Search

क्रॉप कव्हर

क्रॉप कव्हर
[Total: 13    Average: 2.8/5]

तसं पाहायला गेलं तर जगभरात नॉन वोवन फॅब्रिक (प्लास्टिक बेस्ड) चा वापर फार पूर्वीपासून होतोय. भारतातील शेती बाबत बोलायचं झालं तर पारंपरिक पद्धतीचा अवलंब केला जातो. काळानुरूप यामध्ये बदल होत असल्याचं समाधानकारक चित्र आता पाहायला मिळतंय आणि म्हणूनच “क्रॉप कव्हर” सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतकरी बांधवांकडून केला जातोय.

काय आहे क्रॉप कव्हर?

रोपांची वाढ होत असताना बऱ्याचदा त्यांना हवामानात आणि वातावरणात होणाऱ्या विविध बदलांचा सामना करावा लागतो. याचा परिणाम रोपाच्या वाढीवर होता आणि परिणामी उत्पादनावर होतो. अशावेळी क्रॉप कव्हर च्या मदतीने रोपाभोवती एक प्रकारचे आच्छादन केले जाते. यामुळे प्रखर सूर्यकिरणे, गरम हवा, रात्री आर्द्रतेमुळे पडणारे दव, धुलिकण यासारख्या विविध गोष्टींपासून रोपाचे संरक्षण केले जाते.

महाराष्ट्रात सांगली सातारा भागातील प्रगतिशील शेतकरी डाळिंब पिकासाठी मोठ्या प्रमाणात क्रॉप कव्हर चा वापर करतात. कलिंगड लागवडीदरम्यान याचा वापर केला जाऊ शकतो. केळी जे महाराष्ट्रातील एक महत्वाचे फळ पीक आहे या पिकासाठी देखील क्रॉप कव्हर चा वापर केला जाऊ शकतो.

क्रॉप कव्हर ची वैशिष्ट्ये

 • प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक हवा आणि प्रकाशाला बाधा निर्माण करत नाही.
 • वजनाला हलके असते आणि रोपाच्या वाढीस अडथळा निर्माण करत नाही.
 • किफायतशीर आणि मर्यादित मजूर लागतात.
 • पर्यावरणाचा समतोल सांभाळण्यास हातभार लावते कारण याच्या वापरामुळे पेस्टीसाईड चा वापर कमी होतो.
 • उन्हाळ्यादरम्यान प्रखर सूर्यकिरणांमुळे होणारे दुष्परिणाम कमी करते.
 • बहुतांश सगळ्याच पिकांसाठी वापर करणे शक्य आहे.
 • टोमॅटो, भोपाळावर्गीय, कलिंगड, खरबूज आणि बटाटा यांसारख्या पिकांचे विषाणूजन्य रोगांपासून संरक्षण करते.
 • उत्पादनाचा दर्जा सुधारतो तसेच उत्पादन वाढण्यास हातभार लावते.
 • बाष्पीभवन प्रक्रिया मंदावल्याने पाणी कमी प्रमाणात लागते.

क्रॉप कव्हर चे फायदे काय आहेत?

 • क्रॉप कव्हर च्या वापरामुळे उत्पादनाचा दर्जा सुधारतो तसेच उत्पादनातही वाढ होते.
 • प्रतिकूल परिस्थितीतही रोपांची वाढ वेगाने होते.
 • पिकांचे प्रखर सूर्य किरणांपासून संरक्षण होते.
 • क्रॉप कव्हर वर जी छिद्रे असतात त्यातून पिकांसाठी आवश्यक तो सूर्य प्रकाश मिळतोच. तसेच रोपाला वातावरणातून पाणी ग्रहण करता येते.
 • पिकांचे कीटकांपासून संरक्षण होते.
 • क्रॉप कव्हर च्या वापरामुळे किटक नाशकांवर होणाऱ्या खर्चापासून बचत होते.

क्रॉप कव्हर खरेदी करण्यासाठी खालील फॉर्म भरा. 

क्रॉप कव्हर च्या खरेदी व अधिक माहितीसाठी खालील फॉर्म भरा

जिल्हा:

तुम्हाला कोणत्या पिकासाठी क्रॉप कव्हर हवे आहे?


 

Related posts

Shares