Search

जुलै महिन्यातील बागेचे व्यवस्थापन

जुलै महिन्यातील बागेचे व्यवस्थापन

buttons eng-min

जुलै महिन्यापर्यंत पाऊस बऱ्यापैकी स्थिरस्थावर झालेला असतो. एकदा पाऊस पडायला सुरुवात झाली की मग शेतकऱ्यांना नियोजन करणे गरजेचे असते. फळबागा, फुलझाडे आणि रोपवर्गीय भाज्यांची बाग याची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊया. “जुलै महिन्यातील बागेचे व्यवस्थापान या लेखात महत्वाच्या पैलूंचा आढावा घेऊया.

पावसातील बागेची काळजी :

 • बागेत स्वच्छता ठेवावी.

बागेत पावसाचे पाणी आल्यास साचणार नाही याची काळजी घ्यावी.

जास्त पाणी बागेबाहेर काढून द्यावे.

बागेतील तण वेळचेवेळी काढून टाकावेत.

रोगट फळे, फुले झाडावरच न ठेवता ती तोडून त्याचा नाश करावा.

फळबागाची काळजी अशी घ्या :

banana

 • सर्व फळझाडांची लागवड करा.
 • फळांना व रोपांना आधार द्यावा.
 • मृगबहार धरलेल्या फळझाडांवर औषध फवारणी करावी व खते द्यावीत.
 • केळीची लागवड करावी.
 • रोपांची निवड खात्रीलायक ठिकाणाहून करावी.
 • टीश्युकल्चर तसेच कंदाची निवड निरोगी व अधिक उत्पन्न देणाया बागेतून करावी.

भाजीपाला पिकाची काळजी :

leafy vegetables

 • टोमँटो, वांगी, मिरची रोपांची पुनर्लागण करावी.
 • लागण करतेवेळी शिफारशीप्रमाणे अँझोटोबँक्टर व स्फुरद जीवाणू द्रावणाची मुळावर प्रक्रीया करा.
 • पिकसंरक्षण आणि खताची मात्रा द्यावी.#पालेभाज्यांमध्ये मेथी, पालक, शेपू आणि कोथिंबीर यांची लागवड करावी.
 • भेंडीची शिफारसीत जातीची निवड करून लागण करावी.
 • उन्हाळी भाजीपाल्याची काढणी करून प्रतवारी करून विक्रीस माल बाजारात पाठवावा.

फुल पिकांची काळजी :

flower

 • शेवंतीची सोनालीतारा, आय.आय.एच.आर. सिलेक्शन ४ या जातीची निवड करून शिफारशीप्रमाणे लागवड करा.
 • गुलाबाच्या ग्लँडीयटर, पॉपलर इ. जातीची निवड करून लागवड करा.
 • खरड छाटणी करून पिकसंरक्षण करा.
 • ग्लँडीओलसच्या सुधारीत जातीची निवड करून ताम्रयुक्त औषध ३ टक्के प्रक्रीया करून लागवड करा.
 • हंगामी फुलझाडे – अँस्टर, ग्लँर्डीया, झेंडू, . पिकांची रोपे तयार करण्यासाठी बी पेरावे.#
 • मेजून मध्ये लागवड केलेल्या गुलछडी व शेवंती पिकास अनुक्रमे ७० किलो प्रती हेक्टर आणि १०० किलो प्रती हेक्टर या प्रमाणात नत्राचा पहिला हप्ता द्यावा.
 • निशिगंध व शेवंती वरील करपा रोगाकरीता अथवा मँन्कोझेब ०.२ तीव्रतेचे द्रावण दर १५ दिवसांनी फवारावे.
 • गुलाबावरील करपा नियंत्रणासाठी मँन्कोझेब ०.२ तीव्रतेचे द्रावण किंवा टिल्ट ०.५ टक्के तीव्रतेचे द्रावण दर आठ दिवसांनी फवारावे.#
 • हरीतगृहातील जरबेरावरील करपा नियंत्रण करण्यासाठी बेनोमिल ०.१ टक्के अधिक मँन्कोझेब ०.२ टक्के आठ दिवसाच्या अंतराने फवारावे.#
 • औषध फवारणी करताना स्टीकर १० मि.ली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात वापरावे.

संदर्भ – महाराष्ट्र शासन कृषी विभाग – फेसबुक पेज 

Related posts

Shares