Search

जुलै महिन्यात करायची शेती कामे – शेती पिके

जुलै महिन्यात करायची शेती कामे – शेती पिके
[Total: 6    Average: 4.5/5]

buttons eng-min

मान्सून च्या पावसाने हजेरी लावली की शेतीकामाला वेग येतो. जसजसा हंगाम पुढे सरकतो तशी शेतीची कामे बदलत जातात. यासाठी योग्य नियोजन गरजेचे असते. जुलै महिन्यात करायची शेती कामे संदर्भात जाणून घेणे गरजेचे आहे 

सोयाबीन –

soybean

पिकातील खोडमाशी व चक्री भुंग्याच्या नियंत्रणासाठी

Khod mashichakri bhunga

१०% दाणेदार फोरेट दहा किलो प्रती हेक्टरी पेरावे. पाने गुंडाळणार्‍या आळीच्या नियंत्रणासाठी २१ दिवसा नंतर क्लोरोपायरीफोस २० मि.ली. किंवा मोनोक्रोटोफोस १५ मि.ली. अधिक २५मिली. % निंबोळी अर्क प्रती १० लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी.पिकास ३० दिवसांनंतर नत्राची मात्रा देवू नये. तण नियंत्रणासाठी तणे उगवून आल्या नंतर २२ दिवसा नंतर इमेझाथाइपर तंननाशकाची पाण्यातून फवारावे.

कापूस

cottonलागवडीची दिशा दक्षिणउत्तर असावी. बांधावर चवळीची लागवड करावी. किनारची २ पट्टे बगर बीटी लागवड करावी. लागवडी नंतर नांग्या पडलेल्या ठिकाणी बियांची टोकन लवकर करून घ्यावी. तण नियंत्रणात ठेवावे. लागवडीच्या वेळी द्यावयाची खत मात्रा:

कोरडवाहु २०:६०:६० किलो नत्र: स्फुरद: पालाश /हेक्टर द्यावी.

बागायती ३०:७५:७५ किलो नत्र: स्फुरद: पालाश /हेक्टर द्यावी.

सोबत मॅग्नेशियम सल्फेट२५ किलो , सल्फर२० किलो,झिंक१५ किलो,बोरॉन५ किलो प्रति हेक्टर द्यावे. लागवडी वेळी सूक्ष्म अन्न द्रव्य दिली नसल्यास ३० दिवसांनी पेरून द्यावी.

ऊस –

sugarcaneआडसाली ऊसाची लागवड या महिन्यात सुरू करून १५ ऑगस्ट पर्यत संपवा. शक्यतो आडसाली ऐवजी पूर्वहंगामी ऊसाची लागवड करा. पूर्वहंगामी ऊसाची लागणीचे अगोदर खरीपामध्ये सोयाबीन हे फेरपालटीचे पीक म्हणून घ्या.

नागली –

nachani पेरणी / लागण उतारास आडवी करा. कुलथी मिश्र पीक घ्यावे.नागली रोपांची लागण ओळीत करावी. (१५ X १० सें.मी.) पेरणीपुर्वी अँझोटोबँक्टर व स्फुरद जीवाणूची २५० ग्रँम प्रती किलो बियाण्यावर बिजप्रक्रीया करावी.

बाजरी –

jwariशिफारस केलेल्या पेरणीसाठी निवड करा. १५ जुलैपर्यंत पेरणी करा.पेरणीपुर्वी अँझोटोबँक्टर व स्फुरद जिवाणूंची प्रत्येकी २५० ग्रँम प्रती १० किलो बियाण्यावर बिजप्रक्रीया करा. रासायनिक खतांचा वापर करा. पेरणीच्या वेळी एक हप्त्यात हलक्या जमिनीत ५०:२५ किलो नत्र व स्फुरद प्रती हेक्टरी द्या. मध्यम ते भारी जमिनीत ३० किलो नत्र स्फुरद प्रति हेक्टरी पेरणीच्या वेळी द्या. पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी नत्राचा ३० किलो प्रतिहेक्टरी हप्ता द्या.

संदर्भ – महाराष्ट्र शासन कृषी विभाग – फेसबुक पेज 

Related posts

Shares