Search

गाजर लागवडीचे पैलु

गाजर लागवडीचे पैलु

गाजर हे जमिनीत वाढणारे मूळ आहे. गाजराच्या पिकाला थंड हवामान मानवते. गाजरामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. डोळ्यांसाठी गाजर उत्तम आहे. गाजरामध्ये विटॅमिन ‘ए’ चा स्त्रोत असल्याने गाजराचे सेवन करणे लाभदायक ठरते. अशा बहुगुणकारी गाजराची लागवड कशी करावी जाणून घेऊया.

हवामान

 • उत्तम वाढीसाठी 18 ते 24 अंश से. तापमान अतिशय पोषक आहे.
 • गाजराला आकर्षक रंग येण्यासाठी तापमान 15-20 अंश से. असावे लागते.
 • 10 ते 15 अंश से. तापमानाला तसेच 20 ते25 अंश से.तापमानाला गाजराचा रंग फिक्कट असतो.

जमिन

 • गाजराची वाढ व्यवस्थित होण्यासाठी लागवडीसाठी निवडलेली जमिन मऊ भुसभुशीत असावी.
 • गाजराच्या लागवडीसाठी खोल भुसभुशीत गाळाची आणि पाण्याचा उत्तमनिचरा होणारी, सामु 6 ते 7 असणारी जमिन निवडावी.

krushi-expertsm

लागवड

 • ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी व नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडयात गाजराची लागवड केल्यास जास्त उत्पादन मिळून गाजराचा आकार आणि रंग चांगला राहतो.
 • परंतु गाजराची लागवड सप्टेबर ते डिसेंबर महिन्यापर्यंत करता येते.
 • रब्बी हंगामातील लागवड ऑगस्ट ते डिसेबर तर खरीप हंगामातील लागवड जून ते जूलै महिन्यात करतात.

लागवड पध्दती

 • गाजराच्या लागवडीसाठी जमिन खोल उभी – आडवी नांगरुन घ्यावी.
 • जमिन सपाट करुन घ्यावी. बी सरीवरंब्यावर पेरावी.
 • दोन वरंब्यातील अंतर 45 सेमी ठेवावी बियाची टोकून पेरणी करतांना 30 ते 45 सेमी अंतरावर सरी ओढून दोन्ही बाजूंनी 15 सेमी अंतरावर टोकन पध्दतीने लागवड करावी.
 • एक हेक्टर क्षेत्रासाठी गाजराचे सुमारे 4 ते 6 किलो बियाणे लागते.

खते आणि पाणी व्यवस्थापन

 • गाजराच्या पिकाला दर हेक्टरी 80 किलो नत्र 60 किलो स्फूरद आणि 60 किलो पालाश द्यावे.
 • नत्राची अर्धी मात्रा आणि स्फूरद व पालाशची संपूर्ण मात्रा पेरणीपूर्वी द्यावी.
 • नत्राची उर्वरित अर्धी मात्रा लोगवडीनंतर 20 दिवसांनी द्यावी.
 • जमिनीच्या मगदुरानुसार 20 ते 30 गाडया शेणखत जमिनीच्या पूर्वमशागतीच्या वेळी मिसळून द्यावे.

पाणी व्यवस्थापन

 • बियांची उगवण चांगली होण्यासाठी जमिन तयार झाल्यावर वाफे आधी ओलावून घ्यावेत, पेरणी केल्यानंतर लगेच हलके पाणी द्यावे.
 • उगवण झाल्यावर नियमित पाणी देऊन पिकाच्या 50 दिवसाच्या कालावधीत जमिनीत चांगला आंलावा टिकून राहील याची काळजी घ्यावी.
 • गाजर काढणीपूर्वी 15 ते 20 दिवस पाणी देणे बंद करावे म्हणजे गाजरात गोडी निर्माण होते.
 • पाण्याचे प्रमाण जास्त झाले तर गाजरात तंतुमय मुळांची वाढ जास्त होते.

काढणी

 • कुदळीने खोदून हाताने उपटून किंवा नागराच्या ससाहारूयाने गाजराची काढणी करावी.
 • गाजरावरील पाने कापून गाजरे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत.
 • लहान मोठी गाजरेआकारानुसार वेगळी करावीत.
 • गाजराचे उत्पादन हेक्टरी 8 ते 10 टन इतके मिळते.

Related posts

Shares