Search

देस्ता टॉक ला पुरस्कार

देस्ता टॉक ला पुरस्कार
[Total: 0    Average: 0/5]

button 001

नुकत्याच दिल्ली येथे “डिजीटल एम्पावरमेंट फाउंडेशन इन सोशल मिडिया” आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात देस्ता टॉक ला “सोशल मिडिया एम्पावरमेंट – स्पेशल मेन्शन” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Award

भारतीय शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत प्रगतशील शेतकरी होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना इंटरनेट च्या माध्यमातून कृषी विषयक माहिती उपलब्ध झाल्यास हे शक्य आहे. हे लक्षात घेऊन ‘देस्ता ग्लोबल’ ने ‘देस्ता टॉक’ या वेब साईटला सुरुवात केली. ‘देस्ता टॉक’ च्या माध्यमातून हवामान, पिक लागवड, पिक व्यवस्थापन, कृषी उत्पादनाची माहिती, कृषी मधील चालू घडामोडी, प्रगतशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा, कृषी पूरक व्यवसाय अशा विविध पैलूंवर अभ्यासपूर्ण माहिती उपलब्ध करून देतो.

शेतकऱ्यांना केवळ माहिती उपलब्ध करून न देता त्यांना मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेरणा देणे गरजेचे आहे. महत्वाचे म्हणजे आज शेतकरी प्रगल्भ झाला आहे. स्मार्ट फोन असलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे आणि सोशल मिडिया चा वापर करतात. देस्ता केलेल्या संशोधनात यावर शिक्कामोर्तब झाले. सद्य स्थितीला देस्ता टॉक चे फेसबुक पेज असून इथे दर दिवशी शेतीविषयक माहिती बरोबरच विचारधारा या सदराच्या माध्यमातून जगभरातील मान्यवरांचे शेती संदर्भातील प्रेरणादायी विचार, तसेच भोलानाथ या सदरच्या माध्यमातून शेती च्या एखाद्या पैलू बाबत रंजक माहिती सादर केली जाते. याबरोबरच दर आठवड्याला विकली टीप‘ च्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी विषयक सल्ला दिला जातो.

देस्ता टॉक च्या प्रयत्नांना शेतकऱ्यांचा नेहमीच उदंड प्रतिसाद लाभला आहे. आम्हाला व्हॉट्स अप वर दररोज ग्रुप मध्ये नोंदणी साठी शेतकरी संपर्क करत असतात. देस्ता टॉक च्या फेसबुक पेज ला मिळालेले १५००+  लाईक्स या उदंड प्रतिसादाचे बोलके उदाहरण आहे. देस्ता टॉक च्या वेब साईट वरील लेख साधारण ३००० पेक्षा अधिक वाचकांपर्यंत पोहोचतात आणि साधारणपणे प्रत्येक लेखाला ५० हून अधिक लाईक मिळू लागल्या आहेत.

ट्विटर च्या माध्यमातून देखील देस्ता माहितीची देवाण घेवाण करते. याशिवाय यु ट्यूब वर देस्ता टॉक चे स्वतःचे चॅनल आहे. या माध्यमाचा वापर करत लवकरच इथे कृषी विषयक अनेक व्हिडीओ उपलोड केले जाणार आहेत.  आपणही www.destatalk.com या वेबसाईट ला भेट देऊन कृषी विषयक माहिती जाणून घ्या. ७७७५००८८११ हा  देस्ता टॉक चा व्हॉट्स अप नंबर असून या माध्यमातून हजाराच्या वर शेतकरी देस्ता टॉक बरोबर संपर्क साधतात. अपडेट व्हा, प्रगतीशील शेतकरी बना. चला देस्ता टॉक च्या संगे, चला कृषी युगाच्या संगे…

 

Related posts

Shares