Search

खरिपातील ज्वारी लागवड

खरिपातील ज्वारी लागवड

मॉन्सून अंदमानात दाखल झालाय, आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल वातावरण आहे. कृषी क्षेत्रासाठी हि निश्चित आनंदाची आणि दिलासादायी बातमी आहे. शेतकरी बांधवांनी आता शेतातील कामाला सुरुवात केलीय. कोणते पीक घ्यायचे याची निश्चिती झालीय.  खरिपातील ज्वारी लागवड करताना नियोजन कसे करावे हे जाणून घेऊया.

ज्वारी हे खरिपातील महत्त्वाचे जिरायती पीक आहे,  हे पिक योग्यप्रकारे घेतले गेले तर धान्य उपलब्धतेसोबतच जनावरांसाठी वैरणही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकते.

ज्वारीसाठी वाणांची निवड कशी करावी ?

खरीप हंगाम हा पावसाचा हंगाम आहे. अनेकदा पीक परिपक्व होताना पाऊस पडतो. याचा पिकावर परिणाम होतो. यामुळे, ज्वारीच्या दाण्यावर बुरशी वाढून ज्वारी काळी पडते. परिणामी उत्पादन वाढूनही उत्पन्नात घट होते. त्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथून प्रसारित वाण परभणी श्वेनता (पीव्हीके 801) आणि दुहेरी उपयुक्त सरळवाण पीव्हीके 809 लागवडीसाठी वापरावे.

पेरणीचा कालावधी

खरिपात जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा हा ज्वारी लागवडीसाठी योग्य कालावधी आहे. पेरणीचा कालावधी लांबल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव वाढतो.

बियाण्याचे प्रमाण

संकरित ज्वारीसाठी हेक्टारी 7.5 किलो तर सुधारित वाणासाठी हेक्टजरी 10 किलो बियाणे वापरावे.

बीजप्रक्रिया

ऍझोटोबॅक्टयर जीवाणू संवर्धक, नत्र व स्फुरद विद्राव्य जिवाणू 250 ग्रॅम प्रति 8 ते 10 किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

उशिरा पेरणी करावी लागल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी थायामेथोक्झा्म (70 टक्के) 3 ग्रॅम प्रति किलो प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

खत व्यवस्थापन

हेक्टवरी 5 टन शेणखत मातीत चांगले मिसळून द्यावे. खरीप ज्वारीस 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश प्रतिहेक्टमरी शिफारस केली आहे. त्यापैकी पेरणी करताना अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व संपूर्ण पालाश द्यावे. शक्यटतो पहिली मात्रा संयुक्त अथवा मिश्रखतातून (150 किलो 10-26-26 मिश्रखत व 50 किलो युरियाच्या माध्यमातून) द्यावी. उरलेले अर्धे नत्र पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी 85 किलो युरियाद्वारे द्यावे. खते पेरणीच्या वेळी बियाण्याखाली 5 सें.मी. द्यावी.

आंतरमशागत

पेरणीनंतर 8-10 दिवसांनी नांगी भरण करावी. 20 दिवसांत 15 सें.मी. अंतरावर 1 रोप याप्रमाणे विरळणी करावी. तणांचा बंदोबस्त करण्यासाठी पीक 40-45 दिवसाचे होईपर्यंत दोन वेळा खुरपणी व दोन वेळा कोळपणी करावी.

पीक संरक्षण

खोडमाशीच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रीन (10 टक्के प्रवाही) 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पेरणीनंतर 14 दिवसांनी फवारणी करावी.

काढणी व साठवण

पिकाच्या परिपक्व अवस्थेत काढणी करावी. दाण्यामध्ये 8 टक्के आर्द्रता राहील अशा प्रकारे उन्हात वाळवून साठवण करावी. कडब्याची कुट्टी करून साठवणूक करावी

Related posts

Shares