Search

आधुनिक तंत्रज्ञानाने पाणी व्यवस्थापन

आधुनिक तंत्रज्ञानाने पाणी व्यवस्थापन

मागील  वर्षात झालेल्या पावसामुळे कृषी क्षेत्रात समाधानाचे  वातावरण होते. कारण याआधी सलग दोन वर्षे कृषी क्षेत्राला दुष्काळाचा सामना करावा लागला होता. पाऊस चांगला झाला मात्र काही ठिकाणी पुर आला. पाण्याची उपलब्धता पुढील काही महिन्यांसाठी फायद्याची ठरली पण प्रत्येकवेळी असे होऊ शकत नाही. यामुळेच पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता पाण्याचे योग्य नियोजन होणे अत्यंत आवश्यक आहे. भविष्यात आधुनिक तंत्रज्ञानाने पाणी व्यवस्थापन करण्यासाठी काय करता येईल याचा देस्ताटॉक ने घेतलेला मागोवा.

पाण्याच्या कमतरतेवर मत मिळावी या उद्देशाने पाटबंधारे, कालवे तसेच धरणांची निर्मिती करण्यात आली आहे. पण केवळ सरकारवर अवलंबून न राहता जर  शेतकरी बांधवांनी स्वतःहून पुढाकार घेऊन आवश्यक पावले उचलणे हि गरज आहे. जर शेतकऱ्यांना पाण्याचे व्यवस्थापन करण्याचे तंत्रज्ञान अवगत झाले तर केवळ पाण्याची बचत होणार नाही तर शेतकऱ्यांना पाण्याचा योग्य वापर कसा करावा याबाबतही ज्ञान मिळेल.

1. मातीमधील आर्द्रता जाणून घेणारे सेंसर

आधुनिक तंत्रज्ञानाने पाणी व्यवस्थापन

कोणत्याही पिकाच्या योग्य वाढीसाठी पाण्याचा नियमित पुरवठा आवश्यक आहे. मातीतून जर मातीचा निचरा वेगाने झाला तर पिकाला याचा ताण सहन करावा लागतो आणि ओघाने याचा परिणाम उत्पन्नावर होतो. मातीतील आर्द्रतेची अचूक माहिती देणारे सेंसर्स लावले असता  मातीमध्ये पाणी किती प्रमाणात  उपलब्ध आहे याची माहिती मिळू शकते. हि माहिती शेतकऱ्यांना फायद्याची ठरू शकते. याबरोबरच, मातीचे घनत्व, विद्युत प्रतिरोध यासारख्या महत्वपूर्ण गोष्टींची माहिती मिळू शकते.

2. ड्रोन मॉनिटर्स

आधुनिक तंत्रज्ञानाने पाणी व्यवस्थापन

सध्या ड्रोन प्राथमिक अवस्थेमध्ये असले तरी संपूर्ण विश्वात विविध कामांसाठी ड्रोन चा वापर केला जात आहे. आवश्यक वस्तूंची ने आण करण्यासाठी, व्हिडीओ तसेच फोटोग्राफी करण्यासाठी याबरोबरच काही ठिकाणी फवारणीसाठी देखील ड्रोन चा वापर केला जातो. ड्रोन च्या मदतीने शेतीमधील विविध कामांबरोबरच शेतीची देखरख करण्याचे महत्वपूर्ण काम देखील वेगाने आणि कमी खर्चात केले जाऊ शकते.  याअंतर्गत, संपूर्ण शेतात पाण्याचे योग्य वितरण होतेय कि नाही यावर देखरेख करणे, पशु किंवा जनावरे शेतात उपद्रव करत आहेत कि नाही याची खात्री करता येणे शक्य आहे.

3. पिकांची थर्मल इमेजिंग

आधुनिक तंत्रज्ञानाने पाणी व्यवस्थापन

पिकाचे तापमान लक्षात घेऊन किती पाणी द्यावे हे निश्चित करता येऊ शकते. पिकामध्ये उपलब्ध असलेल्या प्रत्येक रोपाचे तापमान जाणून घेणे किंवा त्याचे आकलन करणे शक्य नसते. ड्रोन च्या मदतीने किंवा किंवा थर्मल इमेजिंग च्या मदतीने मोठ्या शेतामधील पिकाचे तापमान जाणून घेणे शक्य आहे. कॉम्प्युटर किंवा स्मार्ट फोन मध्ये या माहितीचे जतन करणे शक्य आहे.

4. हवामानासंदर्भात माहिती देणारे अँप्लिकेशन

आधुनिक तंत्रज्ञानाने पाणी व्यवस्थापन

मागील काही वर्षांपासून हवामान अस्थिर असल्याने भारतातील शेतकऱ्यांना जास्त नुकसान सहन करावे लागले आहे. भारतीय हवामान खाते (IMD) हवामानसंदर्भात योग्य माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते. मात्र शेतकऱ्यांकडून बऱ्याचदा या माहितीकडे दुर्लक्ष झाल्याने पाण्याची बचत शक्य होत नाही. जर हि माहिती अँप च्या माध्यमातून उपलब्ध झाली तर या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना सिंचनाचे योग्य नियोजन करणे शक्य आहे. या अँप च्या मदतीने हवा, तापमान,पाऊस यांचा जमिनीवर कसा प्रभाव होऊ शकतो याचे आकलन शक्य आहे. या आधारे शेतीत भविष्यात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव करावा याचे योजनाबद्ध नियोजन शक्य आहे.

5. सिंचनासाठी इंटरनेटचा वापर

आधुनिक तंत्रज्ञानाने पाणी व्यवस्थापन

इंटरनेटचा वापर आता सगळ्याच क्षेत्रात होऊ लागलाय. आरोग्य, निर्मिती, पुरवठा तसेच वाहतूक यासारख्या क्षेत्रात होतोय. कृषी क्षेत्रात इंटरनेट चा अंतर्भाव अनेक नवीन संधी उपलब्ध करून देऊ शकतो. सिंचनाच्या माध्यमातून पाणी व्यवस्थापन करणाऱ्या यंत्रांची निगा राखणे आवश्यक असते. या यंत्रणेवर लावण्यात आलेले सेंसर्स जर इंटरनेट ने जोडले गेले तर होणारी पाण्याची गळती तसेच इतर समस्यांवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. या सेन्सर्सच्या माध्यमातून पाण्याच्या गुणवत्तेची पडताळणी करून हे पाणी शेती साठी योग्य आहे कि नाही याची माहिती मिळविता येऊ शकते.

ही सगळी माहिती जाणून घेतल्यानंतर आपल्या लक्षात आले असेल कि जर कृषी क्षेत्राचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर नजीकच्या भविष्यात अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब होणे हि एक काळाची गरज आहे.

Related posts

Shares