Search

नारळावरील किड नियंत्रण

नारळावरील किड नियंत्रण

नारळ हे देशातील एक प्रमुख पीक आहे. नारळाच्या झाडावर शंभरपेक्षा जास्त प्रकारच्या किडींची नोंद करण्यात आली आहे; ज्यामुळे नारळाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यापैकी गेंड्या भुंगा, सोंड्या भुंगा आणि काळ्या डोक्याची अळी या किडी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात.नारळ पिकावरील किडींचे नियंत्रण कसे करावे; हे जाणून घ्या!

१) गेंड्या भुंगा

लक्षणे:

 • हा भुंगा नारळाच्या झाडाच्या शेंड्यामधून नवीन येणारा कोंब खातो, त्यामुळे झाडाचे फार नुकसान होते. कीडग्रस्त झाडांच्या झावळ्याही काही वेळा मध्यभागी कुरतडलेल्या दिसतात.
 • गेंड्या भुंग्याचा प्रादुर्भाव झालेल्या झाडावर नवीन पाने त्रिकोणी आकारात कापलेली दिसतात.

गेंड्या भुंगा

गेंड्या भुंगा
उपाय:

 • या किडीची पैदास कंपोस्ट खताच्या खड्ड्यांमध्ये होते. म्हणून या खड्ड्यांवर दर दोन महिन्यांनी कार्बारिल (50%) भुकटी (पाण्यात मिसळणारी) दहा लिटर पाण्यात मिसळून झाडांवर फवारावीत.
 • तसेच वरील प्रमाणात 50% लिंडेन पावडर फवारावी. गेंड्या भूग्याचा उपद्रव झालेल्या झाडातून लोखंडी सळईच्या सहाय्याने भुंगा काढून ठार मारावा आणि 10% कार्बारिल व मातीच्या सहाय्याने झाडावरील छिद्रे बुजवून टाकावीत. हा उपाय दर तीन महिन्यांनी करावा.
 • अळ्या नष्ट करण्यासाठी शेतात मधे माधे लहान खड्डे करुन त्यात शेणखत व 2% मिथिल पॅरॅतथियॉनचे मिश्रण टाकावे.
 • बॅक्युलो विषाणुग्रस्त भुंगे 30-35 प्रती हेक्टरी बागेत सोडावेत.
२) सोंड्या भुंगा :

लक्षणे:

 • या किडीच्या अळ्या झाडाच्या खोडाच्या आतील मऊ व खोड आतून पोखरतात.
 • काही दिवसांनी सोंड्या भुंग्यांचा प्रादुर्भाव झालेला झाड मरते.
 • अळ्या खोडाच्या आत असल्याने प्रादुर्भाव दिसुन येत नाही
 • प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी बुंध्यावर भोके दिसतात व त्यातुन ताजा भुसा व तांबुस द्रव बाहेर पडलेला दिसतो.

सोंड्या भुंगा

सोंड्या भुंगा

उपाय:

 • सोंड्या भुंग्याचा उपद्रव टाळण्यासाठी नारळाच्या प्रत्येक झाडावर भोकात 10% कार्बारिल भुकटी टाकावी.
 • शक्य असेल तेवढ्या अळ्या कोयत्याच्या सहाय्याने काढुन नष्ट कराव्यात.
 • खोडावर 1 मीटर उंचीवर गिरमिटाच्या सहाय्याने 15-20 सेमी तिरके भोक पाडुन त्यामध्ये 20 मिली 36% मोनोक्रोटोफॉस प्रवाही किटकनाशक नरसाळ्याच्या सहाय्याने ओतावे आणि सिमेंटच्या सहाय्याने भोक बंद करावे.
३) उंदीर

लक्षणे:

 • उंदीर हे नारळाच्या झाडाच्या सर्व अवस्थांमध्ये उपद्रव करतात.
 • उंदीर नारळाची कोवळी वाढणारी फळे पोखरतात. अशा पोखरलेल्या नारळांची गळ होते.

उंदीर

 • उपाय:
  उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी झाडाच्या बुंध्यावर जमिनीपासून 2 मीटर उंचीवर अर्धा मीटर गुळगुळीत पत्र्याच्या गोलाकार पट्ट्या बसवाव्यात
 • 100 ग्रॅम गव्हाच्या पिठामध्ये 6 ग्रॅम झिंक फॉस्फाईड या प्रमाणात मिसळून त्याच्या गोळ्या तयार कराव्यात.
 • या गोळ्या उंदरांनी पोखरलेल्या झाडाच्या खोडात ठेवाव्यात. झिंक फॉस्फाईडच्या गोळ्या बागेतील बिळातही टाकाव्यात, त्यामुळे उंदरांची संख्या कमी होण्यास मदत होते.
४) काळ्या डोक्‍याची अळी

लक्षणे:
अळ्या पानाच्या खालच्या भागावर जाळी तयार करून पानातील हरितद्रव्य खातात.

काळ्या डोक्‍याची अळी

काळ्या डोक्‍याची अळी

उपाय:

 • या किडीच्या नियंत्रणासाठी कार्बारील 20 ग्रॅम किंवा डायमेथोएट (30% प्रवाही) 16 मि.लि. किंवा डायक्‍लोरव्हॉस (76% प्रवाही) 10 मि.ली. प्रति 10 पाण्यात मिसळून फवारावे.
 • नारळाच्या झाडावर किडीच्या अळ्या आढळून आल्यास, जैविक नियंत्रणासाठी गोनिओझस नेफॅटिडीस हे अळीला खाणारे मित्रकीटक 3500 किडी प्रति हेक्‍टर या प्रमाणात बागेत झावळ्यांवर सोडावेत.

 

५) इरिओफाईड कोळी

लक्षणे:

 • ही किड अतिशय सूक्ष्म असून देठाखालील आवरणाच्या आत असते.
 • देठाच्या खालच्या भागावर तांबूस चट्टे दिसतात. चट्टे वाढत जाऊन त्यांचा आकार त्रिकोणी बनतो.
 • प्रादुर्भित भागावरील फळांचे आवरण तडकते.
 • नारळ लहान राहतात. काथ्याची प्रत घटते.

इरिओफाईड कोळी

उपाय :

 • कडुनिंबातील (निमॅझॉल) अझाडिरेक्‍टीन या घटकावर आधारित कीटकनाशक (50 हजार पीपीएम) 5 मि.लि. किंवा 10,00 पीपीएम तीव्रतेचे 10 मि.लि. समप्रमाणात पाण्यात मिसळून एप्रिल ते मे, ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर व जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत मुळाद्वारे वर्षातून तीन वेळा द्यावे.
 • नारळास 50 किलो कंपोस्ट, 10 किलो निंबोळी पेंड व झिंक, बोरॉन, मॉलिब्डेनम व कॉपर ही अतिसूक्ष्म अन्नद्रव्ये 200 ग्रॅम प्रति झाड दरवर्षी द्यावीत.
 • कडुनिंब आधारित अझाडिरेक्‍टीन घटक (10,000 पीपीएम) 4 मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून नारळाच्या घडावर पडेल अशी फवारणी करावी.

Photo Courtesy : Coconut Board India

Related posts

Shares