक कामे करणे गरजेचे असते. हि कामे कोणती आहेत ते या लेखात आपण जाणून घेऊया.

बियाण्‍यांचे प्रमाण

 • कारल्‍यासाठी हेक्‍टरी ५ ते ६ किलो बियाणे लागते.
 • बियाणे २५ ते ५० पी.पी.एम.जी.ए. किंवा ४० पी.पी.एम.एन.ए.ए. च्‍या द्रावणात बुडवून नंतर प्रतिकिलो बियाण्‍यास ३ ते ४ ग्रॅम कार्बोन्‍डॅझिम लावून नंतर लागवड करावी.
 • दोडक्‍यासाठी हेक्‍टरी ३ ते ४ किलो ग्रॅम बियाणे लागते.

खते व पाणी व्‍यवस्‍थापन

 • बियाणे टाकल्यानंतर उत्तम आणि दर्जेदार उत्पादना यावे यासाठी काळजी घेणे गरजेचे असते.
 • याला जर योग्य नियोजनाची जोड मिळाली तर त्याचा फायदाच होतो.
 • खताचे आणि पाण्याचे व्यवस्थापन त्यात अत्यंत मोलाची भूमिका बजावते.
 • कारल्याच्या पिकासाठी प्रति हेक्‍टरी २० किलो नत्र ३० किलो स्‍फूरद व ३० किलो पालाश लागणीच्‍या वेळी द्यावे.
 • नत्राचा दुसरा हप्‍ता २० किलो या प्रमाणाम फूले दिसू लागली कि द्यावा.
 • दोडका पिकासाठी प्रति हेक्‍टरी २० ते ३० किलो नत्र २५ किलो स्‍फूरद व २५ किलो पालाश लागवडीच्‍या वेळी द्यावे.
 • १ महिन्याने नत्राचा २५ ते ३० किलोचा दुसरा हप्‍ता द्यावा.

आंतरमशागत

 • वेल जोम धरू लागल्यानंतर भोवतालचे तण काढून स्‍वच्‍छता ठेवावी,जमिन नेहमी भुसभुशीत ठेवावी.
 • वेलवर्गीय पीक असल्यामुळे या दोन्‍ही पिकास आधाराची गरज असते यासाठी बांबू अगर झाडांच्‍या वाळलेल्‍या फांद्यांचा वापर करावा.
 • आधार देण्यासाठी तारांच्या मदतीनेहि वेली पसरवून त्‍यापासून चांगला नफा मिळविता येतो.

krushi-expertsm

रोग व कीड प्रतिबंध

रोग :

 • या पिकांवर प्रामुख्‍याने केवडा व भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो.
 • भुरी रोगाच्‍या नियंत्रणासाठी डिनोकॅप -१ मिली.१ लिटर पाण्‍यातून फवारावे तसेच केवडा या रोगाच्‍या नियंत्रणासाठी डायथेन झेड ७८ हेक्‍टरी औषध १० ग्रॅम १० लिटर पाण्‍यातून फवारावे.

किडी :

 • या पिकांवर प्रामुख्‍याने तांबडे भुंगिरे, फळमाशी व मावा या किडीचा प्रादुर्भाव होतो.
 • पाने खाणारी आळीच्‍या नियंत्रणासाठी ट्रायअॅझोफॉस २ मिली प्रतिलिटर पाण्‍यातून फवारावे.
 • फळ माशीच्‍या नियंत्रणासाठी मेलॉथिऑन २ मिली प्रतिलिटर पाण्‍यातून फवारावे.

काढणी व उत्‍पादन

 • लागवडीनंतर साधारण ६० ते ६५ दिवसांनी फुलावर येतो.
 • पुर्ण वाढलेली पण कोवळी फळे काढावीत.
 • नखाने हळूच दाबल्‍यावर व्रण पडतो.
 • ती फळे कोवळी समजावीत.
 • दोडक्‍याचे हेक्‍टरी १०० ते १५० क्विंटल उत्‍पादन मिळते.
 • कारल्‍याची फळे कोवळी असतानाच काढावीत.
 • कारल्‍याचे हेक्‍टरी १०० ते १५० क्विंटल उत्‍पादन येते.
  वरील महत्वाच्या गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेलच कि एवढ सगळ करण्यासाठी नियोजन लागतंच. पण याबरोबरच मनात असावी लागते जबरदस्त महात्वाकांक्षा आणि अपार मेहनत करण्याची तयारी. या सगळ्याचा संगम झाला तर परिणाम उत्तम असतात. दिवसरात्र मेहनत करणाऱ्या बळीराजा कडे या सगळ्या गोष्टी असतातच. म्हणूनच तो जेव्हा आपला घाम गळतो तेव्हा चांगलं पिक येत. आपणही आपल्या मेहनतीला योग्य नियोजनाची साथ द्या…मग बघा आपला भाजीचा मळा पण कसा बहरेल.

Related posts

Shares