Search

तरुणांमध्ये शेतीबद्दल ‘स्वारस्य’ निर्माण करणे

तरुणांमध्ये शेतीबद्दल ‘स्वारस्य’ निर्माण करणे

शेतीला प्रतिष्ठेचा प्रश्‍न भेडसावतो आहे. साध्या शब्दांत सांगायचे झाले तर, जगभरातील बहुसंख्य तरुणांसाठी शेतीमध्ये काही ‘खास’ किंवा आकर्षक असे काही दिसत नाही. बहुतेक जण असा विचार करतात की, शेती म्हणजे केवळ पाठीचा कणा मोडणारी मजूरी, तीसुध्दा फारसा आर्थिक फायदा न देणारी – आणि आपल्या करीअरच्या प्रगतीसाठीची अगदी छोटीशी संधी.

शेतकर्‍यांची पिढी जुनी होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर कृषी क्षेत्राकडे नव्या तरुणांनी आकर्षिले जाण्याची गरज आहे. जागतिक स्तरावर हे आव्हान निर्माण झाले आहे. संयुक्त राष्ट्रातले जवळजवळ निम्मे शेतकरी ५५ वर्षे वा त्याहून अधिक वृध्द आहेत, तर उपसहारा आफ्रिकेमध्ये शेतकर्‍यांचे सरासरी वय ६० वर्षे आहे.

पर्यावरण व विकासासाठी काम करणार्‍या आंतरराष्ट्रीय संस्थेचा (IIED) अलीकडील अहवाल असे सांगतो की, ‘‘ग्रामीण भागातील तरुणांचे दूर जाणे म्हणजे उद्याच्या काही लघु शेतकर्‍यांची दूर जाणे आहे, ज्यामुळे शेतीचे भविष्य वेगाने बदलण्याची संभाव्य शक्यता आहे.’’

यू. एन. आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने असे भाकित वर्तवले आहे की, या वर्षी ७४.२ दशलक्ष तरुणवर्ग बेरोजगार राहणार आहे, या संख्येमध्ये २००७ पासून ३.८ दशलक्षांची वाढ झालेली आहे. बेरोजगार तरुण म्हणजे धोकाही आहे आणि संधीही आहे. वास्तविक कृषी क्षेत्रामध्ये रोजगाराच्या प्रचंड शक्यता दडलेल्या आहेत. हे लक्षात घेतल्यास तरुणांमध्ये शेतीबाबतची प्रतिमा मुळापासून बदलली जाऊ शकते.

आणि तरुण वर्गामध्ये असलेल्या शेतीबद्दलच्या भावनेमध्ये बदल होत आहे. ब्रुकलिन, न्यूयॉर्कपासून नैरोबी, केनयापर्यंतचा तरुण वर्ग आज शेती व अन्नधान्य यंत्रणेकडे करीअर म्हणून वळतो आहे.

‘‘शिक्षणाच्या वाढत्या संधी आणि शेतीवर आधारी उद्योगधंद्याचे नवे स्रोत यामुळे पारिवारीक शेती, उत्पन्नातील वाढ आणि शेतरकी व स्थानिक जनता या दोघांच्याही भल्याकरीता एकूणच शेतीच्या क्षेत्रात अभिनवता आणण्यासाठी तरुण मुले हा महत्वाचा बदलप्रवाह ठरतील. नवे तंत्रज्ञान आणि नवी विचारप्रणाली यांचा वापर करुन तरुण मुले कृषी क्षेत्र पार बदलून टाकतील,’’ असा विश्‍वास ग्लोबल फोरम फॉर ऍग्रीकल्चरल रिसर्च (GFAR) चे कार्यकारी सचिव माकर् होल्डरनेस यांनी व्यक्त केला.

कृषीक्षेत्र म्हणजे उदरनिर्वाहासाठी शेती करण्यापेक्षाही अधिक काही आहे – आजघडीस, परमाकल्चर आरेखन, जैविक शेती, दळणवळण तंत्रज्ञान, वेधमापन, वाहतूक, दर्जा नियंत्रण, नागरी कृषी प्रकल्प, खाद्यान्न संस्कृती, पर्यावरण विज्ञान, प्रागतिक तंत्रज्ञान यासह अनेक क्षेत्रांमध्ये करीअरच्या संधी तरुणांकरीता उपलब्ध आहेत.

 

शेतकरी, उद्योजक, धोरणात्मक निर्णय घेणारी मंडळी आणि प्रशिक्षक यांनी कृषी क्षेत्र अत्यंत हुशारी आवश्यक असलेला आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर असलेला करीअरचा पर्याय असल्याबाबत तसेच जगभरातील तरुण वर्गासाठी कृषी व अन्नधान्य यंत्रणेमध्ये नोकरीच्या उत्तम संधी निर्मार होत असल्याबाबत प्रसार करण्याची गरज निर्माण झाली आहे. तरुण शेतकर्‍यांमध्ये हे स्वारस्य आता नव्याने वाढीस लागलेले दिसून येत आहे आणि त्यामुळे यामध्ये उल्लेखनीय वृध्दी होण्यासाठी हे स्वारस्य महत्वाचे ठरणार आहे.

जीएफएआरच्या सहकार्याने, फूड टँक्सने कृषी व कृषी क्षेत्राशी संबंधित कामे अधिक आवाहनात्मक व्हावीत आणि कृषी क्षेत्र हे केवल स्वारस्य निर्माण करण्यापुरतेच नव्हे, तर करीअर म्हणून महत्वाचे क्षेत्र असल्याचा दृष्टीकोण लोकांमध्ये निर्माण व्हावा, यासाठी तरुणांसोबत काम करणार्‍या जगभरातील संस्थांची यादी तयार केली.

 

संयुक्त राष्ट्रांमध्ये, नव्या शेतकर्‍यांना सहकार्य करुन स्थानीय अन्नधान्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी न्यू एण्ट्री सस्टेनेबल फार्मिंग प्रोजेक्ट काम करतो. छोट्या प्रमाणात शेतीकामे करण्याकरीता मार्गदर्शन मिळण्यासाठी पशुपालन व आरोग्यदायी अन्नधान्याच्या क्षेत्रात व्यवसायाच्या नियोजनापासून विशिष्ट प्रगत कार्यशाळांपर्यंत आयोजित केले जाणारे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम सहाय्यक ठरतात. आणि दक्षिणपूर्व न्यू इंग्लंडमध्ये, यंग फार्म नेटवर्कद्वारे ‘यंग फार्मर नाईट’चे आयोजन केले जाते, ज्यामध्ये सर्व वयोगटातील आणि अनुभव स्तरांतील शेतकर्‍यांना एकत्र आणण्याच्या व संयुक्तपणे काहीतरी करु पाहण्याच्या प्रयत्नांना हात देण्यासाठी सामाजिक व शैक्षणिक उपक्रम मालिकांचे नि:शुल्क आयोजन नियमितपणे केले जाते.

संयुक्त राष्ट्राचे कृषी उपसचिव क्रिस्टा हार्डन यांनी नुकतीच नव्या, होतकरु शेतकरी व पशुपालकांच्या आर्थिक सुरक्षेमध्ये सुधारणा होण्याच्या दृष्टीने साधनस्रोत व धोरणांची घोषणा केली. यामध्ये एका नव्या वेबसाईटची घोषणा करण्यात आली आहे, ज्यावर शेतकरी व पशुपालकांच्या यशस्वी वाटचालीसाठी संयुक्त राष्ट्रांच्या कृषी खात्यातर्फे (USDA) सुरु करण्यात आलेल्या अनेकविध उपक्रमांचा लाभ त्यांना घरबसल्या घेता येऊ शकेल.

गेल्या वर्षी, आफ्रिकेमध्ये जोसेफ मॅकॅरीआ यांनी एक फेसबुक पेज सुरु केले, ‘Mkulima Young’ या नावाने.. ज्याचा उद्देश होता, तरुणांना कृषीक्षेत्रामध्ये गुंतवून घेण्यासाठी उद्युक्त करणे. या पेजमुळे तरुणांसाठी एक सामाजिक व्यासपीठ तयार झाले, ज्यायोगे प्रश्‍न विचारता आणि कृषीजाल निर्माण करता येऊ शकत होते. आपल्या भागातील तरुणांचे सबलीकरण करण्यासाठी मॅकॅरीआ शेतकर्‍यांची छायाचित्रे व स्फूर्तीदायक कथा प्रसिध्द करतात.

केनिया, युगांडा, अँटिगा व बबुर्डामध्ये, ज्युनिअर फार्मर फिल्ड ऍण्ड लाईफ स्कूल्स (JFFLS)मुळे अन्नधान्याच्या दीर्घकालीन बाजारपेठेची शाश्‍वती निर्माण झाली आणि तरुणांनाही त्यांचे स्वत:चे दीर्घकालीन अन्नधान्य यंत्रणा सुरु करण्यासाठी साधनसामग्रीदेखील पुरवली जाते. JFFLS विखुरलेल्या तरुण वर्गाचे सबलीकरण करुन दीर्घकालीन अन्नधान्य सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांसाठी त्यांना साधने उपलब्ध करुन देणे हे चे उद्दीष्ट आहे.

फार्म आफ्रिकाने इथिओपिआ, केनिया, दक्षिण सुदान, टांझानिआ व युगांडामधल्या ग्रामीण भागातील तरुणांसाठी पालेभाज्या, अळंबी व पॅशनफ्रुट वाढवण्याकरीता अनेक कृषीविषयक प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात सुरुवात केली. बाजारपेठेमध्ये सर्वोत्तम किंमत कशी मिळवावी हे शिकवून स्थानीय प्रशासनाशी जुळवून घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले.

युरोपिअन कौन्सील फॉर यंग फार्मर्स (CEJA) हा ‘‘युरोपमधल्या नव्या पिढीचा आवाज’’ आहे. CEJA

माहिती व शिक्षणाचे आदानप्रदान करण्यासाठी व्यासपीठ निर्माण करुन कृषी क्षेत्रातील पिढीच्या नूतनीकरणाला सहकार्य करणे हे चे मुख्य उद्दीष्ट आहे. इंटरनॅशनल मूव्हमेंट ऑफ कॅथलीक ऍग्रीकल्चर ऍण्ड रुरल युथ (MIJARC) यांच्याकडे आजघडीस ग्रामीण भागातील २ दशलक्ष तरुण सभासद आहेत, जे ग्रामीण भाग तरुणांसाठी आकर्षक व लाभदायक होण्याच्या दृष्टीने जगभरातील कृषी क्षेत्राचा व ग्रामीण भागांचा दीर्घकालीन विकास होण्यासाठी काम करतात आणि त्याचा प्रसार करतात.

कॅरीबिअन फार्मर्स नेटवर्क (CaFAN ) यांनी प्रशिक्षण, क्षमता संवर्धन आणि ३५ वर्षे वयोगटाखालील नव्या कृषी-नेतृत्वाची उभारणी करण्यासाठी त्रिनिदाद, टोबागो, गयाना, ऍण्टीगा, ग्रॅनाडा, सेंट लुसिआ, बार्बाडोस आणि सेंट व्हिन्सेन्ट या ठिकाणी अनेकविध उपक्रम सुरु केले आहेत. सहभागींपैकी पंधरा जणांनी टोबागोचा येमेक नकाशा व कृषीमूलकांचा शोध यासह कृषी क्षेत्राबाबतच्या त्यांच्या संकल्पना व दृष्टीकोण इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वत:चे ब्लॉग सुरु केले आहेत.

दक्षिण अमेरीकेमधील इंटरनॅशनल फण्ड फॉर ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट (IFAD) रुरल युथ टॅलेण्ट्‌स यांनी ग्रामीण युवा कृषी कार्यक्रमांमध्ये शिकवण्यात आलेल्या धड्यांमधील ज्ञान प्रसिध्द व आदानप्रदान करण्यासाठी काम सुरु केले आहे. अन्नधान्य व कृषीक्षेत्रात काम करीत असलेल्या तरुणांचे जाळे अधिक प्रबळ व स्थिरस्थावर करण्यासाठी तसेच या क्षेत्रात अधिक तरुणांना सामावून घेण्यासाठी काम करणे हे या संस्थेचे उद्दीष्ट आहे.

साऊथ आशिया युथ कॅम्प ऑन ऍग्रीकल्चर ऍण्ड वॉटर यांच्याद्वारे, वातावरणातील बदल आणि शेती व पाण्याबाबतची जबाबदारी याबद्दलची जबाबदारी शासकिय नेत्यांनी घ्यावी, यासाठी १८ ते ३६ वयोगटातील तरुणांना चालना देण्यात येते. या कॅम्पमध्ये तरुणांना त्यांची मते, संकल्पना मांडून त्या अंमलात आणण्यासाठी आणि दशिक्षर आशियातील लघुउत्पादकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी तरुणांना एकत्र आणले जाते.

आणि शिक्षणामध्येही होत आहे बदल :

ग्लोबल कॉन्फेडरेशन ऑफ हायर एज्युकेशन असोसिएट्‌स ऍण्ड लाईफ सायन्सेस् (GCHERA

) यांच्याद्वारे ६०० हून अधिक कृषी विद्यापीठांना एकत्र आणले गेले आहे व त्यामध्ये दर वर्षी १ दश लक्षाहून अधिक विद्यार्थी सहभागी होत असतात. जगभरातील विद्यापीठीय अभ्यासक्रम बदलून तरुणांना देण्यात येणारे कृषी-आधारीत शिक्षण GCHERA अधिक आकर्षक व्हावे तसेच आजच्या काळात त्यांना गरजेची असलेली कौशल्ये व संधी यांच्याशी जवळीक साधणारा विद्यापीठीय अभ्यासक्रम जगभरातून बदलण्यासाठी काम करीत आहे.

कोस्टा रिकामधील अर्थ युनिव्हर्सिटीमध्ये क्षेत्राच्या दीर्घकालीन विकासामध्ये सहभागी होण्यासाठी भविष्यात नैतिक मूल्यांचे आचरण करणारे नेतृत्व घडवण्याचे काम केले जाते. त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये कार्यावर आधारीत सत्रे आहेतच, शिवाय तेथील विद्यार्थी वर्गामध्येच त्यांचा स्वत:चा कृषीव्यवसाय विकसित करतात व तो चालवतात.

नेदरलॅण्डस्‌मधील वेनिंजन युनिव्हर्सिटीमध्ये गेल्या दशकभरात आजच्या तरुण वर्गाच्या गरजा व प्राधान्यक्रमांची पूर्तता करु शकतील, अशा अभ्यासक्रमाची संपूर्णपणे पुनर्रचना करण्यात आली आहे. आता वेनिंजनने ‘आरोग्यदायी अन्न व सजीव पर्यावरण’ या संकल्पनेवर लक्ष केंन्द्रित केले आहे आणि शासन व उद्योजक या दोघांच्याही सहकार्याने एकत्रपणे ते काम करत आहेत.

तसेच, यंग प्रोफेशनल्स फॉर ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट (YPARD) ही जवळजवळ ८,००० तरुण व्यावसायिकांनी चालवलेली आंतरराष्ट्रीय स्तरावरील चळवळ असून ऑनलाईन व भूमीय अशा दोन्ही प्रकारचे जाळे व्यापले गेले आहे, ज्यायोगे तरुणांना विविध प्रकारच्या कृषीविषयक करीअरकडे वळण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण कृषी विकासासाठी सक्रिय सहभाग घेण्यासाठी उद्युक्त केले जाते.

Source- http://foodtank.com/news/2014/07/making-agriculture-cool-for-youth

Related posts

Shares