Search

तुती लागवड

तुती लागवड

buttons eng-minरेशीम शेती मध्ये तुती लागवड हा एक महत्वाचा पैलू आहे.

 • रेशीम अळीचे मुख्य खाद्य हे तुती झाडाचा पाला हे होय.growing-mulberries
 • तुती पाला निर्मितीकरिता ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय आहे, असे शेतकरी तुती झाडाची लागवड करु शकतात.
 • तुती लागवडीकरिता जमिनीची निवड करणे हे अत्यंत महत्वाचे आहे.
 • शेताची निवड करताना प्रामुख्याने पाण्याचा निचरा होणारी, सकस काळी कसदार जमिनीची निवड करावी.
 • तुती झाडांची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी जमिनीस शेणखत व रासायनिक खतांचा वापर करणे हे अत्यंत आवश्यक आहे.
 • त्याचबरोबर हिरवळीची खते, गांडूळ खत, इतर मायक्रोन्यटिंयटस तुती झाडांना दिल्यास तुती पानांची प्रत चांगली राहून सकस पाला निर्मिती करता येते.
 • तुती झाडांची लागवड एकदा केल्यानंतर जवळ जवळ 15 ते 20 वर्षे नविन तुती झाडांची लागवड करण्याची आवश्यकता भासत नाही.
 • कमीतकमी खर्चात अधिक पाला निर्मितीकरिता तुती झाडांची लागवड ही सुधारीत पट्टापध्दतीने करणे आवश्यक आहे.

 • सध्या महाराष्ट्रात 5 बाय 3 बाय 2 या पट्टा पध्दतीचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला दिसून येत आहे.
 • तुती झाडांची लागवड ही प्रामुख्याने जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीमध्ये केली जाते.
 • तुती लागवड ही तुतीच्या कलमापासून तसेच तुती रोपाव्दारे सुध्दा करता येते.
 • तुतीची लागवड तुती कलमापासून करते वेळी तुती झाड हे कमीत कमी 5 मे 6 महिने वयाचे आसणे आवश्यक आहे.
 • तुती कलम हे पेन्सिल आकाराचे असावे. तुती कलमाची लांबी 6 ते 7 इंच इतकी व एका कलमावर कमीत कमी 3 ते 4 डोळे असणे आवश्यक आहे. तुती कलमाची लागवड करतेवेळी कलम हे 4 इंच जमिनित व 2 इंच जमिनिवर असावे. तुती कलमापासून तुती लागवड केल्यास कमीत कमी 5 ते 6 महिण्यात तुतीचे चांगले झाड तयार होते. म्हणजेच तुतीची बाग रेशीम अळी संगोपनास येते.
 • तुती लागवड केल्यानंतर प्रथम वर्षी शेतकऱ्यास एकदोन पिके घेता येतात. दुसऱ्या वर्षीपासून शेतकऱ्यास वर्षातून 4 ते 5 पिके घेता येतात.
 • तुती लागवडीकरिता सध्या तुती झाडाच्या वेगवेगळ्या जाती उपलब्ध आहेत. जमिनीची प्रत पाहूनच तुती झाडाच्या जातीची निवड करावी. ज्या शेतकऱ्यांकडे काळी कसदार जमीन आहे, तुती बागेकरिता भरपूर पाण्याची सोय आहे अशा शेतकरी बांधवानी व्ही-1 , एस-36 अशा सुधारीत तुती झाडांच्या जातीची निवड करावी. हलकी व कमी पाण्याची सोय असलेल्या शेतकयांनी एम-5 या तुती जातीची निवड करावी.
 • V1 आणि S36 या सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या जाती आहेत. रेशीम अळीच्या संगोपनासाठी या दोन जातींच्या लागवडीची शिफारस केली जाते. या दोन्ही जातींची पाने पौष्टिक असल्याने रेशीम अळीच्या वाढीस मदत करते.
 • यांची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत.

mulberry-leaf

S-36

 • या जातीच्या रोपांची पाने हृदयाच्या आकाराची काहीशी जाड आणि चमकदार असतात.
 • या पानांमध्ये अधिक ओलावा असतो आणि पौष्टिक गुणधर्मांनी युक्त असतात.
 • एक एकरामध्ये वर्षाला १५,००० ते १८,००० तुती पानांचे उत्पादन होऊ शकते.

V-1

 • या जातीचा शोध १९९७ दरम्यान झाला असून शेतीसाठी प्रसिद्ध अशी ही जात आहे.
 • पाने लंब गोल आणि पसरट असून गर्द हिरव्या रंगाची असतात.
 • एक एकरामध्ये वर्षाला २०,००० ते २४,००० तुती पानांचे उत्पादन होऊ शकते.

M -5

 • हलकी व कमी पाण्याची सोय असलेल्या शेतकयांनी एम-5 या तुती जातीची निवड करावी.

 

Related posts

Shares