Search

शेडनेट मधील ढोबळी मिरची उत्पादन भाग १

शेडनेट मधील ढोबळी मिरची उत्पादन भाग १

कालानुरुप शेतीमध्ये अनेक बदल, सुधारणा होत गेल्या आणि त्यातील सर्वात महत्वाचा बदल नियंत्रित वातावरणातील शेती. प्रतिकुल परिस्थितीत बिगर हंगामी काळातही पिक घेण्याच्या दृष्टीने ही पद्धती शेतक-यांसाठी नक्किच फायदेशीर ठरत आहे. परंतु यासाठी गुंतवणुक जास्त प्रमाणात लागते. त्यामुळे जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या दृष्टीने योग्य पिकांची निवड करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील शेतीचा, शेतक-याच्या आर्थिक परिस्थितीचा, बाजारपेठेचा विचार करता शेडनेट मधील ढोबळी मिरची उत्पादन हा सुयोग्य पर्याय ठरु शकतो. उत्पादनास बारमाही मागणी, योग्य किंमत, साठवणुकीस व वाहतुकीस सोयिस्कर अशा सर्वच बाबतीत ढोबळी मिरचीचे उत्पादन शेतक-यासाठी उत्तम पर्याय आहे. म्हणुनच शेडनेटसाठी ढोबळी मिरचीला प्रथम प्राधान्य दिले आहे.

ढोबळी मिरची

हवामान व जमीन:
 • ढोबळी मिरची या पिकाला दिवसाचे सरासरी २५ अंश से.पर्यंत तापमान मानवते
 • १० अंश से.हून कमी तापमान झाल्यास व धुके पडल्यास पीकवाढीवर परिणाम होतो किंवा तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाल्यास फळधारणा होत नाही व फळाची वाढ नीट होत नाहीत
 • ढोबळी मिरची ची लागवड ऑक्‍टोबर- नोव्हेंबर महिन्यात करावी. शेडनेट वापरून किंवा हरितगृहात इतर हंगामांत लागवड करता येते
 • लागवडीसाठी चांगली कसदार व सुपीक तसेच पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी
 • सामू सहा ते सात असलेली जमीन निवडावी
शेडनेटची बांधणी:
 • साधारण 50 टक्के सूर्यप्रकाश अडविणारे पक्के शेडनेट वापरावे
 • शेडनेटने अगोदर प्लॉटच्या चारही बाजू बंद कराव्या
 • सांगाड्याला थोडा उतार असणे आवश्‍यक आहे, त्यामुळे पावसाचे पाणी सरळ खाली न येता शेडनेटच्या धाग्यांवरून ओघळत खाली येते व पाण्याचा वेग कमी करता येईल. शेडनेटचे फाउंडेशन व सांगाडा उभारणी या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पाइपाचा सांगाडा भक्कम असतो
 • सांगाड्याची उंची ठरवताना कमीत कमी तीन मीटर व जास्तीत जास्त ती 5 मीटर ठेवावी
 • शेडनेटचीबांधणी करताना सांगाडा वजनाने हलका असावा. तो साधा व उपलब्ध साहित्याचा असावा. सांगाड्याचा पृष्ठभाग चोहोबाजूंनी सारखा असावा
 • आतील झाडांना जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळावा, एकमेकांवर सावली येणार नाही, असे नियोजन करावे
 • शक्‍यतोवर दक्षिणोत्तर बांधणी अधिक फायदेशीर राहते
 • शेडनेट सांगाड्याशी ताणून बसवायला हवा
 • शेडनेटचा धागा तुटू नये याची काळजी घ्यायला हवी

ढोबळी मिरची

पुर्वमशागत:
 • लाल माती (70 टक्के), शेणखत (20 टक्के) आणि भाताचे तूस (10टक्के) किंवा वाळू (10 टक्के) या प्रमाणात मिश्रण मिसळून लागवडीसाठी तयार करावे
 • दहा गुंठे शेडनेटसाठी लाल माती 90 ब्रास, शेणखत 30 ब्रास आणि भाताचे तूस 4 टन किंवा वाळू 4 ब्रास या प्रमाणात वापरावी
 • सदर संपूर्ण एकत्रित मिश्रण कल्टिव्हेटरच्या साह्याने शेडहाऊसमध्ये समपातळीत पसरून घ्यावे
 • सपाट सारे वाफे बनवून त्यामध्ये पाणी सोडावे
 • काळ्या रंगाच्या प्लॅस्टिकचा कागद त्यावर व्यवस्थित झाकावा. सात दिवसांनंतर सदर प्लॅस्टिकचा कागद काढून पुन्हा एकदा वाफ्यामध्ये पाणी सोडावे

ढोबळी मिरची

रोपे तयार करणे:
 • ३ मीटर X १मीटर X १५सेमी आकाराचे गादीवाफे तयार करावेत
 • वाफ्यावर उत्तम कुजलेले शेणखत अथवा गांडुळखत वाफ्यावर योग्य प्रकारे पसरावे
 • एप्रिल ते जुलै – ऑगस्ट महिन्यात लागवड
 • फोरेट १० ग्रॅम प्रति वाफा या प्रमाणात मिसळुन १० सेमी अंतरावर आडव्या समांतर रेघा(२ सेमी खोल) मारुन त्यात बी पेरावे
 • एका एकरासाठी साधारणपणे जाती नुसार१५० ते २००ग्रॅम बियाणे वापरावे
 • साधारणपणे ४५ ते ५५ दिवसांची रोपे पुनर्लागवडीसाठी वापरावीत.त्यावेळी रोपांना किमान ४ ते ६ पाने असणे गरजेचे आहे

ढोबळी मिरची

ढोबळी मिरची च्या रोपांची पुनर्लागवड:
 • त्यानंतर २.५ फूट उंचीचे वाफे बनवावे. व दोन वाफ्यांतील अंतर ५ फूट ठेवावे
 • प्रति एकरासाठीच्या या खतामध्ये २० ट्रक लाल माती, ५ ट्रक शेणखत, निंबोळी पेंड व १०:२६:२६ खत १०० किलो, मॅग्नेशिअम सल्फेट ६ किलो, सल्फर १० किलो या प्रमाणात एकत्रित करून द्यावे. त्यावर हलकेसे सपाट करून दोन फूट रुंदीच्या वाफ्यावर मल्चिंग पेपर, त्या खाली इनलाईन ठिबकच्या दोन नळ्या जोडाव्या
 • त्यानंतर प्रत्येक ओळीत सरळ ४५ सेमी (४५सेमी X ४५ सेमी) अंतरावर एक रोप याप्रमाणे एका वाफ्यावर दोन ओळींत रोपांची लागवड करावी. एका एकरात जवळपास ११,००० तर लागवड करता येते
 • रोपांची लागवड संध्याकाळी करावी

ढोबळी मिरची

ढोबळी मिरची च्या सुधारित जाती :
 • अर्का मोहिनी – फळे मोठी व गडद हिरव्या रंगाची,सरासरी वजन ८० ते १०० ग्रॅम, हेक्टरी २० ते २५ टन उत्पादन मिळते
 • अर्का गौरव – फळांचा रंग गडद हिरवा असून, एका फळाचे वजन ७० ते ८० ग्रॅम भरते, हेक्टरी उत्पादन १८ ते २० टन येते
 • इंद्रा झाड जोमदार, मध्यम उंचीचे डेरेदार असते. हिरव्या रंगाची दाट पाने असल्याने फळाचे उन्हापासून रक्षण होते. खरीप हंगामाच्या शेवटी किंवा फेब्रुवारी, मार्च महिन्यात रोपाची लागवड करावी. रोपांना आधार देऊन उत्तम प्रकारचे जास्तीत जास्त उत्पादन घेता येते. लागवडीनंतर ५० ते ६० दिवसातच रोपाला फळ लागते
 • कॅलिफोर्निया वंडर, यलो वंडरकेटी-१ (पुसादेवी) या हिरव्या रंगाच्या संकरित जाती असुन
 • क्यु बिको, मझुरका,डेल्फिन या लाल रंगांच्या जाती आहेत
 • इगल, ऍरेन्नी या नारिंगी रंगांच्या जाती आहेत
 • केल्व्हिन,गोल्डफ्लेम,रारानटेला,ल्यूटेस या पिवळ्या रंगांच्या जाती आहेत
 • व्हायोलेटा ही जांभळ्या रंगाची जात आहे

Related posts

Shares