Search

टोमॅटोचे एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन

टोमॅटोचे एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन

टोमॅटो हे महारष्ट्रातील महत्वाचे पिक आहे. विविध किडी व रोगांच्या प्रादुर्भावामुळे टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या किडी व रोग कोणते आणि याचे नियंत्रण कसे करावे, याबाबतची माहिती पुढील लेखात दिलेली आहे.

टोमॅटोवरील किडी:

1. मावा,तुडतुडे व फुलकिडे

टोमॅटो

लक्षणं

 • या किडी झाडातील अन्नरस शोषतात परिणामी पान पिवळे पडते.
 • पुढे या किडी विषाणूजन्य रोगाचा प्रसार करतात.
 • विषाणूजन्य रोगांवर कुठलाही उपाय उपलब्ध नाही.

नियंत्रणाचे उपाय

 • टोमॅटो रोपांची लागवड करण्यापूर्वी, रोपांची मुळे इमिडाक्‍लोप्रिड किंवा थायामेथोक्‍झाम 5 मिली प्रति 10 लिटर या द्रावणात अर्धा तास बुडवून ठेवावीत. त्यानंतर लागवड करावी.
 • या किडीचा प्रादुर्भाव प्रथम पानांवर दिसताच, निंबोळी अर्क पाच टक्के किंवा निंबोळी तेल 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.
 • प्रादुर्भावग्रस्त पाने, फळे ही किडीच्या अवस्थांसह गोळा करून नष्ट करावीत.
 • कामगंध सापळे 5 हेक्‍टरी शेतात लावावेत. काळ्या रंगाचे चिकट सापळे, वॉटर ट्रॅप, प्रकाश सापळे तसेच चिकट प्लॅस्टिक फिल्मचा वापर करावा. त्यामुळे या किडीचे सर्वेक्षण व नियंत्रणासाठी मदत होते.

2. फळे पोखरणारी अळी

टोमॅटो
लक्षणं

 • मादी पतंग पानावर, फुलांवर अंडी घालतात.
 • अंड्यातून बाहेर पडल्यानंतर अळी कोवळी पाने खाऊन वाढते.
 • नंतर फळे आल्यावर फळे खाऊ लागते.
 • अळी फळावर छिद्रे पाडून पुढील अर्धे शरीर फळांत ठेवते.त्यमुळे फळे सडतात.
 • जानेवारी ते मे दरम्यान या अळीचा प्रादुर्भाव जास्त असतो.

नियंत्रणासाठी उपाय

 • बॅसिलस थुरीन्जिएन्सीस प्रतिहेक्‍टरी 25 किलो किंवा ऍझाडीरेक्‍टीन (1 टक्के) 25 मिलि किंवा प्लुबेडिंयामाईड 2 मिलि.
 • डायमेथोएट (30 टक्के प्रवाही) 16 मिलि, किंवा इमिडाक्‍लोप्रीड 3 मिलि, किंवा मिथाईल डेमेटॉन (25 टक्के प्रवाही) 15 मिलि.

3. नागअळी

टोमॅटो
लक्षणं

 • अळी रंगाने पिवळी असते. माशी अगदी लहान असून सहजासहजी दृष्टीस पडत नाही.
 • परंतु अळीमुळे प्रादुर्भाव झालेली पाने मोठ्या प्रमाणात दिसू लागतात.
 • अळी पानाच्या वरील पापुद्र्याखाली राहून आतील भाग कुरतडत पुढे सरकते. ही अळी जशी पुढे सरकते तशा पानांवर पांढर्‍या नागमोडी रेषा पडतात. किडीच्या प्रादुर्भावमुळे पानांची अन्न तयार करण्याची क्रिया कमी पडते. त्यामुळे उत्पादन घटते.

नियंत्रणासाठी उपाय:

 • बॅसिलस थुरीन्जिएन्सीस प्रतिहेक्‍टरी 25 किलो किंवा ऍझाडीरेक्‍टीन (1 टक्के) 25 मिलि किंवा प्लुबेडिंयामाईड 2 मिलि.
 • टोमॅटो रोपांची लागवड करण्यापूर्वी, रोपांची मुळे इमिडाक्‍लोप्रिड किंवा थायामेथोक्‍झाम 5 मिली प्रति 10 लिटर या द्रावणात अर्धा तास बुडवून ठेवावीत. त्यानंतर लागवड करावी.
 • फिप्रोनील 15 मि.लि. किंवा डायमेथोएट किंवा मिथिल डिमेटॉन 10 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून रोपावर फवारावे.
 • सूत्रकृमींचा उपद्रव कमी होण्यासाठी टोमॅटोच्या पिकाभोवती झेंडू, सदाफुली यासारख्या फुलांची लागवड करावी.
 • 60-100 मेश नायलॉन नेट किंवा पांढरे पातळ मलमल कापड 2 मीटर उंचीपर्यंत मच्छरदाणीसारखे गादीवाफ्यास लावावे. यामुळे रोगाचा प्रसार करणाऱ्या किडींना रोखणे शक्‍य होईल.

टोमॅटोवरील रोग

1. करपा

टोमॅटो
लक्षणं

 • हा एक बुरशीजन्य रोग आहे.
 • यामुळे पानांवर तपकिरी रंगाचे ठिपके पडतात.
 • नंतर ते आकाराने वाढतात संपूर्ण पान वाळते.
 • दमट हवामान  ह्या रोगासाठी पोषक आहे.
 • या रोगामुळे फळांवरही चट्टे पडुन फळांची प्रत खालावते.

नियंत्रणाचे उपाय

 • या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी झायनेब, डायथेन एम-45 किंवा डायफोलटान यापैकी एका बुरशीनाशकांची फवारणी 2 किलो / हेक्‍टरी करावी.
 • मॅन्कोझेब 25 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्‍झीक्‍लोराईड 30 ग्रॅम / क्‍लोरोथॅलोनील 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून फवारावे. आवश्‍यकतेनुसार तीन ते चार फवारण्या कराव्यात.

2. बोकड्या / पर्णगुच्छ

टोमॅटो
लक्षणं

 • हा एक विषाणूजन्य रोग आहे.
 • या रोगामुळे पाने बारीक, खडबडीत होऊन सुरकुत्या पडल्यासारखी दिसतात व झाडाची वाढ खुंटते.

3. टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस

टोमॅटो
लक्षणं

 • शेंड्याकडील नवीन पानांवर प्रथम लहान, तांबूस-काळसर ठिपके-चट्टे दिसतात.
 • रोगाचे प्रमाण वाढून तीन-चार दिवसांत कोवळी पाने करपून काळी पडतात व शेवटी झाड करपते व मरते.
 • फळावर पिवळसर-लाल डाग तसेच गोलाकार एकात एक वलये दिसून येतात.
 • फळे पूर्ण वाढ होण्यापूर्वीच पिकतात आणि त्यांना एकसारखा आकर्षक लाल रंग येत नाही.

नियंत्रणाचे उपाय

 • या रोगाच्या नियंत्रणासाठी फुलकिडे, पांढरी माशी, मावा, तुडतुडे या रसशोषण करणा-या किडींचे नियंत्रण करणे गरजेचे आहे.
 • बियाणे पेरणीपूर्वी इमिडाक्‍लोप्रीड किंवा कार्बोसल्फान (पाच ग्रॅम प्रति किलो) अधिक ट्रायकोडर्मा (पाच ग्रॅम प्रति किलो) यांची बीजप्रक्रिया करून बियाणे पेरावे.
 • पेरणीपूर्वी गादीवाफ्यावर फोरेट 25 ग्रॅम प्रति 3 x 1 मीटर आकाराच्या गादीवाफ्यात मिसळावे.
 • इमिडाक्‍लोप्रीड 10 मि.लि. किंवा कार्बोसल्फान 20 मि.लि. अधिक ट्रायकोडर्मा पावडर 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून त्यात रोपांची मुळे 10 ते 15 मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी.
 • रोगाची लक्षण दिसताच रोगग्रस्त झाडे उपटून जमिनीत गाडून टाकावी किंवा जाळून नष्ट करावीत.

Related posts

Shares