Search

कृषी क्षेत्रासाठी खुशखबर

कृषी क्षेत्रासाठी खुशखबर
[Total: 8    Average: 2.6/5]

सरकारी योजना, त्यांना होणारी दिरंगाई आणि या योजनांचा लाभार्थ्यांना किती लाभ होतो? एक ना अनेक प्रश्न. पण आता मात्र महाराष्ट्र शासनाने या सगळ्या प्रश्नांवर समाधानकारक उत्तर शोधण्यासाठी आवश्यक पावलं उचलली आहेत. राज्यातील विविध समाज घटकांसाठी राबविण्यात येत असलेल्या कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून देण्यात येत असलेल्या वस्तू स्वरूपाच्या लाभाऐवजी रोख रक्कम संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या धोरणास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली. यामुळे, लाभार्थी स्वतःच खरेदी करणार असल्यामुळे सरकारी खरेदीतील गैरप्रकारांना यामुळे आळा बसण्याची शक्यता आहे. कृषी क्षेत्रासाठी खुशखबर या लेखात महाराष्ट्र शासनाच्या या नवीन धोरणाचा आढावा घेऊया.

कृषी क्षेत्राबद्दल बोलायचे झाल्यास शासनातर्फे विविध कल्याणकारी योजनांतील वस्तू स्वरूपातील लाभाचे वाटप करण्यात येते. यामध्ये, जनावरांचे खाद्य, कृषी, अवजारे, कीटकनाशके, बियाणे, ताडपत्री, वीज पंप, पाईप लाईन इत्यादींचा समावेश आहे. थेट हस्तांतरण योजनेची व्याप्ती वाढविताना नागरिकांना दिला जाणारा लाभ वस्तू स्वरूपात न देता त्याऐवजी त्यांच्या खात्यात थेट जमा केली जाईल. राज्य सरकारचे हे धोरण राज्य शासनाचे सगळे विभाग,  स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळे व महामंडळे यांना लागू राहणार आहे.
foggers-india1200x400

खरेदी व अधिक माहितीसाठी क्लिक करा

एखादी वस्तू किंवा साधनसामग्री लाभार्थ्याला द्यायची झाल्यास त्यासाठी निश्चित कार्यपद्धती राबविण्यात येणार आहे. यामुळे खरेदीत होणारे गैरप्रकार रोखण्यास मदत होऊन लाभार्थ्यांचा फायदा होईल असा दावा राज्यसरकारनं केला आहे.

राज्यसरकारच्या या  निर्णयामुळे थेट आणि वेळेवर मिळण्याची पूर्ण हमी राहील. त्याचप्रमाणे अनेक खात्यामार्फत होत असलेली विविध प्रकारची खरेदी टळू शकेल. लाभार्थ्याला  रक्कम मिळणार असल्याने तो आवश्यक वस्तूची गुणवत्ता तपासून व भाव करून, चांगली वस्तू खरेदी करू शकेल. एकूणच लाभार्थ्याला पर्याय उपलब्ध होणार आहे.

खरेदी करताना लाभार्थी स्थानिक पातळीवर त्याच्या गरजेची वस्तू खरेदी करणार आहे. यामुळे स्थानिक उद्योग व्यावसायिकांना लाभ होईल.  एकूणच या निर्णयामुळे  लाभधारक शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. याशिवाय स्थानिक पातळीवरील कृषी सेवा केंद्र धारकांच्या व्यवसायातही वाढ होण्याची शक्यता आहे.

संदर्भ – महाराष्ट्र टाईम्स

 

Related posts

Shares