Search

डाळिंब व्यवस्थापन भाग-2

डाळिंब व्यवस्थापन भाग-2

डाळिंब व्यवस्थापन च्या पहिल्या लेखात आपण डाळिंब पिकामध्ये आंबेबहार आल्यानंतर, पाणी व्यवस्थापनासाठी नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती घेतली. डाळिंबाच्या शेतीत व्यवस्थापनाशी निगडित इतर अनेक पैलू आहेत. दुसऱ्या भागात आपण कीड व रोग नियंत्रण यासारख्या अत्यंत आवश्यक अशा गोष्टीची माहिती घेऊया.

कीड व रोग नियंत्रण:

 • बहार धरतेवेळी पाणी दिल्यानंतर खोडास गेरु + कीटकनाशक + बुरशीनाशक पेस्टचा मुलामा द्यावा व खोडाजवळ कीटकनाशकाचे द्रावण ओतावे.
 • मावा, कोळी व खवले किडीच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही कीटकनाशकाची व निबॉळी अर्क (४ टक्के)यांची आलटुन पालटून फवारणी करावी.
 • पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी व्हर्टीसिलीयम लेकॅनी व परोपजीवी बुरशीचा वापर करावा तसेच क्रिप्टोलेमस मॉन्टोझायरी हे परभक्षी कीटक बागेत सोडावे.
 • मर रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बन्डॅझिमचे ०.१ टक्के द्रावण ५ लिटर प्रती झाडास द्यावे.
 • कार्बन्डॅझिमचे ०.१ टक्के द्रावण ५ लिटर प्रती झाडास द्यावे. १ महिन्यानंतर प्रती झाडास २५ ग्रॅम ट्रायकोडर्मा + पॅसिलोमासिर्स + ५ किलो शेणखत यांचे मिश्रण करून खोडाजवळ मिसळावे.
 • ट्रायकोडर्मा बुरशीच्या वाढीसाठी जमिनीमध्ये दर महिन्याला २ किलो चांगले कुजलेले शेणखत प्रती झाड या प्रमाणात द्यावे.

 • मर रोग झालेल्या झाडांच्या आजूबाजूला दोन ओळीतील झाडांना ट्रायकोडर्मा + पॅसिलोमासिसचे प्रमाण ५ पटीने वाढवावे. तसेच ०..१ टक्के काबॅन्डॅझिमचे द्रावण १o लिटर प्रती झाड या प्रमाणात द्यावे.
 • सुत्रकृमी असलेल्या बागांमध्ये बहार घेताना हेक्टरी २ टन निबॉळी पेंड आणि एक ते दीड महिन्यानंतर १0 किलो १0 टक्के दाणेदार फोरेट जमिनीत मिसळून द्यावे.
 • खोडास लहान छिद्रे पाडणा-या भुगेन्यांच्या व्यवस्थापनासाठी गेरू ४00 लिंडेन ग्राम + लिंडेन २0 टक्के प्रवाही २.५ ग्रॅम प्रती लिटर या प्रमाणात मिश्रण तयार करून त्यांचा खोडास मुलामा द्यावा.
 • तसेच लिंडेन / क्लोरोपायरीफॉस अ ब्लायटॉक्स वरील प्रमाणात घेऊन प्रती झाड पाच लिटर द्रावण खोडाशेजारी मुळावर ओतावे.
 • खोड़किडा नियंत्रणासाठी फेनव्हलरेट ५ मि.ली. किंवा डायक्लोराव्हॉस १0 मि.ली. या प्रमाणात इंजेक्शन अथवा पिचकारीच्या सहाय्याने छिद्रात सोडावे आणि छिद्रे चिखलाने बंद करावीत.

Related posts

Shares