Search

देस्ता कृषी परिवार च्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात

देस्ता कृषी परिवार च्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात
[Total: 1    Average: 1/5]

देस्ताग्लोबल ने “देस्ता कृषी परिवार” या ऑनलाईन फोटो कॉन्टेस्ट च्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन केले आहे. “देस्ता कृषी परिवार” ही संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांसाठीची ऑनलाईन फोटोग्राफी स्पर्धा असून www.destatalk.com  (देस्ता टॉक) या कृषीविषयक वेबसाईटवर आयोजित करण्यात येईल. शेतकऱ्यांची आधुनिक तंत्रज्ञानाशी ओळख व्हावी, हा या स्पर्धेमागचा मुख्य हेतू आहे. १ ऑक्टोबर २०१६ पासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे.
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांना देस्ताटॉक च्या वेशीबाईट वर शेती विषयक फोटो अपलोड करावे लागतील. हे फोटो पीसी अथवा मोबाईल फोन द्वारे देखील अपलोड करता येतील. दि. ३० ऑक्टोबर २०१६ हा फोटो अपलोड करण्याचा शेवटचा दिवस असेल, तर दि. १३ नोव्हेंबर २०१६ पर्यंत या फोटोंना मते देता येऊ शकतील. सर्वाधिक मते प्राप्त करणारे फोटो त्या त्या कॅटेगरीतील विजेते असतील. दि. १८ नोव्हेंबर २०१६ रोजी स्पर्धेचे विजेते जाहीर करण्यात येतील आणि रु. ११ लाखांची पारितोषिके देण्यात येतील.
“ग्रामीण भारतातील इंटरनेटचा प्रसार आणि वापर प्रचंड वेगाने वाढत आहे. या सुवर्णसंधीचा फायदा घेण्यासाठी देस्ताग्लोबल डिजिटल माध्यमांद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे. “देस्ता कृषी परिवार” च्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. गेल्यावर्षी महाराष्ट्रात आयोजित केलेल्या स्पर्धेला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून आम्ही एक पाऊल पुढे टाकत संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांना या स्पर्धेत सामावून घेण्याचे ठरवले आहे. भारतीय कृषी क्षेत्र क्रांतीच्या उंबरठ्यावर आहे. म्हणूनच नवनवीन माध्यमांद्वारे शेतकऱ्यांना डिजिटल जगाची ओळख करून देऊन कृषी क्षेत्राच्या विकासास हातभार लावावा, अशी आमची योजना आहे”, असे देस्ताग्लोबल चे सीइओ श्री. मोहनीश शर्मा म्हणाले.

फोटो अपलोडिंगसाठी कॅटेगरी आणि बक्षिसे

बेस्ट फार्मिंग फॅमिली: रु. 1,00,000 (1st), रु. 50,000 (2nd), रु. 25,000 (3rd)
वुमन इन फार्मिंग: रु. 1,00,000 (1st), रु. 50,000 (2nd), रु. 25,000 (3rd)
टेक्नॉलॉजि इन फार्मिंग: रु. 1,00,000
हेल्थीएस्ट क्रॉप: रु. 1,00,000
नेक्स्ट जनरेशन इन फार्मिंग: रु. 50,000
अर्बन फार्मिंग: रु. 50,000
बेस्ट लुकिंग फार्मर – मेल: रु. 50,000
बेस्ट लुकिंग फार्मर – फिमेल: रु. 50,000
माय फार्मिंग फ्रेंड (पाळीव प्राणी): रु. 25,000
विअर्डेस्ट (आगळे-वेगळे) क्रॉप: रु. 25,000
बेस्ट फोटो (राज्य): रु. 10,000 (30 बक्षिसे) (प्रत्येक राज्यात एक विजेता)

शेतकऱ्यांना नफा व्हावा या उद्देशाने २०१० साली देस्ता ग्लोबल ची स्थापना करण्यात आली. नवीन तंत्रज्ञान, नवीन शोध यांच्याबाबत इत्यंभूत माहिती देऊन शेतकऱ्यांच शेति उत्पन्नत कशी वाढ करता येईल यासाठी देस्ता ग्लोबल श्री. मोहनीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. शेतकऱ्यांना कृषी विषयक योग्य माहिती आणि कृषी उत्पादने पुरवून त्यांच्या शेतीची उत्पादकता आणि नफा यांच्यात वाढ करणे हे देस्ता ग्लोबल चे मुख्य ध्येय आहे. २०१५ साली देस्ता मार्ट आणि देस्ता टॉक ची सुरुवात करणाऱ्या देस्ता ग्लोबल ला भविष्यात कृषी सारथी म्हणून भूमिका बजावायची आहे.

फोटो अपलोड करण्यासाठी क्लिक करा : 

foto-marathi

Related posts

Shares