Search

डाळिंब व्यवस्थापन- भाग 1

डाळिंब व्यवस्थापन- भाग 1

उन्हाळी हंगामात विविध प्रकारच्या पिकांची शेती केली जाते. फळांच्या बाबतीत म्हणायचे झाल्यास कोरडवाहू शेतीमध्ये ‘डाळिंब’ हे एक महत्वाचे उत्पादन आहे. महाराष्ट्रातील समशीतोष्ण हवामानात डाळिंबाच्या झाडाला वर्षातून तीन वेळा फुले येतात. मृगबहार(जून-जुलै), हस्तबहार (सप्टेंबर – ऑक्टॉबर) आणि आंबेबहार (जानेवारी – फेब्रुवारी) असे तीन प्रमुख बहार येतात. यापैकी आंबेबहारादरम्यान डाळिंब व्यवस्थापन कसे करावे हे जाणून घेणे गरजेचे आहे.

पाणी व्यवस्थापन

  • उन्हाळी हंगामात फेब्रुवारी ते मे या चार महिन्यात पिकास नियमित व एकसारखे पाणी देणे अत्यंत महत्वाचे असते.
  • यासाठी ठिबक सिंचनाद्वारे पूर्ण वाढलेल्या झाडास फेब्रुवारी महिन्यात-२३ लिटर, मार्च महिन्यात- ३४ लिटर, एप्रिल महिन्यात- ४६ लिटर तर मे महिन्यात- ५0 लिटर पाणी प्रती झाडास दररोज देणे आवश्यक असते.
  • पाणी देण्यात जर अनियमितता आली तर फुलगळतीचे प्रमाण वाढते व त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.
  • पाण्याची टंचाई असणा-या फळबागांमध्ये उन्हाळी हंगामात काळ्या रंगाच्या पॉलिथीन पेपरने किंवा उसाच्या पाचटाच्या सहाय्याने आच्छादन केल्यास झाडाजवळ ओलावा टिकून राहण्यास मदत होते.
  • सेंद्रिय खतांचा वापर जास्ती जास्त केल्यास जमिनीतील पाणी अधिक जास्त प्रमाणात टिकून राहू शकते.

आंतरपिके व मशागत

  • सुरुवातीच्या दीड दोन वर्षापर्यंत झाडांच्या दोन ओळीतील बरीच जागा मोकळी असते.
  • या काळात मधल्या मोकळ्या जागेत भुईमूग, उडीद, हरभरा हि पिके किंवा कांदा, लसूण, कोबी व इतर फार उंच न वाढणारी भाजीपाल्याची पिके घेणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरू शकते.
  • लागवडीनंतर प्रत्येक झाडाला काठीचा आधार द्यावा, यामुळे झाडाची सरळ वाढ होण्यास फायदा होऊ शकतो.
  • तणांच्या नियंत्रणासाठी ग्रामोक्झोन, फर्नोक्झोन सारख्या तणनाशकांचा वापर करावा.

महत्वाचे कीड व रोग

कीड

फळे पोखरणारी अळी, साल पोखरणारी अळी, मावा, लालकोळी, खवले कीड, काळे ढेकुण, पान खाणारी अळी
रोग

फळांवरील ठिपके, फळकुज, पानांवरील ठिपके, फळांना तडे पडणे, मर व तेल्या रोग.

शेतकरी बांधवांनी अशाप्रकारे योग्य नियोजन केल्यास चांगले दर्जेदार उत्पादन मिळविणे शक्य आहे.
या लेखाच्या पुढील भागात आपण डाळिंबावरील कीड व रोग नियंत्रणासाठी कसे नियोजन करावे याची माहिती घेऊया.

Related posts

Shares