Search

पाच मिनिटात जाणून घ्या भाजीपाल्याचे बाजारभाव

पाच मिनिटात जाणून घ्या  भाजीपाल्याचे बाजारभाव

मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. 23) फ्लॉवरची 820 क्विंटल आवक झाली होती. त्यास 1000 ते 1400 रुपये, तर सरासरी 1200 रुपये प्रतिक्विंटल दर होता, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
बाजार समितीत मंगळवारी 550 ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. स्थानिक आणि परराज्यांतून होणारी शेतमालाची आवक घटल्यामुळे काही भाजीपाल्याचे दर वधारले होते. सोमवारी (ता.22) बाजार समितीमध्ये लसणाची 1120 क्विंटल आवक झाली होती. त्यास 3000 ते 6000 रुपये, तर सरासरी 5500 रुपये प्रतिक्विंटल इतका दर होता. कांद्याची 13350 क्विंटल आवक झाली होती. त्यास 1500 ते 2200 व सरासरी 1850 रुपये प्रतिक्विंटलचे दर होता. बटाट्याची 17120 क्विंटल आवक झाली होती. त्यास 800 ते 1200 रुपये, तर सरासरी 1000 रुपये प्रतिक्विंटल दर होता. लिंबाची 200 क्विंटल आवक झाली होती. त्यास 100 ते 150 रुपये प्रतिशेकडा दर होता. वाटाण्याची 200 क्विंटल आवक झाली होती. त्यास सरासरी 7000 रुपये दर होता. टोमॅटोची 2310 क्विंटल आवक झाली होती. त्यास 2200 ते 2400 रुपये, तर सरासरी2300 रुपये प्रतिक्विंटल दर होता. ज्वाला मिरचीची 775 क्विंटल आवक झाली होती. त्यास 3400 ते 3800 रुपये, सरासरी 3600 रुपये प्रतिक्विंटल दर होता. फळ बाजारात डाळिंबाची 169 क्विंटल आवक होऊन सरासरी दर 7500 रुपये इतका होता. भुईमूग शेंगांची आवक कमी असून, त्यास 2500 ते 3500 रुपये, तर सरासरी 3000 रुपये प्रतिक्विंटल दर होता. आल्याची 220 क्विंटल आवक झाली होती. त्यास 4200 ते 4600 रुपये, तर सरासरी 4400 रुपये प्रतिक्विंटल दर होता. भेंडीची 290 क्विंटलची आवक झाली होती. त्यास 2000 ते 2400 रुपये, तर सरासरी 2200 रुपये प्रतिक्विंटल दर होता. गवारीची आवक कमी झाली असून, त्यास 2800 ते 3000 रुपये, तर सरासरी 2900 रुपये प्रतिक्विंटल दर होता. शेवग्याची 150 क्विंटल आवक झाली होती. त्यास 6000 ते 7000 रुपये, तर सरासरी 6500 रुपये प्रतिक्विंटल दर होता.

मुंबई “कृउबातील आवक व दर (रुपये/क्विंटल) 
शेतीमाल—आवक —किमान —कमाल—सरासरी दर
डाळिंब—169—7000—8000—7500
कलिंगड—1120—600—1100—850
मोसंबी —140—1000—2000—1500
पपई —1313—700—1200—1500
टरबूज—-1420—1200–1800—1500

 

संदर्भ : अॅग्रोवन

Related posts

Shares