Search

खरिप मका लागवड

खरिप  मका लागवड
[Total: 45    Average: 3.3/5]

तृणधान्य पिकांच्या उत्पादमध्ये गहू व भात पिकानंतर जगात मक्याचा तिसरा क्रमांक लागतो. सर्व तृणधान्य पिकात सश्लेषण क्रिया असलेले मका हे पीक निरनिराळ्या हवामानाशी जलद समरस होऊन त्यात जास्त उत्पादन क्षमता आढळते. मका हे उष्ण, समशीतोष्ण आणि थंड हवामानाशी समरस होणारे पीक आहे; मात्र पीकवाढीच्या कोणत्याही अवस्थेत धुके आल्यास ते या पिकास मानवत नाही या पिकाच्या योग्य वाढीसाठी २५ ते ३० अंश से तापमान चांगले असते ; परंतु जेथे सौम्य तापमान (२० ते २५ अंश से.) आहे अशा ठिकाणी मका वर्षभर घेता येतो. महाराष्ट्रात खाण्यासाठी व कारखान्याच्या दृष्टीने मक्याचा वापर होत असतो. मक्यामध्ये स्टार्च, प्रथिने आणि खाण्यायोग्य तेल असते. मक्यामधील हे गूण पाहता खरीप मका लागवड कशी करावी हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

जमीन व हवामान :

या पिकासाठी मध्यम ते भारी, रेतीयुक्त, खोल, उत्तम निचल्याची जमीन आवश्यक असते. जमिनीचा सामु ६.५ ते ७ इतका असावा. या पिकासाठी बियाण्यांच्या उगवणीसाठी साधारणत: २१ डिग्री सें.ग्रे. व पिकाच्या वाढीसाठी डिग्री ३२ सें.ग्रे. तापमान उत्तम असते.

लागवडीचा हंगाम :

साधारणतः मक्याची लागवड ही जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत करावी.

मका पिकाचे वाण :

अ) संकरित वाण : डेक्कन-१o३, १o५, गंगा-११, त्रिशुलता, जे.के. २४९२, प्रो-३१0,३११,३१२, बायो-९६८१, सिडटेक-२३२४, के.एच.९४५१, बायो-९६३७, एच.क्यू.पी.एम-५, सरताज, राजर्षी, एच.क्यू.पी.एम-७
ब) संमिश्र वाण : आफ्रिकन टॉल, मांजरी, किरण, पंचगंगा, करवीर

हेक्टरी बियाणे :

मक्यासाठी १५ ते २o किलो बियाणे प्रति हेक्टर आवश्यकता असते. कमी आणि मध्यम कालावधीच्या वाणांनुसार लागवडीचे अंतर ठरविले जाते. जर कमी कालावधीचे वाण असल्यास लागवडीचे अंतर ६o × २o सें.मी. असते आणि मध्यम कालावधीच्या वाणांतील अंतर ७५ × २0/२५ से.मी. असते.

पूर्वमशागत :

लागवडीपूर्वी शेतात असलेला काडीकचरा, धसकटे वेचून नष्ट करावीत. खोलवर नांगरट करुन दोन ते तीन कुळवाच्या या पाळ्या द्याव्यात. जमिनीमध्ये हेक्टरी १०-१२ टन “ शेणखत मिसळावे.

बीजप्रक्रिया :

लागवडीपूर्वी प्रति एक किलो बियाण्यास २ ते २.५ १५ ते २0 ग्रॅम प्रतिकिलो प्रमाणे बियाण्यास प्रक्रिया करावी. त्यामुळे उत्पादनामध्ये ५ ते १० टक्के वाढ होते.

आंतरपिके :

मका पिकामध्ये खरीप हंगामात काही अांतरपिके घेता येतात. त्यात उडीद, मूग, चवळी, सोयाबीन, भुईमूग, तूर यांचा समावेश होतो.

खत व्यवस्थापन :

लागवडीच्या वेळी प्रतिहेक्टरी ४० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ४o केिली पालाश द्यावे. लागवडीनंतर ३o दिवसांनी ४o किलो नत्र तर लागवडीनंतर ४o ते ४५ दिवसांनी ४o किलो नत्र द्यावे.

आंतरमशागत :

मक्यामधील तणांचा बंदोबस्त करण्यासाठी अॅट्राझीन २.५ किलो ५oo लिटर पाण्यातून प्रतिहेक्टरी तण उगवणीपूर्वी जमिनीत ओलसरपणा असताना फवारावे. सरीवर टोकन केलेली असल्यास १o दिवसांनी नांग्या भरुन प्रति हेक्टरी झाडांची संख्या योग्य ठेवल्यास अपेक्षित उत्पादन मिळते.

पाणी व्यवस्थापन :

मका लागवडीनंतर खरीप हंगामात साधारणत: १५ ते २o दिवसांनी पाण्याची पाळी द्यावी. फुलोरा अवस्था व दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये मका पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये.

पीक संरक्षण :

मका पिकावर किडी व रोगाचा प्रादुर्भाव फारसा आढळून येत शिफारशीप्रमाणे उपाययोजना करावी.

मक्याची काढणी व मळणी :

कणसे पिवळसर, दाणे कडक झाल्यानंतर कणसे खुडून काढावीत. ती कणसे २ ते ३ दिवस उन्हात चांगली वाळवावीत. यानंतर कणसाच्यावरील आवरण काढून मका सोलणीयंत्राच्या साहाय्याने कणसातील दाणे वेगळे आर्द्रतेचे प्रमाण १२ टक्क्यांपर्यंत ठेवून साठवण करावी.

उत्पादन :

साधारणत: मक्याचे उत्पादन ५० क्विंटल प्रति हेक्टरी प्रमाणे मिळते. आफ्रिकन टॉल हा वाण अतिशय 7 उंच (३00 ते ३५० सें.मी.) असून त्याच्यापासून प्रति हेक्टरी ६५ ते ७0 टन हिरव्या चा-याचे उत्पादन मिळते.

Related posts

Shares