Search

गारपिटीची शक्यपता मावळली

गारपिटीची शक्यपता मावळली

विदर्भात सरीवर सरी; आजही पावसाचा अंदाज 

पुणे – गेल्या आठवडाभरात राज्यात ठिकठिकाणी सातत्याने सुरू असलेली गारपीट अखेर थांबण्याची चिन्हे आहेत. हवामान खात्याने फक्त गुरुवारी (ता.16) मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये एखाद-दुसऱ्या ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा दिला असून, गुरुवारपासून (ता.17) राज्यात कोठेही गारपीट होण्याची शक्‍यता नसल्याचे स्पष्ट केले आहे. गुरुवारी सकाळपर्यंत विदर्भात अनेक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस झाला.

कुलाबा व पुणे वेधशाळांनी गुरुवारी मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी, तर कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे, तर भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) गुरुवारपासून राज्यात सर्वत्र हवामान कोरडे राहणार असल्याचे स्पष्ट केले असून, पावसाचा किंवा गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त केलेला नाही.

बुधवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडला. कोकणात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या संपूर्ण भागात कमाल तापमानात सरासरीहून पाच ते आठ अंश सेल्सिअसने उल्लेखनीय घट झाली आहे. किमान तापमानही बहुतेक ठिकाणी सरासरीहून घसरलेले होते. भिरा येथे राज्यात सर्वाधिक 35 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

अरबी समुद्रावर समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर लक्षद्वीपच्या भागात चक्राकार वारे सक्रिय आहे. दुसरीकडे मध्य प्रदेशवरही चक्राकार वारे सक्रिय आहे. या दोन्ही चक्राकार वाऱ्यांदरम्यान म्हणजेच लक्षद्वीपपासून कर्नाटक, मध्य महाराष्ट्र ते मध्य प्रदेशच्या दक्षिण भागापर्यंत समुद्रसपाटीपासून दीड किलोमिटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. दक्षिण अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. हिमालयात पश्‍चिमी चक्रावात सक्रिय झाला असून, त्याचा प्रभाव 19 एप्रिलनंतर पश्‍चिम हिमालयीन भागात जानवेल, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे.

विदर्भ – बेलोरा 32.2, अंबाडा 24, रिधोरा 20, मेटपांझरा 18, कामठी 17.6, पुसाळा 16, मोर्शी 15, नागपूर व पार्डी प्रत्येकी 14.8, लोणी 13.3, असराली 12.8 सावरगाव 12, नरखेड 9.2, सोयगाव 7.3, बोरी, वाडी, बुलडाणा, राजुरा, काटोल प्रत्येकी 6, खापरी 5, धुळघाट, कोरडी, कळमेश्‍वर, किट्टीपूर व धारणी प्रत्येकी 4, अर्णी व वर्धा प्रत्येकी 1

मध्य महाराष्ट्र – लोणावळा 30, खडकाळा 19, महाबळेश्‍वर 13.4, यवत 11, जामखेड 9.4, नायगाव, केडगाव व लामज प्रत्येकी 8, तापोळा 5, शिवने 4, त्र्यंबकेश्‍वर 3, वडगाव मावळ व जुन्नर प्रत्येकी 2,

मराठवाडा – मानवत व नांदपूर प्रत्येकी 20, अखाडा 12, पाली 10, कळमनुरी 5, पाडोदा व वरंगा प्रत्येकी 4, कावडगाव व पाथरी प्रत्येकी 3

 

Source-  http://www.agrowon.com/Agrowon/20150416/5456019428296038880.htm

Related posts

Shares