Search

कोंबड्यांचे पावसाळ्यातील व्यवस्थापन

कोंबड्यांचे पावसाळ्यातील व्यवस्थापन
[Total: 38    Average: 3/5]

शेतीबरोबरचा जोडधंदा म्हणून ‘कुक्कुटपालन’ या व्यवसायाकडे पहिले जाते. वातावरणीय बदलाचा कोंबड्यांवर परिणाम होत असतो. काही वेळा त्यांना विविध आजार देखील होतात. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा अशा तिन्ही ऋतूंमध्ये कोंबड्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. पावसाळ्याचा मौसम हा दमट हवामानाचा ओळखला जातो. यामुळे कोंबड्यांच्या घराची विशेष काळजी घ्यावी लागते. स्वच्छता अधिकधिक प्रमाणात ठेवावी लागते. कारण दमट हवामानात रोग प्रादुर्भावाची शक्यता अधिक असते. यामुळेच पावसाळ्यात कोंबड्यांचे व्यवस्थापन कसे करावे? हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

कसे कराल व्यवस्थापन?

 • पावसाळ्यात दमट वातावरण असल्यामुळे कोंबड्यांना विविध आजार होण्याची शक्यता आहे, यामुळे स्वच्छता महत्वाची.
 • शक्यतो पावसाळ्यापूर्वी पोल्ट्री शेडवरील पत्रे मजबूत बांधून घ्यावेत. यामुळे जोराची हवा, वावटळ किंवा पाऊस झाला तरी ते हलणार नाहीत किंवा उडून जाणार नाहीत.
 • पोल्ट्री शेड भोवती जर दलदल असेल तर त्यासंदर्भात आवश्यक उपाययोजना करावी. गावात असल्यास काढून टाकावेत. परिसरातील जागा स्वच्छ ठेवावी. पावसाचे पाणी साठून राहू नये याकरिता खड्डे बुजवून घ्यावेत.
 • पावसाचे पाणी सहजरित्या वाहून जावे यासाठी शेडच्या बाजूने चर खोदावेत.
 • पावसाळ्यामध्ये शक्यतो प्लॅस्टिकचे पडदे वापरावेत. पावसावर पडद्यांची उघडझाप करावी. पडद्याची बांधणी हि छतापासून दीड ते दोन फूट खालपासून करावी. यामुळे शेडच्या वरील बाजूने हवा खेळती राहील आणि आतील वातावरण चांगले राहून याचा पक्षांना फायदा होईल.
 • पक्षांची गादी (लिटर) दिवसातून किमान एकदा तरी चांगली खाली वर करून हलवून घ्यावी. कारण ओल्या गादिमुळे शेडमधील वातावरण दूषित होते आणि रोगजंतूंचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते.
 • चुकून गादी जास्त प्रमाणात ओली झाली असेल तर गादीचा तेवढाच भाग काढून बाहेर टाकावा, त्या ठिकाणी नवीन गादी टाकावी.
 • गादीतील आर्द्रतेमुळे कॉक्सीडीओसीस रोगाच्या जंतूंचे प्रमाण वाढते यावर उपाय म्हणून शिफारशीअनुसार चुना मिसळावा.
 • शेडमध्ये माशांचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी.
 • पक्षांचे खाद्य ठेवण्याची जागा स्वच्छ व कोरडी असावी.
 • खाद्याच्या गोण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाठी आल्यास असे खाद्य पक्ष्यांना देऊ नये.
 • कोंबड्यांना शुद्ध पाणी द्यावे. कोंबड्यांना द्यावयाच्या पिण्याच्या पाण्यात शिफारशीनुसार जंतुनाशके योग्य प्रमाणात मिसळावीत.
 • पाण्याची टाकी लोखंडी असल्यास ती गंजू नये याकरिता तिला आतून व बाहेरून रेड ऑक्साईड लावावे.
 • शेडची भिंत सिमेंट विटांनी बांधलेली असेल तर आतून बाहेरून चुना लावावा.

कोंबड्यांच्या लसीकरणाचे वेळापत्रक

खालील छोटासा फॉर्म भरून कोंबड्यांच्या लसीकरणाचे वेळापत्रक मिळवा!

जिल्हा:

Related posts

Shares