Search

कृषी जागृती सप्ताहासात विवीध योजनांची घोषणा होणार शेतक-यांना केवळ १२ रुपयात जीवन विमा देण्याचा मनोदय

कृषी जागृती सप्ताहासात विवीध योजनांची घोषणा होणार  शेतक-यांना केवळ १२ रुपयात जीवन विमा देण्याचा मनोदय

महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक म्हणून माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना ओळखले जाते. महाराष्ट्रात सद्यस्थितीत कृषि क्षेत्रात जी प्रगती झाली आहे, त्यामागे वसंतराव नाईक यांची दूरदृष्टी कारणीभूत ठरली आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये. १ जुलै  हा त्यांचा वाढदिवस. हा दिवस महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या सरकारने  १ ते ७ जुलै हा कृषी जागृती सप्ताहात म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले आहे. राज्याचे कृषी मंत्री  श्री. एकनाथ खडसे यांनी याबाबत घोषणा करताना राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी “प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना” सुरु करणार असल्याची माहिती दिली.

“प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना” या  योजनेंतर्गत महाराष्ट्रातील १ करोड ३५ लाख शेतकऱ्यांचा विमा काढला जाणार आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना रुपये १२ प्रति वर्ष भरावे लागणार आहेत. शेतकऱ्यांसाठी असलेल्या या जीवन विमा योजनेत २ लाख रुपये राज्यसरकार भरणार आहे. या विमा योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांना नक्कीच फायदा होईल असा विश्वास कृषी मंत्री  श्री. एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे.

दिवंगत वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे सुरु करण्यात आली. या कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यां पर्यंत पोहोचले. कृषी विद्यापीठांच हे महत्व लक्षात घेवून विद्यापीठांनी तयार केलेले नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी जाणून घेऊन कृषी विकास दरात वाढ करण्याच्या दृष्टीने सरकारने पुढील महिन्यात कृषि जागृती सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.  या साप्ताह अंतर्गत  १ ते ७ जुलैदरम्यान संपूर्ण राज्यात गावात आणि जिल्हापातळीपर्यंत हा सप्ताह साजरा केला जाणार आहे.

नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून उत्पन्नात वाढ करणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती, राज्यातील कृषि विद्यापीठे व केंद्रीय संशोधन संस्थांनी संशोधित केलेले अद्ययावत तंत्रज्ञान या सप्ताहाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे राज्यसरकाराने ठरवले आहे. हा साप्ताह यशस्वी व्हावा यासाठी राज्यातील सर्व कृषि विद्यापीठे, संशोधन केंद्रे, कृषि विज्ञान केंद्रे, सर्व कृषि महाविद्यालये, सर्व कृषि तंत्रनिकेतन, साखर कारखाने, कृषि उत्पन्न बाजार समित्या, महाबीज, महाराष्ट्र राज्य कृषि उद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ यांचा सहभाग असणार आहे.

Related posts

Shares