Search

जुलै महिन्यातील शेती कामे – गळीत पिके

जुलै महिन्यातील शेती कामे – गळीत पिके
[Total: 1    Average: 3/5]

buttons eng-minजुलै महिन्यात करायची शेती कामे या मागील भागात आपण शेती पिकांसंदर्भातील विविध कामांचा आढावा घेतला. या भागात आपण गळीत पिकांशीनिगडित कोणती कामे करावीत याची माहिती घेऊया.

भुईमूग

Groundnut

भुईमुगाची पेरणी ७ जुलैपूर्वी पूर्ण करावी. #पेरणी करताना शिफारस केलेल्या वाणांचा वापर करावा. जर ७ जुलैपर्यंत पेरणी न झाल्यास भुईमूगाऐवजी एरंडी / सुर्यफूल यासारखी पीक घ्यावीत. भुईमूगावरील मुळकुजव्या व जमिनीतून उदभवणाया इतर रोगाच्या परिणामकारक व आर्थिकदृष्ट्या फायद्याचे नियंत्रणासाठी थायरम अथवा बाविस्टीन या बुरशीनाशकाची अथवा ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ५ ग्रँम व नत्र स्थिर करणाया रायझोबियम आणि स्फुरद विरघळविणाया स्फुरद जीवाणूंची प्रत्येकी २५ ग्रँम प्रतीकिलो बियाणे या प्रमाणे बीजप्रक्रीया करावी.

सूर्यफूल

sunflower

सूर्यफुलाची पेरणी १५ जुलैपर्यंत संपवावी. पेरणी मध्यम जमीन – ४५ X २० सें.मी., भारी जमीन ६० X ३० सें.मी.बियाणे हेक्टरी १० किलो वापरा.#पेरणीपूर्वी बियाण्यास २ ग्रँम प्रति किलो या प्रमाणात कँप्टन किंवा कार्बेन्डँझीम या बुरशीनाशकाची बिजप्रक्रीया करून घ्यावी. नंतर अँझोटोबँक्टर व स्फुरद जीवाणूची प्रत्येकी २५० ग्रँम प्रती १० किलो बियाण्यावर बिजप्रक्रीया करा. हेक्टरी झाडांची संख्या ८०,००० ते १,००,००० ठेवा.

एरंडी

castor

एरंडीचे पीक घेण्यासाठी हलक्या ते मध्यम जमीन उपयोगी असते. एरंडीचे पीक घेताना सुधारीत व शिफारस केलेल्या गिरीजा, अरूणा, व्ही.आय. ९ यापैकी एक वाण पेरा.# पेरणीकरीता गिरीजा व व्ही.आय.९ या वाणांचे हेक्टरी १२ ते १५ किलो बी वापरा. अरुणा ह्या वाणासाठी हेक्टरी २० ते २२ किलो बी वापरावी .पेरणीचे अंतर गिरीजा व व्ही.आय.९ या वाणांसाठी ९० X ४५ आणि अरूणा ह्या वाणासाठी ६० X ४५ सें.मी. ठेवा.३० किलो नत्र व ४० किलो स्फुरद पेरणीचे वेळी द्यावे . उरलेले अर्धे नत्र (३० किलो) पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी द्यावे. पेरणीपूर्वी बियाण्यावर अँझोटोबँक्टर व स्फुरद जीवाणूची २५० ग्रँम प्रती दहा किलो बियाण्याच्या प्रमाणात बीजप्रक्रीया करा.

कारळा

niger crop

कारळा या पिकाची पेरणी १५ ऑगस्टपर्यंत करणे गरजेचे आहे. पेरणीसाठी सह्याद्री या वाणाचा वापर करा.पेरणी उतारास आडवी करा.पेरणीपूर्वी बियाण्यास अँझोटोबँक्टर, स्फुरद जीवाणूची बिजप्रक्रीया करा.बियाण्यात १:३ या प्रमाणात वाळू मिसळून पेरणी करा.पेरणीनंतर १५ दिवसांनी विरळणी करा. दोन रोपातील अंतर १० सें.मी. ठेवा.पेरणी करताना प्रतिहेक्टरी १० किलो नत्र द्यावे.

Related posts

Shares