Search

कृषी विभागाच्या योजना विविध योजना – भाग १

कृषी विभागाच्या योजना  विविध योजना – भाग १
[Total: 4    Average: 3.5/5]

button 001

५०% अनुदानावर शेतक-यांना ताडपत्री पुरविणे.
योजनेचे स्वरुप / माहीती :
सदर योजने अंतर्गत शेतक-यांचे शेतातील पिक मळणी / धान्य साठवण तसेच पावसापासुन मालाचे संरक्षण व गवत झाकणे अन्य शेतीच्या कामासाठी शेतक-यांना ताडपत्रीचा उपयोग होतो.
योजनेत सहभागाच्या अटी व शर्ती व पात्रता :
नाशिक जिल्हयातील सर्व पंचायत समिती क्षेत्रातील सर्व प्रकारच्या शेतक-यांना सदरच्या योजनेचा लाभ घेता येईल. मात्र अनुसुचीत जाती / जमाती महिला शेतकरीसाठी शासनाने निर्धारीत केल्याप्रमाणे (टक्के) लाभ देण्यात येईल. ५०% अनुदानावर शेतक-यांना ताडपत्री पुरविण्यात येते.


५०% अनुदानावर शेतक-यांना प्लॅस्टीक क्रेटस पुरविणे.
योजनेचे स्वरुप / माहीती :
शेतक-यांना भाजीपाला व फळपिकांच्या उत्पादीत मालाची हाताळणी, वाहतुक, साठवण इ. कामे कामे करताना नुकसान सोसावे लागते. प्लास्टीक क्रेटसचा वापर केल्यास हे नुकसान टाळता येणे शक्य आहे. प्लास्टीक क्रेटसचा माफक दरात पुरवठा करण्याकरीता कींमतीच्या ५०% अनुदान देणे आणि प्लास्टीक क्रेटसच्या वापराबाबत प्रचार व प्रसार करणे हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
योजनेत सहभागाच्या अटी व शर्ती व पात्रता :
१) भाजीपाला / फळपिके उत्पादक शेतक-यास योजनेचा लाभ घेता येईल.
२) जमिनीच्या ७/१२ उता-यावर भाजीपाला / फळपिके यांच्या सन २०११-२०१२ च्या आर्थिक वर्षातील पिक पाहणीच्या नोंदी असणे आवश्यक राहील.
३) अनुदाना व्यतीरिक्तची रक्कम शेतक-यास रोखीने पंचायत समिती कार्यालयाकडे त्यांच्या निवडीचे कळविल्यानंतर आठ दिवसाच्या आत जमा करावी लागेल.
४) अर्जदाराने विहीत नमुन्यात अर्ज आवश्यक ती कागदपत्रे त्यासह जोडून परिपुर्ण अर्ज त्यांच्या तालुक्याच्या / गटाच्या गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे देणे ही जवाबदारी अर्जदार शेतक-यांची असेल
५) कमाल जमिन धारणेची अट या योजनेत असणार नाही. तथापी अल्प / अभूधारक, अनु. जाती / जमातीचे व महिला शेतक-याना लाभ देतांना प्राधान्य देण्यात येईल.
६) योजनेचा लाभ सर्व घटकातील शेतकरी बांधवाना घेता येईल.
७) या पुर्वी या किवा अशाच स्वरुपाच्या शासनाच्या इतर योजनेतुन लाभ घेतला असेल त्यांना लाभ देता येणार नाही
५०% अनुदानावर शेतक-यांना सुधारीत शेती औजारे पुरविणे. (कडबाकुट्टी यंत्र पुरविणे.)
योजनेचे स्वरुप / माहीती :
शेतकरी बांधवाना जनावरांचा चारा बारीक करणे करीता उपयोगी तयेच वेळेची बचत होउन जनावरांचा उपयुक्त चारा तयार होतो. ५०% अनुदानावर पुरवठा असन सर्व थरातील शेतक-यास योजनेचा लाभ घेता येईल.

योजनेत सहभागाच्या अटी व शर्ती व पात्रता :
१) पंचायत समिती स्तरावर लाभार्थीची निवड करणे, तसेच सर्व थरातील लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेता येईल.
२) साहीत्य मिळण्यासाठी अर्ज, ७/१२ उतारा, खाते उतारा इ. कागदपत्रांसह प्रस्ताव देणे बंधनकारक राहील.
३) क्षेत्रमर्यादेची अट नाही.
४) महीला शेतक-यांना प्राधान्याने लाभ देण्यात येईल.

संदर्भ – panchayatportals.gov.in

Related posts

Shares