Search

मान्सून मध्ये चांगल्या पावसाची शक्यता

मान्सून मध्ये चांगल्या पावसाची शक्यता
[Total: 1    Average: 1/5]

buttons eng-minसतत दोन वर्षे सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता.  मात्र, यंदा समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याचा कृषी क्षेत्राला निश्चितच फायदा होणार आहे, यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल अशी अपेक्षा भारतीय हवामान खात्याने आधीच व्यक्त केली आहे. याचाच अर्थ यावर्षी सरासरीपेक्षा अधिक मान्सून मुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक यांसारख्या कृषी राज्यांमधील शेतकऱ्यांसाठी आशादायी चित्र निर्माण झाले आहे. स्कायमेट या खाजगी संस्थेने देखील यंदा साधारण १०५% पाऊस होईल असे सांगितले आहे.

तुम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल :

एकूणच पाहायला गेलं तर येणारा मान्सून  सुखांचा वर्षाव करणारा ठरणार आहे. प्रथमदर्शनी यामुळे ग्रामीण भागातील उत्पन्न वाढ तसेच इतर अनेक पैलूंवर सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे.

ग्रामीण उत्पन्नास चालना

चांगल्या पावसामुळे जलसंधारण आणि शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. परिणामी अन्न धान्य चांगल्या प्रमाणात येऊन अधिक उत्पादन होण्यास मदत होणार आहे. उत्तम पुरवठ्यामुळे अन्न धान्याच्या किंमती स्थिर राहतील आणि यामुळे महागाई नियंत्रणात राहील, याचा निश्चित फायदा शेतकऱ्यांन होईल असे मत तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. देशात काम करणाऱ्यांपैकी अर्ध्याहून अधिक लोक हे कृषी क्षेत्राशी संलग्न आहेत. भारतातील ६०% पेक्षा अधिक कृषी क्षेत्र पावसावर अवलंबून असते, हे लक्षात घेता सरासरीपेक्षा अधिक पावसाचे भाकीत कृषी क्षेत्राला नवसंजीवनी मिळवून देण्यास कारणीभूत ठरत आहे.

महागाई नियंत्रण

सरासरीपेक्षा अधिक किंवा समाधानकारक पर्जन्यवृष्टी मुळे ग्रामीण भागातील जनतेच्या चिंता कमी होतील. ग्रामीण उत्पन्नात होणारी वाढ, मुबलक उत्पादन  आणि चांगल्या अन्न धान्याचा योग्य पुरवठा या सगळ्यामुळे महागाई नियंत्रणात राहील असे मत इकॉनॉमिक टाईम्स ने व्यक्त केले आहे. मध्यम किंवा चांगला मान्सून झाल्यास जी. डी. पी. दरात नक्की वाढ होईल असा आशावाद केंद्रीय अर्थमंत्री श्री. अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे.

खतांच्या मागणीत वाढ

जलसंधारण आणि खते यांना चांगल्या पावसाचा थेट फायदा होणार आहे. कारण मागील दोन वर्षातील दुष्काळ स्थिती लक्षात घेता कृषी क्षेत्रात कमी लागवड झाली होती, याचा थेट फटका खते आणि कीटकनाशके तयार करणाऱ्या कंपन्यांना बसला होता. मात्र यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यास लागवड अधिक प्रमाणात होईल आणि यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या उत्पादनांची मागणी वाढणार आहे.

संदर्भ – स्कायमेट

Related posts

Shares