Search

जलसंधारणाचे पर्याय

जलसंधारणाचे पर्याय

कृषिप्रधान देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या भारत देशात आजही शेती निसर्गावरच अवलंबून आहे. बहुतांश भागात शेती पूर्णतः पावसावरच विसंबून  आहे. यामुळेच जेव्हा पाऊस कमी होतो तेव्हा कृषी क्षेत्राला पाण्याच्या कमतरतेचा सामना करावा लागतो. परिणामी याचा प्रभाव अर्थव्यवस्थेवर देखील होतो. दरवर्षी पावसाचे घटते प्रमाण पाहता पाण्याची बचत आणि साठवणूक महत्वाची ठरते. जलसंधारणाचे पर्याय या लेखात आपण अशाच महत्वपूर्ण पर्यायांचा आढावा घेऊया.

पाण्याची कमतरता कशी दूर करता येईल?

योग्य नियोजनाअंतर्गत पाणलोट क्षेत्राचा विकास केल्यास पाणी कमतरतेच्या समस्येवर निश्चित तोडगा निघू शकतो.

पाणलोट क्षेत्र म्हणजे नेमके काय?

पाण्याचा नैसर्गिक स्त्रोत उपलब्ध असलेली जागा म्हणजेच पाणलोट क्षेत्र. अशा जागेत पाणी एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवाही असते.

पाणलोट क्षेत्राचे प्रकार

  1. लघु पाणलोट क्षेत्र – १० हेक्टर पर्यंत
  2. मध्यम पाणलोट क्षेत्र  – २०० हेक्टर पर्यंत
  3. मोठे पाणलोट क्षेत्र – ४०० हेक्टर पर्यंत.
  4. नदी खोरे – मर्यादा नाही.

जलसंधारणाचे महत्व :

  • मातीची धूप थांबते.
  • पाण्याची साठवणूक करणे शक्य होते.
  • शेती उत्पादनात वाढ होते.
  • जैविक संतुलन होते.
  • जनावरांना चार उपलब्ध होतो.

सरकार आपल्या पातळीवर अशा योजना राबवत असतेच, मात्र शेतकऱ्यांनी देखील शाश्वत शेतीसाठी स्वतःहून पुढाकार घेऊन पाण्याची साठवणूक करण्यासाठी सकारात्मक पावले उचलणे गरजेचे आहे. कारण यामुळे मातीचे देखील संवर्धन होते.

पाणी साठवणुकीसाठी शेतकरी कमी गुंतवणुकीत खालील उपाययोजना करू शकतात.

1. शेत तळे

जलसंधारणाचे पर्याय

पाण्याची साठवणूक करण्यासाठीची हि तशी पाहायला गेलं तर सोप्पी पद्धत आहे. शेत तळे एकट्याने किंवा समूहाने बांधणे शक्य आहे.

2. सुक्या विहिरींमध्ये पावसाचे पाणी साठवणे

जलसंधारणाचे पर्याय
पावसाचे पाणी वाया जाते. हे पाणी जुन्या सुकलेल्या विहिरींची डागडुजी करून यामध्ये साठवले असता दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये या पाण्याचा वापर करता येऊ शकतो.  यासाठी केवळ वाहून जाणारे पावसाचे पाणी योग्य दिशेने वळवणे गरजेचे असते.

3. छोट्या ओढ्यांवर बंधारे बांधणे

जलसंधारणाचे पर्याय
यामुळे जमिनीच्या भूगर्भातील पाण्याची पातळी वाढते. अशाप्रकारे जमिनीत पाण्याचा निचरा झाल्याने मातीची आर्द्रता वाढते. याचा फायदा रब्बीतील शेतीला होऊ शकतो.

4. बेंच टेरेसिंग

जलसंधारणाचे पर्याय
उतार असलेल्या जागी या पद्धतीचा अवलंब करता येतो. यामुळे वेगाने वाहून जाणाऱ्या पावसाच्या पाण्यावर निर्बंध येतो आणि मातीतून पाण्याचा निचरा झाल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी सुधारते.

5. मोकळ्या जागी वृक्ष लागवड

झाडांची लागवड करणे नक्कीच फायद्याचे ठरू शकते. कारण यामुळे केवळ जमिनीतील पाण्याची पातळी चांगली राहते आणि जमिनीची धूप देखील थांबते.

6. ठिबक सिंचनाचा वापर

जलसंधारणाचे पर्याय

ठिबक  सिंचनाच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत होते. कारण ठिबक सिचनाद्वारे थेट रोपाच्या मुळाशी पाणी जाते, यामुळे तणांची वाढ होत नाही. यामुळे दर्जेदार उत्पादन कमी खर्चात घेणे शक्य होते.

पीक पद्धतीत बदल

पिकाची निवड करताना आपल्या विभागातील पाण्याचीउपलब्धता , पावसाची स्थिती/सरासरी याचा विचार करणे आवश्यक आहे. कारण ऊसासारख्या पिकाला मोठ्या प्रमाणात पाणी लागते. अशावेळी पिकाला  लागणाऱ्या पाण्याचा विचार करून आवश्यक तिथे पीक पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे.

खतांचे नियोजन

सेंद्रिय खतांचा अधिक वापर करून रासायनिक खतांचा मर्यादित वापर केल्यास शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यात कपात करता येणे शक्य आहे. कारण घटक स्वरूपातील रासायनिक खतांचा अधिक प्रमाणात वापर केल्याने जमिनीची गुणवत्ता ढासळते.

मल्चिंग पेपर

मल्चिंग च्या वापरामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी प्रमाणात होते यामुळे जमिनीतील आर्द्रता टिकून राहते. यामुळे तणांवर नियंत्रण ठेवता होते. महत्वाचे म्हणजे बहुतांश पिकांसाठी पिकांसाठी मल्चिंग चा वापर करणे शक्य आहे.

मल्चिंग–ज्ञानकोष डाउनलोड करण्यासाठी खालील फॉर्म भरा

जिल्हा:

Related posts

Shares