Search

तणनाशकांचे प्रकार

तणनाशकांचे प्रकार

buttons eng-minतणनाशकाची निवडक (Selective)व अनिवडक या प्रकारात करता येते. तणनाशकाचे  प्रकार आहेत. तणनाशकाची फवारणी केल्यास पिकाला नुकसान होत नाही मात्र तण नियंत्रण होते. सोयाबीन, ऊस, कांदा, मका इत्यादी पिकांमध्ये निवडक तणनाशके वापरता येतात. तणनाशके त्यांच्या विशिष्ट कार्य करण्याच्या पद्धतीनुसार विविध गटांमध्ये विभागली गेली आहेत.

प्रकाश संश्लेषण क्रियेला बाधित करणारी तणनाशके (Photo synthesis inhibitors) : वनस्पतींमध्ये अन्नद्रव्ये तयार होत असताना प्रकाश संश्लेषणामध्ये बऱ्याच रासायनिक अभिक्रिया होत असतात. या गटातील तणनाशके रासायनिक अभिक्रियेमधील काही घटकांना बाधित करतात. त्यामुळे तणांची प्रकाश संश्लेषण क्रिया बाधित होऊन तणे मरू लागतात. या गटातील तणनाशके तणें व पिके उगविण्यापूर्वी (Pre emergence)तसेच तणें व पिके उगविल्यानंतर (Post emergence) किंवा दोन्ही प्रकारे फवारली जाऊ शकतात.

सक्रिय घटक

निवडक / अनिवडक

शिफारस केलेली पिके

अॅट्राझीन ५०% डब्लू. पी.

निवडक

ऊस, मका

मेट्रीबुझीन ७०% डब्लू. पी.

निवडक

ऊस, बटाटा

डायुरॉन ८०% डब्लू. पी.

निवडक

ऊस

रंगद्रव्य निर्मितीला बाधा आणणारी तणनाशके (Pigment inhibitors) : वनस्पतींमध्ये रंगद्रव्ये (Pigment) हि प्रकाश संश्लेषणक अभिक्रियेमध्ये हरितद्रव्यांचे सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्याचे महत्वाचे काम करत असतात. जर रंगद्रव्ये नाहीशी झाली, तर हरितद्रव्येसुद्धा नाहीशी होऊ लागतात आणि तणे पांढरी पडून मारून जातात. या गटातील तणनाशके पुढीलप्रमाणे:

सक्रिय घटक

निवडक / अनिवडक

शिफारस केलेली पिके

टेम्बोट्रीऑन ३४.% एस. सी.

निवडक

मका

टोप्राझॉन ३३६ एस. सी.

निवडक

मका

पेशींचे नुकसान करणारी तणनाशके (Cell Membrane disruptors) : या गटातील तणनाशके बहुदा स्पर्शजन्य तणनाशके म्हणून ओळखली जातात, तर काही तणनाशके तणे व पीक उगविण्यापूर्वी म्हणूनही वापरली जातात. तणांच्या पेशींना बाधित करण्याबरोबरच या गटातील तणनाशके काही विकारांना (Enzyme) बाधित करतात व जलद गतीने तणांचे नियंत्रण करू शकतात. या गटामध्ये येणारी काही तणनाशके पुढीलप्रमाणे :

सक्रिय घटक

निवडक / अनिवडक

शिफारस केलेली पिके

ऑक्झिफ्लोरफेन २३.% .सी.

निवडक

कांदा

ऑक्झॅडायर्जील ८०% डब्लू. पी.

निवडक

पुनर्लागवडीचा भात

वनस्पती वाढ नियंत्रक तणनाशके (Plant Growth Regulator Herbicides) : या गटांमध्ये २, डी हे तणनाशक आपल्याला पाहायला मिळते. या गटातील तणनाशके मुख्यतः Post Emergence म्हणजे तणे उगविल्यानंतर म्हणजे रुंद पानांच्या तणांच्या नियंत्रणासाठी एक दलवर्गीय पिकांमध्ये वापरली जातात. परंतु चुकीच्या वेळेस किंवा अयोग्य प्रमाणात वापरले गेल्यास एकदलवर्गीय पिकांनासुद्धा हानी पोहोचवू शकतात. तणांच्या विविध भागांमध्ये संप्रेरके, प्रथिने आदी बाधित करून हि तणनाशके तणांच्या पेशी कमकुवत करतात, यामुळे अगदी कमी कालावधीमध्येच फवारणीनंतर तणे मरून जातात.

मेद तयार होण्याच्या प्रक्रियेला बाधित करणारी तणनाशके (Lipid Biosynthesis inhibitors) : द्विदल पिकांमध्ये गवतवर्गीय तणांचे नियंत्रण करण्यासाठी वापरली जाणारी तणनाशके मुख्यतः या गटामध्ये मोडतात. उत्तम पर्णजन्य क्रियेमध्ये गवतवर्गीय तणे लालजांभळ्या रंगाची होऊन मरु लागतात.

सक्रिय घटक

निवडक / अनिवडक

शिफारस केलेली पिके

प्रोपाक्विझाफॉप १०% . सी.

निवडक

सोयाबीन, उडीद
क्विझालोफॉप इथाईल ५% ईसी

निवडक

सोयाबीन, उडीद भुईमूग

अमिनो आम्ल तयार होण्याच्या प्रक्रियेला बाधित करणारी तणनाशके ( Amino Acid Synthesis inhibitors) : या गटातील तणनाशके अतिशय तीव्रतेने वाढ थांबवतात व एकदल आणि द्विदल अशा दोन्ही प्रकारच्या तणांना नियंत्रित करतात. या तणनाशकाच्या गटाचे अजून दोन उपगट आहेत. त्यातील उपगट मध्ये मोडणारी तणनाशके सुगंधित अमिनो आम्लाच्या ( Aromatic Amino Acids) तयार होण्याच्या प्रक्रियेला अडथळा आणतात. उदा. ग्लायफोसेट हे अनिवडक तण नाशक या गटात पाहायला मिळते. या उपगटातील तणनाशके मुख्यतः फक्त पर्णजन्य आणि जमिनीवरील अशा दोन्ही क्रिया दाखवतात. उपगट बी मध्ये खालीलप्रमाणे काही निवडक तणनाशके बाजारामध्ये उपलब्ध आहेत.

संदर्भ – अग्रोवन

सक्रिय घटक

निवडक / अनिवडक

शिफारस केलेली पिके

इमाझीथापर १०% एसएल

निवडक

सोयाबीन, भूईमूग
क्लोरीम्युरॉन इथाईल २५% डब्लू. पी.

निवडक

सोयाबीन, भात
मेटसल्फ्युरॉन मिथाईल २०% डब्लूपी

निवडक

गहू, भात

Related posts

Shares