पावसाळी भुईमूग लागवड

पावसाळी भुईमूग लागवड
[Total: 88    Average: 2.6/5]

महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या गळीत पिकांमध्ये भुईमूग हे अत्यंत महत्वाचे पीक मानले जाते. रब्बी आणि उन्हाळी हंगामाबरोबरच पावसाळी किंवा खरिफ हंगामांत देखील भुईमुगाची शेती केली जाते. पावसाळी भुईमुग लागवड या लेखात आपण पावसाळ्यात भुईमुगाची लागवड करताना कसे नियोजन करावे याचा आढावा घेऊया.

हवामान

भुईमुगाच्या जातीनुसार भुईमुगाच्या झाडाची शाखीय (Vegetativ Growth) वाढ २७ अंश सें .ते ३० अंश सें. तापमानात होते .पिकाची फुलधारणा व पहिले फुल उमलण्यास २४ ते २७ अंश सें . तापमान योग्य असते . भुईमुगास वार्षिक पाऊसमान ९० ते १०० सें .मी . लागते .पाऊस विखुरलेल्या स्वरूपात पडणा-या विभागात हे पीक चांगले येते .

हंगाम

खरीप हंगामात जिरायत भुईमुगाची पेरणी जुन महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करता येते. जेथे तीव्र हिवाळा नसतो व रात्रीचे तापमान ५२ अंश फँ .पेक्षा कमी नसते तेथे भुईमुगाची रब्बी पेरणी नोव्हेंबर महिन्यात करणे शक्य आहे. तसेच उन्हाळी भुईमुगाची पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी पर्यत करतात . उन्हाळी भुईमुगाचे उत्पादन हे खरीपातील भुईमुगापेक्षा दुप्पट येते .

जमीन

भुईमुगाच्या पीकास मध्यम खोल व उत्तम निचा-याची हलक्या रंगाची ,मोकळी ,भुसभीशीत ,वाळुमय ,पोयटा, पुरेसा चुना आणि मध्यम सेंद्रिय द्र्व्ये असलेली जमीन हवी असते .हलक्या जमिनीत सुध्दा भूईमुग चांगला येतो .

जमीनीची पूर्व मशागत

जमीनीचीपूर्व मशागत जमीनीचा प्रकार व पाऊसमान यावर अवलंबून असते .जमीनीची उभी आडवी नांगरणी करावी आणि ३ -४ कुळवाच्या पाळ्या द्याव्यात.

लागवड पध्दत

भुईमुगाच्या उपट्या निमपस-या व पस-या जातीची लागवड  सर्व साधारण रुंद वरंबा व सरी पध्दत यामध्ये तसेच सपाट वाफ्यावरती करतात . वरंब्याची रुंदी १ – २ मी .व सरीची रुंदी ३० सें मी . त्याच प्रमाणे जोड ओळ पध्दतीत दोन जोड ओळी (३० सेंमी अंतराच्या ) ह्या ६० सेंमी .अंतराने पाडाव्यात ह्या पध्दतीत झाडातील अंतर वाढते (१० सेंमी)

प्रति हेक्टरी बियाणे

प्रति हेक्टरी १६०किलो बियाणे लागते .बी जमीनीत ५ -६ सें ,मी . खोलीवर हाताने ,पाथरीने किंवा पेरणीयंत्राने पेरता येते . उभी -आडवी पेरणी केल्याने पिकात खाडे राहत नाहीत व पिकाची समान वाढ होते .  जीवाणू संवर्धनाचा (रायझोबियम जीवाणू ) चा उपयोग बीज प्रक्रियेत करावा.

वाण

वाण उत्पादन (क्विं/हे)
टी.ए.जी 24 18-20 क्विं/हे
जे .एल 24 18-20 क्विं/हे
एस .बी 11 10-12 क्विं/हे
टी.के. 19 15-18 क्विं/हे
ए. के 159 20-22 क्विं/हे
एस.बी 11 14-20 क्विं/हे

खते

उपलब्धतेनुसार किंवा आवश्यकतेनुसार सेंद्रिय भरखते द्यावीत .भुईमुग पिकाकरिता दोन्ही ओळीच्यामध्ये जलकुंभी वाँटर हायसिंथ (Eichomia Crasspes) हे उत्तम म्स्य सेंद्रिय खत म्हणुन वापरतायेईल .

आंतरशागत

दोन कोळपण्या व एक खुरपणी .

पिकांची फेरपालट

भुईमुगाची फेरपालट ज्वारी ,कापूस ,मका ,तीळ ,मुग ,उडीद ,चवळी इ .पिकाशी खरीप हंगामात करतात .बागायती पिकाचा फेरपालट बहुधा भाताच्या पिकासोबत करतात .

मिश्न पिके

ज्वारी,बाजरी ,रागी ,एरंडी ,तीळ ,करडी ,रामतील ,तुर ,कापूस ,कडवे वाल इ .पिकात भुईमुगाचे मिश्न पीक घेतात .तथापि इतर पिकापेक्षा कापुस , एरंडी व तुर या पिकातील भुईमुगाचे मिश्न पीक लाभदायक असते .

Shares