Search

दुधी भोपळा, काकडीची लागवड

दुधी भोपळा, काकडीची लागवड

का, कुठे, कशी कराल?

download

सध्या आपण पाहायला गेलो तर बहुतांश लोक आपल्या आरोग्याबाबत जागरूक झाल्याचं चित्र आपल्याला पहायला मिळतं. यामुळेच, आहाराची पद्धत बदलत चालली आहे. सकस आणि शरीराला पोषक असा आहार करणे हि आता गरज होत चालली आहे. म्हणूनच, काकडीचे ग्रीन सॅलेड नेहमीच्या जेवणाचा अविभाज्य भाग होत चालले आहे. दुधी भोपळा, तसं पहायला गेलं तर दुधीला स्वतःची अशी चव नाही. पण, असे असले तरी दुधी आहे गुणकारी. एकूणच, काय कि या दोन्ही उत्पादनांना चांगली मागणी असते हि शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे. म्हणूनच आपण दुधी भोपळा, काकडी लागवड कशी करावी याबाबत जाणून घेणे गरजेचे आहे.

काकडी लागवड जून-जुलै आणि जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत करावी. जमिनीची योग्य मशागत करून शेणखत मिसळून द्यावे. लागवडीपूर्वी माती परीक्षणानुसार 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे. अर्धे नत्र (50 किलो) लागवडीनंतर दोन समान हप्त्यांमध्ये विभागून द्यावे. लागवडीसाठी हिमांगी, फुले शुभांगी या जातींची निवड करावी. एक हेक्टोर लागवडीसाठी दीड किलो बियाणे लागते. लागवडीपूर्वी शिफारशीत बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. लागवड 1 मीटर x 0.5 मीटर अंतराने करावी.

दुधी भोपळ्याच्या लागवडीसाठी मध्यम काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीची योग्य मशागत करून शेणखत मिसळून द्यावे. लागवड जून-जुलै आणि जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत करावी. मंडप पद्धतीने 3 मीटर x 1 मीटर अंतराने लागवड करावी. लागवडीपूर्वी माती परीक्षणानुसार 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे. लागवडीनंतर एक महिन्याने 50 किलो नत्र द्यावे. प्रति हेक्ट री 2.5 किलो बियाणे लागते. लागवडीसाठी सम्राट ही जात निवडावी.

Related posts

Shares