Search

ड्रिप इरिगेशनचे फायदे

ड्रिप इरिगेशनचे फायदे

अनियमित मान्सून व पावसाचे घटते प्रमाण यामुळे शेतीसाठी पाण्याचा जपून वापर करणे आवश्यक बनले आहे. अशा परिस्थितीत ड्रिप इरिगेशनचा अवलंब अत्यंत महत्वाचा ठरतो.

ड्रिप इरिगेशनचे फायदे

 • उत्पादनात २० ते २००% पर्यंत वाढ होते
 • कमी अगर जास्त पाण्याचा ताण सोसावा लागत नाही
 • ड्रिपने सारख्या प्रमाणात पाणी दिले जात असल्याने पिकाची वाढ एकसारखी जोमाने आणि जलद होत राहते
 • पिके लवकर काढणीला येतात. त्यामुळे दुबार पिकाला फायद्याचे ठरते
 • ३० ते ८०% पाण्यात बचत होते
 • बचत झालेल्या पाण्याचा दुसर्या क्षेत्राला ओलीत करण्यासाठी वापर करता येतो

ड्रिप

 • क्षारयुक्त जमिनीत ठिबकने पाणी दिले तर पिकांचे उत्पादन घेता येते
 • चढ उताराच्या जमिनी सपाट न करता ठिबकने लागवडीखाली आणता येतात
 • कोरडवाहू माळरानाच्या जमिनीत ठिबक सिंचनाखाली पीके घेऊन उत्पादन काढता येते
 • जमिनीची धूप थांबते
 • पाणी साठून राहत नाही
 • ठिबकने द्रवरूप खत देता येतात. १००% खताचा वापर होतो. खताच्या खर्चात ३०-३५% बचत होते
 • पिकांना सम प्रमाणात खते देता येतात
 • पाणी देण्यासाठी रानबांधनीची गरज नसते. त्यामुळे मजुरी खर्चात बचत होते

ड्रिपद्वारे फर्टीगेशनचे फायदे

 • दररोज अगर पाहिजे त्यावेळी खत देता येतं
 • पिकाच्या मुळच्या जवळच खत आणि पाणी दिलं जातं. त्यामुळे खत आणि पाणी यांची वापरक्षमता वाढते
 • द्रवरूप खत पिकाच्या मुळाद्वारे लवकर शोषली जातात. त्यामुळे खतांचा अपव्यय टळतो
 • द्रवरूप खतातून पिकाला लागणारी सर्वच्या सर्व अन्नद्रव्य एकाच वेळी दिली जातात
 • हलक्या प्रतीच्या जमिनीत देखील पिकं घेता येतात
 • आम्लयुक्त विद्राव्य खतामुळे ठिबक संचामध्ये आपोआप रासायनिक स्वच्छता होते
 • पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार आणि गरजेनुसार आवश्यक त्या प्रमाणात खत देता येतात
 • खतांची कार्यक्षमता ८० ते ९० टक्क्यांपर्यंत वाढविता येते

 

हीरा अॅग्रो ड्रिप सिस्टीम खरेदी व अधिक माहितीसाठी खालील फॉर्म भरा

जिल्हा:

Related posts

Shares