Search

पालक लागवड

पालक लागवड

पालकाचे मुळस्थान भारत समजले जाते. पालक भारतीय खाद्यसंकसृतीचा एक भाग म्हणून ओळखले जाते. पालकपासून  भाजी, आमटी, सूप, भजी अशी विविध पक्वान्ने तयार केली जातात. पालक मध्ये ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय लोह, कॅल्शिअम, पोटॅशियम, सल्फर, पिष्टमय पदार्थ तसेच प्रथिने यांचा दर्जेदार संगम असतो. यामुळेच पालक या वनस्पतीला बाजारात चांगली मागणी आहे. हे पाहता ‘पालक लागवड’ कशी करावी याची माहिती जाणून घेणे शेतकरी बांधवांसाठी फायद्याचे ठरेल.

हवामान :

पालक सर्व हवामानात घेता येणारे पीक आहे. मात्र हिवाळ्याचा हंगाम पालक पिकासाठी चांगला मनाला जातो. साधारण ३५ ते ४० अंश सेल्सिअस तापमान असलेल्या ठिकाणी पालकाची पाने जाड होतात आणि चवही योग्य आहे. तसेच पीक लवकर फुलोऱ्यावर येते.

जमीन :

पालकाची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते. पाण्याचा उत्तम निचरा होणारी चिकणमातीची जमीन पालकाला मानवते. पालक लागवडीसाठी जमिनीचा सामू ७ असावा. जमीन थोडी अल्कलीयुक्त असली तरी पालकचे पीक सहन करू शकते.

सुधारित जाती :

१. पुसा ज्योती

२. ऑलग्रीन

३. पंत कंपोझिट

४. पुसा हरित

लागवड :

जमिनीची २-३ वेळा वखरणी करून हेक्टरी ३० ते ३५ टन शेणखत जमिनीत मिसळावे. लागवडीसाठी ३ x १ मी. आकाराचे सपाट वाफे करावेत. १५ ते २० सेंमी अंतरावर १ ते १.५  सेंमी खोलीच्या रेघ काढून  त्यात बियाणे टाकून मातीने झाकावे. किंवा बियाणे एकसारखे फेकून पेरावे. हेक्टरी साधारण ८ ते १० किलो बियाणे लागते.

खत व्यवस्थापन :

हेक्टरी ३० ते ३५ टन शेणखत, ४० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ४० किलो पालाश प्रति हेक्टर द्यावा. प्रत्येक कापणीनंतर २५ किलो नत्र द्यावे. १ ते २ टक्के युरियाची फवारणी दिल्यास उत्पादनात वाढ होते.

पाणी नियोजन :

जमिनीतील ओलाव्यानुसार ३ ते ४ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

आंतरमशागत :

तणांचा वेळीच बंदोबस्त करावा, आवश्यकतेनुसार २-३ खुरपण्या कराव्या.

काढणी :

पूर्णपणे वाढ झालेल्या कोवळ्या व तजेलदार पानांची देठासह काढणी करावी. पेरणीनंतर ३-४ आठवड्यांनी पहिली खुडणी करावी. १५ दिवसांच्या अंतराने नंतरच्या खुडण्या कराव्या.

उत्पादन :

पालकाचे प्रति हेक्टर १५ ते २० टन उत्पादन मिळते.

Related posts

Shares