Search

खरीफातील भात लागवड

खरीफातील भात लागवड

तांदूळ हे महाराष्ट्रातील ज्वारी पिकाखालोखाल दुसरे महत्त्वाचे तृणधान्य पीक असून भात हे मुख्यत: उष्ण कटिबंधाच्या प्रदेशातील पीक आहे. महाराष्ट्र राज्याच्या चार विभागातील एकूण १६ जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात भात पिकवला जातो. गेल्या १० वर्षातील स्थिर उत्पादकता पाहता तांदळाची उत्पादकता वाढविणे वाढत्या लोकसंख्येचा विचार करता अत्यंत आवश्यक आहे.

खरीप भात लागवड करताना लक्षात घ्यावयाच्या महत्त्वाच्या बाबी :

१) भात जातीची निवड व बियाणे,

२) शेतीची पूर्वमशागत,

३) भाताची पेरणी व लावणी करणे,

४) रोपवाटिकेतील भात लावणीवेळी व नंतरचे खत व्यवस्थापन,

तुमच्या विभागासाठी योग्य भाताचे सुधारित वाण कोणते?

जाणून घेण्यासाठी खालील फॉर्म भरा

जिल्हा:


 

) भाती जातीची निवड बियाणे :

राज्यात;

 • हळव्या प्रकारातील १५,
 • निमगरव्या प्रकारातील १६,
 • गरव्या प्रकारातील ७,
 • सुवासिक प्रकारातील ५,
 • जास्त क्षारतेस सहनशील असणारे ३,
 • भारी काळ्या जमिनीसाठी पावसाच्या पाण्यावर येणारे ७,

असे एकूण ५५ भाताचे सुधारित वाण तर २ हळवे आणि २ गरवे असे ४ संकरित वाण लागवडीसाठी प्रसारित करण्यात आलेले आहेत. या शिवाय राष्ट्रीय स्तरावर प्रसारित व महारष्ट्रासाठी हळव्या गटातील ३, निमगरव्या गटातील ७ व गरव्या गटातील ४ अशा एकूण १४ भात जातींची शिफारस केलेली आहे.

सर्वसाधारपणे हळव्या जातीस ११५१२० दिवस, निमगरव्यासाठी १२०१३५ दिवस व गरव्या जातींना १४० दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागतो.

महाराष्ट्र राज्यातील विविध संशोधन केंद्रामार्फत विविध जमिनीस व हवामानास योग्य असणाऱ्या प्रसारित जातींचा तपशील पुढील तक्त्यामध्ये देण्यात आलेला आहे.

) शेतीची पूर्वमशागत :

 • भाताचे पहिले पीक काढताच दोन वेळा उभी व आडवी नांगरट करून जमीन भुसभुशीत करावी.
 • शेतातील भाताची धसकटे वेचून एकत्र करून जाळून नष्ट करावीत.
 • त्यानंतर १० टन चांगले कुजलेले शेणखत लावणी अगोदर ३ – ४ आठवड्यापूर्वी प्रति हेक्टरी शेतात समप्रमाणात पसरावे किंवा १० टन हिरवळीची खते लावणीपूर्वी २- ३ दिवस अगोदर द्यावीत.

३)महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या विभागासाठी भात जातींचा तपशील

भात जातीचे नाव संकर शिफारस केलेले विभाग दाण्याचा प्रकार उत्पादन (ट./हे.) पक्वतेचा कालावधी वैशिष्टचे
कर्जत -१८४ तायचुंग स्था. x
कोळंब -५४०
कोकण विभाग,
वरकस जमिनीसाठी
मध्यम बारीक ३ ते
३.५
१०० ते १०५ दिवस करपा रोगास प्रतिकारक
कर्जत -१४-७ आय. आर. -८ x
झिनीया १४९
गरव्या जमिनीसाठी लांबटबारीक ४.५ १४० ते १४५ दिवस पाणथळ जमिनीस योग्य,
करपा रोगास प्रतिकारक.
कर्जत-१ होलमालडिगा x आय. आर. – ३६ कोकण विभाग, वरकस जमिनीसाठी आखूड जाड ३.५ ते ४.५ १०५ ते ११० दिवस करपा, कडा करपा रोगासाठी प्रतिकारक
तसेच तुडतुड्यांना प्रतिकारक
कर्जत -२ आर. पी. डब्ल्यू – ६ – १७ x
आर. पी.-४-१४
राज्यातील निमगरव्या व गरव्या जमिनीसाठी लांबट बारील ४ ते ४.५ १३५ ते १४० दिवस करपा रोगास प्रतिकारक, पाणथळ जमिनीसाठी
कर्जत – ३ आय. आर ३६ x कर्जत – ३५ – ३ कोकण विभाग, निमगरव्या जमिनीसाठी आखूड जाड ४.५ ते ५.० ११५ ते १२० दिवस करपा रोगास व गादमाशीस प्रतिकारक
कर्जत -४ आय. आर. २२ x झिनीया – ६३ कोकण विभातातील चार जिल्हे (ठाणे, रत्नागिरी, रायगड व सिंधुदूर्ग) आखूड अति बारीक ३ ते ३.५ ११५ ते १२० दिवस अतिबारीक दाणा, खोडकिडीस साधारण बळी पडते, वरकस जमिनीस उपयुक्त.
कर्जत – ५ बी. आर. ८२७ मघून निवड राज्यातील भात पिकविणाऱ्या निमगरव्या भागासाठी लांबट जाड ४.५ ते ५.० १२५ ते १३० दिवस पान करपा रोगास प्रतिकारक, भातावरील टुंग्रो विषाणूस साधारण प्रतिकारक
कर्जत – ६ हिरा x कर्जत १८४ राज्यातील भात पिकविणाऱ्या भागासाठी आखूड बारीक ४.० ते ४.५ १३० ते १३५ दिवस मान करपा रोगास प्रतिकारक, पाने गुंडाळणाऱ्या अळीस साधारण प्रतिकारक
सह्याद्री आय. आर – ५८०२५ x
बी. आर. – ८२५ -३५ -३ -१-१-१ आर.
महाराष्ट्रातील भात पिकविणारे सर्व जिल्हे लांबट बारीक ६.५ ते ७ १२५ ते १३० दिवस जास्त उत्पादन देणारी संकरित जात.
सह्याद्री -२ आय. आर – ५८०२५ अ x
के. जे. टी. आर -२
महाराष्ट्रातील भात पिकविणारे सर्व जिल्हे लांबट बारीक ५.५ ते ६.५ ११५ ते १२० दिवस हळवी, जास्त उत्पादन देणारी,
करपा व कडाकरपा रोगास तसेच
आभासमय काजळीस प्रतिकारक.
सह्याद्री -३ आय. आर. – ५८०२५ अ x के. जे. टी. आर – ३ राज्यातीली भात पिकविणाऱ्या भागासाठी लांबट बारीक ६.५ ते ७.५ १२५ ते १३० दिवस मानकरपा रोगास प्रतिकारक,
पाने करपा रोगास साधारण प्रतिकारक,
पाने गुंडाळणाऱ्या अळीस प्रतिकारक.
सह्याद्री – ४ आय. आर – ५८०२५ अ x
के. जे. टी. आर – ४
राष्ट्रीय पातळीवर प्रसारित, देशातील पंजाब,
हरियाणा, पश्चिम बंगाल,
उत्तर प्रदेश व महाराष्ट्र या पाच राज्यासाठी
लावणी करून पीक घेण्यासाठी
तसेच खरीप हंगामासाठी
लांबट बारीक ५.५ ते ६.५ ११५ ते १२० दिवस पाने करपा, मान करपा,
भातावरील टुंग्रे विषाणूस साधारण प्रतिकारक,
जास्त उत्पादन देणार हळवा संकरिता वाण.
आंबेमोहर (Improved) स्थानिक निवड पावसाच्या पाण्यावर, वरचढ जमिनीस योग्य मध्यमबारीक २.५ ते ३.० १०५ ते ११० दिवस सुवासिक
इंद्रायणी आंबेमोहोर -१५७ x आय. आर – ८ पश्चिम महाराष्ट्रातील भात पिकवणारे जिल्हे लांबटबारील ४ ते ४.५ १३० ते १३५ दिवस सुवासिक वाण, करपा रोगास प्रतिकारक
भोगावती आर. पी. एस. पी. ३२८ कोकण, पश्चिम घाट झोन व इतर भात पिकवणा महाराष्ट्रातील विभाग लांबटबारीक ३.५ ते ४.० १३० ते १३८ दिवस सुवासिक वाण,
रोगास प्रतिकारक,
पान करपा रोगास साधारण प्रतिकारक

 

) भाताची पेरणी लावणी करणे

) गादीवाफ्यावर रोपवाटिका तयार करणे :

 • भाताचे पहिले पीक काढताच मशागत करून जमीन भुसभुशीत करावी व त्यामध्ये १०० -१२० से. मी. रुंद व १० ते १५ सें. मी. उंच आणि आवश्यक त्या लांबीचे गादीवाफे तयार करावेत.
 • ज्या ठिकाणी शक्य नसेल तेथे रोप तयार करण्यासाठी उंचवट्याची जागा निवडावी व रोपवाटिकेच्या चहूबाजूंनी खोलगट चरी काढावी. त्यामुळे पाण्याचा उत्तम निचरा होण्यास मदत होईल व रोपे मारण्याचे प्रमाण अल्प राहील.
 • गादीवाफे तयार झाल्यावर दर चौ. मी. क्षेत्रावर २- ३ किलो या प्रमाणात चांगल्या कुजलेल्या शेणखताचा अथवा कंपोस्ट खताचा थर द्यावा.
 • नंतर वाफ्यावर प्रती गुंठ्यास १ किलो कल्पतरू सेंद्रिय खत, १ किलो युरिया किंवा २ किलो अमोनियम सल्फेट, ४०० ग्रॅम स्फुरद आणि ५०० ग्रॅम पालाश द्यावे.
 • गादीवाफ्यावर ७ ते ८ सें.मी. अंतरावर ओळीत २ – ३ सें.मी. खोल प्रती चौरस मीटरला ३५ -४० ग्रॅम याप्रमाणे बी पेरून मातीने झाकावे.
 • पेरणीनंतर झारीने पाणी घालावे. उगवणीनंतर ८ – ८ दिवसांनी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी २५० मिलीची १०० लि. पाण्यातून २ वेळा फवारणी करावी. म्हणजे रोपे जोमाने वाढून लवकर लागवडीस येतात.
 • साधारण: १ हेक्टर लागवडीसाठी १० आर (१० गुंठे) क्षेत्रावर बी पेरणे आवश्यक आहे.

) भात पेरणीसाठी बियाण्याचे प्रमाण रोपवाटिकेची काळजी :

 • बारीक दाण्याच्या जातीचे प्रती हेक्टरी २५ किलो बियाणे, मध्यम दाण्यासाठी २५ ते ३० किलो व जाड दाण्यासाठी ३५ ते ४० किलो तर अतिजाड दाण्याच्या जातीचे ४५ – ५० किलो प्रति हे. बियाणे लागते.
 • पेरणीनंतर एक आठवड्याने व नंतर गरजेनुसार रोपवाटिकेची बोणणी करावी किंवा पेरणीनंतर २ दिवसात ब्युटाक्लोर किंवा अॅनिलोफॉस तणनाशकांचा वापर करावा.
 • तणनाशक वापरताना रोपवाटिकेमध्ये ओलावा असणे आवश्यक आहे. रोपावर खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसल्यास दाणेदार फोरेट १० % १० किलो प्रती हेक्टरी किंवा दाणेदार कार्बोफ्युरान ३ टक्के १६.५ किलो प्रती हे. वापरावे.
 • दाणेदार कीटकनाशके वापरताना जमिनीत ओल असणे आवश्यक आहे.
 • खरीप हंगामात रोपवाटिकेवर करपा रोग आढळून आल्यास थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी २५० मिली + कॉपर ऑक्झीक्लोराईट ५० टक्के (पाण्यात मिसळणारे) १०० ग्रॅम यांची १०० ते १५० लि. पाण्यातून फवारणी करावी. रोपांना सहावे पान आल्यावर म्हणजे सुमारे २१ -२५ दिवसांनी रोप लावणीस तयार झाले असे समजावे.
 • भाताची लावणी :) सुधारित भात जातींची लागवड पद्धती :
 • शेतीची मशागत केल्यानंतर १० टन शेणखत किंवा कंपोस्ट किंवा चिखलणीच्या वेळी १० टन गिरीपुष्पाचा पाला शेतामध्ये गाडावा, म्हणजेच भातशेतीला सेंद्रिय खताचा पुरवठा होऊन जमिनीचा पोत सुधारतो आणि त्याचबरोबर नत्रांचा अधिक पुरवठा होतो.
 • खरीप हंगामात जातीपरत्वे लावणीचे अंतर ठेवावे. हळव्या भात जातीची लागवड १५ x १५ सें. मी. प्रमाणे करावी. तसेच निमगरव्या गरव्या जातींची २० x १५ सें.मी. प्रमाणे लागवड करावी. १५ x १५ सें. मी. प्रमाणे लागवड करत असताना प्रति चौरस मीटरमध्ये ४४ ते ४५ चूड बसतील याची काळजी घ्यावी तसे २० x १५ सें.मी. प्रमाणे लागवड करताना ३३ चूड प्रति चौरस मीटर प्रमाणे लावावीत.) संकरित भात जातींची लागवड पद्धती:
 • संकरित भात जातींच्या लागवडीसाठी हेक्टरी १५ ते २० किलो बियाणे लागते.
 • संकरित भात लागवडीसाठी २५ दिवसांचे रोप वापरावे.
 • २ रोपातील अंतर १५ सें.मी. तसेच ओळीतील अंतर १५ ते २० सें. मी. ठेवावे.
 • प्रत्येक चुडात १ किंवा २ जोमदार रोपे लावावीत.
 • प्रत्येक चौरस मीटर जागेत ३३ ते ३५ रोपे लावावीत.
 • संकरित भात जातीची लागवड करताना प्रत्येक वेळेस नवीन बियाणे वापरणे आवश्यक आहे.

 

सह्याद्री सह्याद्री हे संकरित वाण हळव्या तर सह्याद्री 1 सह्याद्री हे वाण निमगरव्या लागवडीस घ्यावेत.
चार सूत्री लावणी तंत्रज्ञान 
सूत्र १ ः 
भात पिकाच्या अवशेषांतील (तुसाचा व पेंढ्याचा) सिलिकॉन व पालाश या अन्नद्रव्यांचा फेरवापर ः
अ) भाताच्या तुसाची काळी राख रोपवाटिकेत बी पेरण्यापूर्वी मिसळावी.
भाताच्या तुसाची राख (पूर्ण जळालेली पांढरी राख नव्हे) रोपवाटिकेमध्ये, गादीवाफ्यात भाताचे बी पेरण्यापूर्वी प्रति चौरस मीटर एक किलोग्रॅम या प्रमाणात चार ते सात सें.मी. खोलीपर्यंत मातीत मिसळावी. नंतर बीजप्रक्रिया केलेले भाताचे बी त्याच ओळीत पेरावे.
ब) भाताचा पेंढा लावणीपूर्वी शेतात गाडावा.

 भाताचा पेंढा पहिल्या नांगरणीच्या वेळी हेक्‍टरी अंदाजे दोन टन या प्रमाणात शेतात गाडावा.
फायदे ः १) भात पिकांना सिलिका व पालाश यांचा पुरवठा होतो. (पालाश ः २०-२५ किलोग्रॅम. सिलिका ः १००-१२० किलोग्रॅम.) २) रोपे निरोगी व कणखर होतात. ३. रोपांच्या अंगी खोडकिडा यांना प्रतिकार करण्याची क्षमता वाढते.

सूत्र २ ः 
गिरिपुष्प (ग्लिरिसिडीया) हिरवळीच्या खताचा वापर ः

 गिरिपुष्प हिरवळीचे खत (दोन ते चार गिरिपुष्पाच्या झाडांची हिरवी पाने किंवा अंदाजे ३० कि.ग्रॅ. / आर) चिखलणीपूर्वी सात ते आठ दिवस अगोदर पसरावीत व नंतर चिखलणी करून रोपांची लावणी करावी.

हिरवळीचे खत वापरण्याची सोपी पद्धत ः
गिरिपुष्पाच्या फांद्या जमिनीपासून ३० ते ४० सें.मी. उंचीवर तोडाव्यात. त्याच झाडाच्या तोडलेल्या फांद्या चिखलणीपूर्वी सहा ते आठ दिवस अगोदर खाचरात पसराव्यात. आठवड्यात फांद्यांवरील पाने गळून पडतात. उरलेल्या फांद्या गोळा करून जळणासाठी इंधन म्हणून वापराव्यात. चिखलणी करून गळून पडलेली पाने चिखलात व्यवस्थित मिसळावीत, नंतर लावणी करावी.
फायदे ः १) भातरोपांना सेंद्रिय – नत्र (हेक्‍टरी १० ते १५ किलोग्रॅम) वेळेवर मिळाल्यामुळे भाताचे उत्पादन वाढण्यास मदत होते. खाचरात सेंद्रिय पदार्थ मिळाल्यामुळे जमिनीची जडणघडण सुधारून उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होते. २) सेंद्रिय पदार्थ मर्यादित प्रमाणात गाडल्यामुळे भात खाचरांतून निर्माण होणाऱ्या मिथेन वायूचे प्रमाण (म्हणजेच हवेचे प्रदूषण) कमी होते.

सूत्र ३ ः
नियंत्रित लावणी ः
नियंत्रित लावणी करावयाच्या सुधारित दोरीवर २५ सें.मी. व १५ सें.मी. आलटून-पालटून (२५-१५-२५-१५ सें.मी.) अंतरावर खुणा कराव्यात. सुधारित लावणी दोरीवर १५ सें.मी. अंतरावर असलेल्या (प्रत्येक दोन ते तीन रोपे प्रति चूड) प्रथम एक व नंतर दुसरा चूड लावावा. त्यानंतर अंदाजाने १५ सें.मी. पुढे आणखी तिसरा व चौथा चूड लावावा. अशा प्रकारे एकावेळी जोड-ओळ पद्धत वापरून त्याच दोरीत लावणीचे काम पूर्ण करावे. त्यानंतर मार्गदर्शक वापरून ४० सें.मी. दोरी मागे सरकवावी. पुन्हा जोड-ओळ पद्धत (चार चूड) वापरून खाचरातील नियंत्रित लावणी पूर्ण करावी. खाचरात अनेक १५ ु १५ सें.मी. चुडांचे चौकोन व २५ सें.मी. चालण्याचे रस्ते तयार होतात. लावणी करताना प्रत्येक चुडात दोन ते तीन रोपे लावावीत. संकरित भातासाठी एका ठिकाणी एक रोप लावावे. रोपे सरळ व उथळ (दोन ते चार सें.मी. खोलीवर) लावावीत.
फायदे ः प्रचलित पद्धतीपेक्षा बियाण्यांची ३० टक्के बचत होते व त्याच प्रमाणात रोपे तयार करण्याचे श्रम व पैसा वाचतो. त्याच प्रमाणात लावणी व कापणी करावी. कापणीवरील मजुरीचा खर्चही कमी होतो, त्यामुळे उत्पादन फायदेशीर होण्यास मदत होते.
शेतकऱ्यांना ब्रिकेट्‌सचा (खताच्या गोळ्यांचा) कार्यक्षम वापर करणे शक्‍य होते.

सूत्र ४ ः 
युरिया – डीएपी ब्रिकेटचा वापर ः
नियंत्रित लावणीनंतर त्याच दिवशी प्रत्येक चार चुडांच्या चौकोनात मधोमध सरासरी २.७ ग्रॅम वजनाची (युरिया – डीएपी) एक ब्रिकेट (खताची गोळी) हाताने सात ते दहा सें.मी. खोल खोचावी.
१) युरिया – डीएपी खत (६०ः४० मिश्रण) वापरून ब्रिकेट्‌स (२७ ग्रॅ. / १० ब्रिकेट्‌स) उशीच्या आकारात तयार करता येतात.
२) या रासायनिक मिश्र खतात नत्र (छ) व स्फुरद (झ२ज५) ही अन्नद्रव्ये ४ः२ या प्रमाणात असतात.
३) एका आरला ६२५ ब्रिकेट्‌स (१.७५ कि.ग्रॅ.) पुरतात. ४) खताची मात्रा (प्रति हेक्‍टरी) ५७ कि.ग्रॅ. नत्र + २९ कि. ग्रॅ. स्फुरद.
नियंत्रित लावणीनंतर त्याच दिवशी ब्रिकेट (युरिया – डीएपी) हाताने सात ते दहा सें.मी. खोल रोवण्याचे फायदे ः लावणी भातासाठी नत्र व स्फुरद वापरण्याची ही कार्यक्षम पद्धत आहे. पाण्याबरोबर नत्र व स्फुरदयुक्त खत वाहून जात नाही. खतामुळे होणारे प्रदूषण टळते. दिलेल्या खतापैकी ८० टक्‍क्‍यांपर्यंत नत्र भात पिकास उपयोगी पडते. खतात ४० टक्‍क्‍यांपर्यंत बचत होते ब्रिकेट्‌स खोल खोचल्यामुळे अन्नद्रव्ये तणाला मिळत नाहीत. तणाचा त्रास कमी होतो. भाताचे उत्पादन (दाणे व पेंढा) निश्‍चित वाढते.

Related posts

Shares