Search

देस्ता-सिद्धी – कृषी उत्पादनांवरील डिस्काउंट आता थेट शेतकऱ्यांना

देस्ता-सिद्धी – कृषी उत्पादनांवरील डिस्काउंट आता थेट शेतकऱ्यांना
[Total: 49    Average: 2.7/5]

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर!!! देस्ताग्लोबल ‘देस्ता-सिद्धी’ हा महत्वाकांक्षी प्रकल्प घेऊन आली आहे. याअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नामवंत कंपन्यांची कृषी उत्पादने डिस्काउंट रेट मध्ये उपलब्ध होणार आहेत.

‘देस्ताग्लोबल’  मागील सहा वर्षांपासून शेतकऱ्यांना योग्य माहिती देऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी कार्यरत आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना योग्य वेळी, योग्य उत्पादन योग्य दरात उपलब्ध व्हावे यासाठी देस्ता नेहमीच प्रयत्नशील राहिली आहे. ‘देस्ता-सिद्धी’ या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना वेगवेगळ्या श्रेणीतील कृषी उत्पादने देस्ता अधिकृत कृषी सेवा केंद्रांमध्ये खरेदी करता येणार आहेत. यासाठी देस्ताग्लोबल तर्फे ‘देस्ता-सिद्धी’ अॅप ची निर्मिती केली आहे.

देस्ता-सिद्धी अॅप तुमच्या अँड्रॉइड फोनमध्ये इंस्टॉल करण्यासाठी क्लिक करा.

कंपनीच्या ‘देस्तामार्ट’  B2B ई-कॉमर्स मार्केट प्लेस वर विविध श्रेणीतील दर्जेदार कृषी उत्पादने विकली जातात. भारतभरातील ११६ हुन अधिक कृषी उत्पादक कंपन्या काम करत आहेत. या कंपन्यांची विविध कॅटेगरी मधील साधारण १३०० हुन अधिक कृषी उत्पादने शेतकऱ्यांच्या गरजांची पूर्तता करतात. महाराष्ट्रातील ६,५०० हुन अधिक कृषी सेवा केंद्र धारक देस्तामार्ट वरून विविध कृषी उत्पादने खरेदी करतात, यासाठी वेळोवेळी देस्ताग्लोबल कडून विविध योजना राबविल्या जातात.

सध्या सातारा जिल्ह्यात देस्ता-सिद्धी चा पायलट प्रोजेक्ट सुरु असून याला कृषी सेवा केंद्र धारकांबरोबरच शेतकरी बांधवांचा देखील उदंड प्रतिसाद मिळतो आहे. शेतकऱ्यांपर्यंत कृषी उत्पादने आणि कृषी सेवा केंद्र धारकांची माहिती प्रभावीपणे पोहोचावी यासाठी देस्ता तर्फे विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना कृषी उत्पादने डिस्काउंट दरात मिळून त्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी या योजनेचे ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रोमोशन करण्यात येतंय. या योजनेचा प्रसार करण्यासाठी  देस्ता ग्राम स्तरीय सभा, लीफ-लेट, तसेच कृषी सेवा केंद्र धारकांच्या नावाचा स्टँम्प असलेल्या निमंत्रण पत्रिकांचे गावपातळीवर वितरण केले जात आहे. याशिवाय गावागावात मोक्याच्या ठिकाणी देस्ता सिद्धी चे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. याच्या माध्यमातून ‘क्यू आर’ कोड स्कॅन करून शेतकरी बांधव उत्पादनांवर डिस्काउंट मिळवू शकतात.

डिस्काउंट कुपन डाउनलोड करण्यासाठी खालील फॉर्म भरा

जिल्हा:

Related posts

Shares