Search

देस्ता मार्ट चा कृषी क्रांती सप्ताह

देस्ता मार्ट चा कृषी क्रांती सप्ताह
[Total: 1    Average: 3/5]

यावर्षी अवघ्या महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने कृषी क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. तज्ज्ञांच्या अनुमानानुसार खरीप हंगाम उत्तम असेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. या उत्साहाच्या वातावरणात ‘देस्ता मार्ट’ ने ‘१० ते १२ ऑगस्ट – २०१६’ असे सलग तीन दिवस “कृषी क्रांती सप्ताह’ चे आयोजन केले आहे. या तीन दिवसात देस्ता मार्ट या ऑनलाईन बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या बहुतांश कृषी उत्पादनांवर आकर्षक सूट मिळणार आहे.

या उत्पादनांमध्ये भाजीपाला बियाणे, शेत पीक बियाणे, कीटक नाशके, वॊटर सोल्युबल (NPK), स्प्रेयर्स, PGR तसेच विविध कृषी अवजारे आणि त्याच्याशी निगडित विविध भागांचा समावेश आहे. या उत्पादनांवर २५% पर्यंत सूट मिळणार असल्याने, या दरम्यान खरेदी करणाऱ्या कृषी सेवा केंद्र धारकांना निश्चित नफा होणार आहे. या तीन दिवसात खरेदी करणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक खरेदीवर आकर्षक बक्षिसं मिळणार आहेत. याशिवाय एका भाग्यवंत कृषी सेवा केंद्र धारकाला लकी ड्रॉ च्या माध्यमातून बम्पर बक्षीस मिळणार आहे.

याआधी २० मे २०१६ रोजी देस्ता मार्ट ने ‘देस्ता महाधमका’ चे आयोजन केले होते. या एका दिवसात महाराष्ट्राच्या विविध भागातील असंख्य कृषी सेवा केंद्र धारकांनी विविध कृषी उत्पादनांची चौकशी केली होती. या दिवशी चौकशी करण्यात आलेल्या उत्पादनाची किंमत साधारणतः ६६ लाख रुपयांपर्यंत होती. महत्वाची बाब म्हणजे या महा धमाका दरम्यान नऊ लाख रुपयांची बियाणे, दोन लाख रुपयांचे मल्चिंग पेपर याबरोबर विविध उत्पादनांची विक्री झाली होती अशी माहिती देस्ता मार्ट च्या वाईस प्रेसिडंट – सेल्स अँड ऑपरेशन विद्या जयंत यांनी दिली. आमच्या बरोबर काम करणाऱ्या विविध कंपन्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होतात यामुळे आमच्या सेलर्स चा नफा व्हावा यासाठी आम्ही अशा विविध योजना राबवत असतो अशी माहितीही त्यांनी दिली.

महाराष्ट्रात ४२,००० कृषी सेवा केंद्र धारक आहेत यापैकी देस्ता मार्ट बरोबर महाराष्ट्रातील दोन हजारहुन अधिक कृषी सेवा केंद्र धारकांनी नोंदणी केली आहे. महत्वाचे म्हणजे यापैकी ७०० हुन अधिक कृषी सेवा केंद्र धारकांनी देस्ता मार्ट बरोबर विविध कृषी उत्पादनांसाठी ऑनलाईन ऑर्डर केली आहे. एकूण कृषी सेवा केंद्र धारकांची संख्या पाहता ऑनलाईन ऑर्डर केलेल्या डीलर ची टक्केवारी नक्कीच समाधानकारक आहे आणि भविष्यात हि टक्केवारी बिश्चित वाढणार आहे. कृषी सेवा केंद्र धारकांचा उत्साह वाढावा यासाठी विविध महत्वाकांक्षी योजना सुरु केल्या जातात.

नुकतीच देस्ता मार्ट ने ट्रान्सपोर्ट ऑफर हि योजना सुरु केली आहे. या अंतर्गत डीलर कमीत कमी तीन हजार ते २५ हजार रुपयांचे रिचार्ज घेऊन त्यावर दुप्पट किंमतीचे ट्रान्सपोर्ट बॅलेन्स मिळवू शकतो. जो कृषी सेवा केंद्र धारक या योजनेत सहभागी होईल त्याने एखादी ऑर्डर केल्यानंतर उत्पादनाच्या ट्रान्सपोर्ट चा खर्च या ट्रान्सपोर्ट बॅलेन्स मधून वजा केला जाईल. देस्ता ग्लोबल चे सी. ई. ओ मोहनीश शर्मा यांची हि संकल्पना असून यामुळे कृषी सेवा केंद्र धारकांना दुहेरी नफा होणार आहे.

कृषी क्रांती

कृषी सेवा केंद्र धारकांनी ऑनलाईन व्यवसाय करावा यासाठी देस्ता मार्ट कडून आम्ही सदैव प्रयत्नशील असतो. कॉल सेंटर, वेबसाईट, सोशल मीडिया, बल्क मॅसेज या सारख्या विविध माध्यमांचा चपखल वापर करत आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील कृषी सेवा केंद्र धारकांशी नेहमीच संपर्कात असतो. ‘कृषी क्रांती सप्ताह’ या आमच्या तीन दिवसीय सेल मध्ये आम्ही कमीत कमी १ करोड रुपयांची विक्री करू अशी अशा देस्ता ग्लोबल चे सी. ई. ओ मोहनीश शर्मा यांनी व्यक्त केला आहे.

अधिक माहितीसाठी भेट द्या – कृषी क्रांती सप्ताह
संपर्क – मराठवाडा 7776866711 । प. महाराष्ट्र 7775001188 । खान्देश 7775078693 । कोकण व अमरावती 7719952333 । नागपूर 8655440330

Related posts

Shares