Search

खरीप हंगामाची झाली सुरुवात, योग्य नियोजनाची धरा वाट…

खरीप हंगामाची झाली सुरुवात, योग्य नियोजनाची धरा वाट…

पावसाचे आगमन झाले आहे, वरुण राजाने वेळेत हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच निसर्गाची साथ लाभल्याने शेतकरी बांधवांमध्ये उत्साह संचारला आहे. एकूणच पाहायला गेलं, तर आता शेती संदर्भातील विविध कामांनी जोर धरलाय. या हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांनी नियोजन सुरु केले आहे. खरीप हंगामाचा विचार करायचा झाल्यास तांदूळ,ज्वारी, नाचणी, कापूस,ऊस, सोयाबीन, कांदा, भाजीपाला इत्यादी पीकं घेतली जातात. योग्य नियोजन करून चाणाक्षपणे पावले उचलली गेली तर याचा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होऊ शकतो. ” देस्ता टॉकं”  च्या माध्यमातून शेतकरी बांधवांना अधिकाधिक मदत कशी करता येईल यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. या लेखात आपण ज्वारी लागवडीसाठी आवश्यक विविध पैलूंवर प्रकाशझोत टाकणार आहोत.

खरीप हंगामात विविध पिकांची लागवड केली जाते. पिकांची लागवड करताना सुधारीत जातीच्या वाणांची निवड करणे गरजेचे आहे. खरिपात घेतल्या जाणाऱ्या ज्वारीच्या पिकासाठी खालील वाणांची निवड करणे फायदेशीर ठरू शकते. म्हणूनच, आपल्या शेतीची उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी सुधारित जातीच्या वाणांबरोबरच योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

ज्वारी हे खरिपातील महत्त्वाचे जिरायती पीक आहे,  हे पिक योग्यप्रकारे घेतले गेले तर धान्य उपलब्धतेसोबतच जनावरांसाठी वैरणही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकते.

ज्वारीसाठी वाणांची निवड कशी करावी ?

खरीप हंगाम हा पावसाचा हंगाम आहे. अनेकदा पीक परिपक्व होताना पाऊस पडतो. याचा पिकावर परिणाम होतो. यामुळे, ज्वारीच्या दाण्यावर बुरशी वाढून ज्वारी काळी पडते. परिणामी उत्पादन वाढूनही उत्पन्नात घट होते. त्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथून प्रसारित वाण परभणी श्वेनता (पीव्हीके 801) आणि दुहेरी उपयुक्त सरळवाण पीव्हीके 809 लागवडीसाठी वापरावे.

 

 

परभणी श्वेळता (पीव्हीके 801)

 • दाण्याचे उत्पादन 32 ते 35 क्विंटल प्रतिहेक्टर.

 • कडब्याचे उत्पादन 90 ते 95 क्विंटल प्रतिहेक्टर.

 • दाण्यावरील बुरशीला प्रतिकारक्षण.

 • टपोरा व पांढरा दाणा.

 • खरीप ज्वारीच्या इतर सुधारित वाणांपेक्षा या सुधारित वाणाच्या दाण्यांमध्ये लोह (40 पीपीएम) व जस्त (22 पीपीएम) सर्वात जास्त आहे. या जातीच्या ज्वारीच्या भाकरीचे पोषणमूल्यसुद्धा अधिक असेल.

 

पीव्हीके 809

 • दाण्याचे उत्पादन 35 ते 36 क्विंटल प्रतिहेक्टार.

 • कडब्याचे उत्पादन 110 ते 115 क्विंटल प्रतिहेक्टार.

 • दाण्यावरील बुरशीला प्रतिकारक्षम.

 • मध्यम आकाराचा दाणा.

 

उत्पादनवाढीची प्रमुख सूत्रे

 • पेरणीचा कालावधी – खरिपात जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा हा ज्वारी लागवडीसाठी योग्य कालावधी आहे. पेरणीचा कालावधी लांबल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव वाढतो.
 • बियाण्याचे प्रमाण – संकरित ज्वारीसाठी हेक्टारी 7.5 किलो तर सुधारित वाणासाठी हेक्टजरी 10 किलो बियाणे वापरावे.
 • लागवडीचे अंतर व ताटांची संख्या – खरीप ज्वारीची पेरणी तिफणीने किंवा पाभरीने दोन ओळीतील अंतर 45 सें.मी. व दोन झाडातील अंतर 12 सें.मी. ठेवून करावी. शिफारशीप्रमाणे हेक्ट री 1.80 लाख झाडांची संख्या ठेवावी. त्याकरिता गरजेनुसार नांगी भरणे किंवा विरळणी करावी.

बीजप्रक्रिया –

 • ऍझोटोबॅक्टयर जीवाणू संवर्धक, नत्र व स्फुरद विद्राव्य जिवाणू 250 ग्रॅम प्रति 8 ते 10 किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
 • उशिरा पेरणी करावी लागल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी थायामेथोक्झा्म (70 टक्के) 3 ग्रॅम प्रति किलो प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

खत व्यवस्थापन

हेक्टवरी 5 टन शेणखत मातीत चांगले मिसळून द्यावे. खरीप ज्वारीस 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश प्रतिहेक्टमरी शिफारस केली आहे. त्यापैकी पेरणी करताना अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व संपूर्ण पालाश द्यावे. शक्यटतो पहिली मात्रा संयुक्त अथवा मिश्रखतातून (150 किलो 10-26-26 मिश्रखत व 50 किलो युरियाच्या माध्यमातून) द्यावी. उरलेले अर्धे नत्र पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी 85 किलो युरियाद्वारे द्यावे. खते पेरणीच्या वेळी बियाण्याखाली 5 सें.मी. द्यावी.

आंतरमशागत

पेरणीनंतर 8-10 दिवसांनी नांगी भरण करावी. 20 दिवसांत 15 सें.मी. अंतरावर 1 रोप याप्रमाणे विरळणी करावी. तणांचा बंदोबस्त करण्यासाठी पीक 40-45 दिवसाचे होईपर्यंत दोन वेळा खुरपणी व दोन वेळा कोळपणी करावी. पेरणी झाल्यानंतर लगेच, परंतु पीक उगवण्यापूर्वी ऍट्राझीन (50 टक्के डब्ल्यूपी) 1 किलो प्रतिहेक्ट री 750-1000 लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर फवारणी करावी.

 

 

आंतरपीक

 

download (1)

 

 1. खरीप ज्वारी + सोयाबीन 2-4 किंवा 3-6 या प्रमाणात दोन ओळीतील लागवड करावी.
 2. खरीप ज्वारी + तूर 3-3 किंवा 4-2 या प्रमाणात लागवड करावी.
 3. ज्वारीचा नोंदणीकृत बिजोत्पादन कार्यक्रम घेत असतांना आंतरपीक घेऊ नये.
 • बहुविध पीक पद्धती – खरीप ज्वारी नंतर हरभरा किंवा जवस किंवा करडईची लागवड करावी.
 • पीक संरक्षण – खोडमाशीच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रीन (10 टक्के प्रवाही) 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पेरणीनंतर 14 दिवसांनी फवारणी करावी.
 • काढणी व साठवण – पिकाच्या परिपक्व अवस्थेत काढणी करावी. दाण्यामध्ये 8 टक्के आर्द्रता राहील अशा प्रकारे उन्हात वाळवून साठवण करावी. कडब्याची कुट्टी करून साठवणूक करावी.
 • downloadउत्पादन – संकरित वाणापासून 40 ते 45 क्विंटल तर सुधारित वाणापासून 32 ते 35 क्विंटल प्रतिहेक्टररी धान्य उत्पादन होते. त्याच बरोबर 8 ते 10 टन कडब्याचे उत्पादन मिळते.

 

(ज्वारी संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

सन्दर्भ  – अग्रोवन

 

Related posts

Shares