कुक्‍कुटपालन लसीकरण

कुक्‍कुटपालन लसीकरण
[Total: 34    Average: 2.9/5]

कुक्कुटपालन करताना काळजी घ्यावी लागते. कारण जर एखाद्या पक्षाला रोगाची लागण झाली तर त्याचा प्रभाव सगळ्याच पक्षांना रोग होण्याची शक्यता असते. यामुळे योग्य प्रकारे लसीकरण करणे आवश्यक आहे. तसं पाहायला गेलं तर वातावरणात सदैव विषाणू, जिवाणूंचे अस्तित्व असते. जर त्यांना पोषक वातावरण मिळाले तर रोगांचा प्रादुर्भाव वेगात होतो. कोंबड्यांमध्ये निरनिराळ्या वयोगटात निरनिराळ्या संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. लसीकरण करताना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

लसीकरण करताना घ्यायची काळजी-

 • रोगप्रतिबंधात्मक लस नेहमी रेफ्रिजरेटर मध्ये ठेवावी.
 • लसीकरण करण्यासाठी नेताना रोगप्रतिबंधक लस बर्फ ठेवलेल्या भांड्यातुनच न्यावी.
 • वापरून उरलेली लस पुन्हा वापरू नये. कारण अशा लसीची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते.
 • वापरून उरलेली लस, बाटल्यांची योग्यप्रकारे विल्हेवाट लावावी.
 • लसीकरणासाठी वापरलेली सिरिंज, सुया, भांडी स्वच्छ धुवून निर्जंतुक करून घ्यावी.
 • लसीच्या उत्पादक कंपनीचे नाव, लसीचा प्रकार, बॅच नंबर, लस तयार केलेली तारीख, लस उपयोगात आणण्याची अंतिम तारीख यांची नोंद करून मगच लस वापरावी.
 • लस टोचल्यानंतर पक्ष्यांना थकवा येऊ शकतो.
 • हे लक्षात घेता लस टोचण्यापूर्वी तीन दिवस आधी आणि लस टोचून झाल्यावर पाच ते सहा दिवस सर्व पक्ष्यांना पाण्यातून अँटी बायोटिक्स द्यावे.
 • उन्हाळ्यात लसटोचणी कार्यक्रम असेल, तर रोगप्रतिबंधक लस सकाळी किंवा रात्री टोचावी.म्हणजे पक्ष्यांवर ताण येणार नाही.
 • रोगप्रतिबंधक लसीकरण फक्त सशक्त पक्ष्यांना करावे.
 • एक वेळी एकच लस टोचावी.
 • एकाच वेळी दोन किंवा तीन लस दिल्यास रोगप्रतिकारशक्ती तयार होणार नाही.
 • उलट पक्ष्यांना रिऍक्शन होण्याची शक्यता असते.
 • काही वेळा पिण्याच्या पाण्यामधून काही रोगप्रतिबंधक लसीकरण केले जाते.
 • अशा वेळेस लस हि पाण्यामध्ये समप्रमाणात विरघळणे आवश्यक आहे.
 • जर पक्ष्यांना औषध समप्रमाणात मिळाले तरच पक्ष्यांमध्ये आवश्यक प्रतिकारशक्ती निर्माण होईल.
 • लसीकरणाआधी पक्षांना भरपूर तहान लागणे गरजेचे आहे.
 • पक्षांना तहान लागावी म्हणून पाण्याची भांडी रिकामी ठेवावीत.
 • लसिमिश्रित पाणी संपल्याशिवाय दुसरे पाणी पक्षांना देऊ नये.
 • लसमिश्रित पाणी थंड राहावे म्हणून त्यामध्ये बर्फाचे खडे टाकावेत.

कोंबड्यांच्या लसीकरणाचे वेळापत्रक

खालील छोटासा फॉर्म भरून कोंबड्यांच्या लसीकरणाचे वेळापत्रक मिळवा!

जिल्हा:

Shares